
Tech Tips: SIM बदलल्याने वाढतं 5G इंटरनेट स्पीड? 90 टक्के लोकांना माहिती नाही... जाणून घ्या सत्य
जर तुमच्या स्मार्टफोनमधील सिम फार जुने असेल आणि तुम्ही अनेक वर्षांपासून स्मार्टफोनमधील सिम बदलले नसेल तर तुम्हाला इंटरनेट स्पीडची समस्या येऊ शकते. कारण जुने सिम नवीन नेटवर्क फीचर्सना पूर्णपणे सपोर्ट करत नाही. विशेषत: 4G आणि 5G नेटवर्कच्या या सध्याच्या काळात जुने सिमकार्ड अपग्रेड केल्याने चांगला नेटवर्क अनुभव मिळू शकतो. पण अनेकदा यूजरकडे असलेले सिम आधीपासूनच 4G आणि 5G नेटवर्कसाठी सक्षम असते. अशा परिस्थितीत इंटरनेट स्पीडची समस्या सोडवण्यासाठी सिम बदलणं फायद्याचं ठरत नाही.
जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या सिम कार्डमध्ये कोणत्याही प्रकारची टेक्निकल समस्या असेल, सिम जास्त जुने झाले असेल किंवा ते नवीन नेटवर्क फीचर्सना सपोर्ट करत नसेल, तर अशा परिस्थितीत नवीन सिम कार्ड खरेदी करण्याचा निर्णय तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. जर नेटवर्क ऑपरेटरने तुमच्या नंबरसाठी नवीन नेटवर्क प्रोफाईल किंवा सर्विस अपग्रेड लागू केली असेल, तर सिम बदलल्यानंतर नेटवर्क कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा होऊ शकते.
पण जर तुमच्या क्षेत्रात नेटवर्क कव्हरेज खराब असेल, तर सिम बदलून देखील नेटवर्क समस्या सोडवली जाऊ शकत नाही. अशावेळी समस्या तुमच्या स्मार्टफोनमधील सिमकार्डमध्ये नाही तर नेटवर्क टॉवर किंवा कव्हरेजमध्ये असू शकते.
Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत
केवळ सिम कार्ड बदलल्याने 5G चा वेग वाढेलच असे नाही. 5G ची कामगिरी प्रामुख्याने नेटवर्क कव्हरेज, टॉवरची क्षमता, नेटवर्कवरील ताण, तुमच्या फोनचे 5G बँड्स आणि तुमचा प्लॅन यांवर अवलंबून असते. त्यामुळे केवळ सिम बदलल्याने इंटरनेटची स्पीडची समस्या सोडवली जाऊ शकते, याबाबत ठोसपणे खात्री दिली जाऊ शकत नाही.