WhatsApp Update: मुलांची सुरक्षा वाढणार! अॅपवर लवकरच येणार नवं फीचर, पालकांना मिळणार खास कंट्रोल
कंपनीच्या नवीन अपडेटमुळे व्हॉट्सअॅपच्या अल्पवयीन यूजर्सची सुरक्षा आणखी वाढणार आहे. अलीकडेच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, मेसेजिंग अॅप सध्या एका नवीन फीचरची चाचणी करत आहे. हे फीचर लवकरच यूजर्ससाठी जारी केलं जाणार आहे. या नवीन फीचरच्या मदतीने आई- वडील मुलांच्या अकाऊंटची प्रायव्हसी आणि इंटरॅक्शनवर कंट्रोल मिळवू शकणार आहेत. खरं तर व्हॉट्सअॅप फीचर ट्रॅकर WABetaInfo ने अलीकडेच काही रिपोर्ट शेअर केले आहेत. या रिपोर्टनुसार, कंपनी 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या यूजर्ससाठी सेकेंडरी अकाऊंट नावाची नवीन सिस्टिम तयार करत आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरु आहे. अँड्रॉईड बीटा वर्जनमध्ये हे फीचर लवकरच जारी केलं जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर सेकेंडरी अकाऊंट्स विशेषत: लहान मुलं आणि किशोरवयीन यूजर्ससाठी डिझाईन करण्यात आले आहे. लहान मुलं आणि किशोरवयीन यूजर्सचे अकाऊंट्स एका प्रायमरी अकाऊंटसोबत कनेक्ट केले जाणार आहे, प्रायमरी अकाऊंट पालक किंवा गाईडरचे असू शकते. दोन्ही अकाऊंट्स एका विशेष लिंकने जोडली जाणार आहेत. त्यामुळे पालक त्यांच्या यूजर्सच्या अकाऊंटवर लक्ष ठेऊ शकणार आहेत आणि स्कॅमपासून त्यांच्या मुलांना सुरक्षित ठेऊ शकणार आहेत.
रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, पालकांच्या अकाऊंटद्वारे लहान मुलांच्या अकाऊंटची अनेक प्रायव्हसी सेटिंग्स मॅनेज करू शकतात. जसे प्रायमरी अकाऊंटमध्ये मुलांच्या अकाऊंटसाठी प्रोफाइल फोटो, लास्ट सीन आणि About सेट करण्याची सुविधा मिळणार आहे. याशिवाय, रीड रिसीप्ट्स म्हणजेच ब्लू टिक चालू किंवा बंद करण्याची सुविधा देखील उपलब्ध असेल. याशिवाय, मुलांना कोणत्या ग्रुपमध्ये जोडले जाऊ शकते याचा कंट्रोल देखील पालकांकडे असणार आहे. पालकांना मुलांच्या अॅक्टिव्हिटीसंबंधित अपडेट्स मिळणार आहे. मात्र पालक चॅट लिस्ट, कॉल लॉग, मेसेज किंवा कॉलचे चॅट्स पाहू शकणार नाहीत.
Ans: होय. WhatsApp वापरण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही, फक्त इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे.
Ans: होय. WhatsApp मध्ये End-to-End Encryption असल्यामुळे तुमचे मेसेज फक्त तुम्ही आणि समोरील व्यक्तीच वाचू शकतात.
Ans: WhatsApp मध्ये वेळोवेळी चॅनल्स, स्टेटस अपडेट्स, मल्टी-डिव्हाइस सपोर्ट, चॅट लॉक, पेरेंटल कंट्रोलसारखी सेफ्टी फीचर्स जोडली जात आहेत.






