महाराष्ट्रभर शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती
स्कॅम आणि फ्रॉडच्या घटना सध्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. स्कॅमर्सच्या जाळ्यातून मोठं – मोठे सेलिब्रिटी देखील सुटत नाही. आता एक नवीन घटने समोर आली आहे, ज्यामध्ये स्कॅमर्सनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील रामकृष्ण मिशन आश्रमाचे सचिव स्वामी सुप्रदीपतानंद यांना डिजीटल अरेस्टचे शिकार बनवले आहे. ही डिजीटल अरेस्ट काही तासांसाठी नाही तर तब्बल 26 दिवसांसाठी होती. ही आतापर्यंत झालेली सर्वात मोठी डिजीटल अरेस्ट आहे. यामध्ये सचिव स्वामी सुप्रदीपतानंद यांच्याकडून स्कॅमर्सनी तब्बल 2.52 कोटी रुपये उकळले आहेत.
स्कॅमर्सनी सचिव स्वामी सुप्रदीपतानंद यांना सलग 26 दिवसांसाठी डिजीटल अरेस्ट केलं होतं. यावेळी स्कॅमर्सनी सचिव स्वामी सुप्रदीपतानंद यांच्यावर दबाव टाकला आणि त्यांना वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. स्कॅमर्सनी स्वामी यांना महाराष्ट्र पोलिस अधिकारी असल्याचे भासवून फोन केला आणि त्यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप केला. यानंतर त्यांनी वेगवेगळ्या कारणांसाठी पैशांची मागणी केली. (फोटो सौजन्य – Pinterest)
एका वृत्तानुसार, हे प्रकरण 17 मार्च रोजी सुरू झाले, जेव्हा स्वामी सुप्रदीपतानंद यांना एक व्हिडिओ कॉल आला होता. कॉलवर समोरील व्यक्तिने नाशिक (महाराष्ट्र) येथील एका कथित पोलीस अधिकारी असल्याचा दावा केला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आरोप केला की स्वामी यांचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात आले आहे ज्यामध्ये व्यावसायिकांचाही सहभाग आहे. हे सर्व ऐकताच स्वामींनी स्कॅमर्सवर विश्वास ठेवला. यानंतर स्कॅमर्सनी त्यांना धमकी दिली की जर त्यांनी सहकार्य केले नाही तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.
स्कॅमर्सनी सांगितल्याप्रमाणे, स्वामींनी देशभरातील 12 वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण 2.52 कोटी रुपये ट्रान्सफर केले. स्कॅमर्सनी स्वामींना सांगितले की ही एक पडताळणी प्रक्रिया आहे आणि 15 एप्रिलपर्यंत पैसे त्यांना परत केले जातील. पण जेव्हा अंतिम मुदत संपली तेव्हा स्वामींनी पोलीसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा हे प्रकरण डिजीटल अरेस्टशी संबंधित असल्याचं समोर आलं.
हे प्रकरण एखाद्या मोठ्या आंतरराज्यीय किंवा आंतरराष्ट्रीय टोळीचा भाग असू शकते, असे पोलिसांचे मत आहे. या प्रकारच्या फसवणुकीचे बळी आणखी असू शकतात आणि त्यांचे सहकारी देखील त्यात सहभागी असू शकतात, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तथापि, तपास अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे.
डिजिटल अटक ही ऑनलाइन फसवणुकीची एक प्रक्रिया आहे. यामध्ये, गुन्हेगार एखाद्याला ऑनलाइन व्हिडिओ कॉल करतो आणि स्वतःला पोलिस अधिकारी म्हणून ओळख देतो आणि त्यांना बनावट प्रकरणाची माहिती देतो आणि पैशाची मागणी करतो. या प्रक्रियेत शारीरिक अटक होत नाही, परंतु आर्थिक नुकसान होते.