
ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान ठरतील हे 5 Bluetooth डिव्हाईस; रोजची कामं होतील अधिक सोपी
कमी किंमतीत उपलब्ध असणारे स्मार्टवॉच ब्लूटूथ कॉलिंग, हार्ट रेट मॉनिटर, स्टेप काउंट आणि नोटिफिकेशनसारख्या अनेक दमदार फीचर्सनी सुसज्ज आहेत. स्मार्टवॉचच्या मदतीने वृद्ध व्यक्ती त्यांच्या रोजच्या अॅक्टिव्हिटीवर नजर ठेऊ शकतात. यासोबतच स्मार्टवॉचच्या मदतीने कोणतेही महत्त्वाचे कॉल्स चुकणार नाहीत. अनेक स्मार्टवॉचमध्ये एसओएस आणि हेल्थ ट्रकिंग सारखे फीचर्स देखील उपलब्ध असतात, ज्यामुळे रोजचे जीवन अतिशय सोपे होते. (फोटो सौजन्य – Pinterest)
सहसा वृद्ध व्यक्ती वाढत्या वयासोबत चावी, पर्स आणि महत्त्वाच्या वस्तू एखाद्या ठिकाणी ठेऊन विसरून जातात. ही एक सामान्य सवय आहे. अशावेळी ब्लूटूथ ट्रॅकर अतिशय फायदेशीर ठरते. तुम्ही चावी किंवा बॅगेला ब्लूटूथ ट्रॅकर लावून ठेऊ शकता. त्यानंतर मोबाईल अॅपच्या मदतीने तुम्ही काही सेकंदातच तुमच्या हरवलेल्या वस्तू शोधू शकता.
बऱ्याच वृद्ध व्यक्तींना धार्मिक प्रवचन, भजन किंवा रेडियो ऐकण्याची आवड असते. अशा लोकांसाठी ब्लूटूथ स्पीकर एक फायद्याचे डिव्हाईस ठरणार आहेत. तुम्ही स्मार्टवॉचला ब्लूटूथ स्पीकर कनेक्ट करू शकता. यानंतर हेडफोन किंवा ईअरफोनशिवाय चांगल्या साऊंड क्वालिटीमध्ये गाणी आणि भजन ऐकू शकता. इतकंच नाही तर पार्कमध्ये देखील तुम्ही हा ब्लूटूथ स्पीकर सहज घेऊन जाऊ शकता.
ज्या वृद्ध व्यक्तींना सतत फोनवर बोलायला आवडत असेल किंवा भजन-किर्तन किंवा बातम्या ऐकायला आवडत असेल त्यांच्यासाठी ब्लूटूथ नेकबँड एक कामाचे डिव्हाईस ठरू शकते. या डिव्हाईसच्या मदतीने त्यांना वारंवार स्मार्टफोनचा वापर करावा लागणार नाही. तसेच कॉल रिसिव्ह करणं देखील सोपं होतं.
Truecaller अडचणीत? TRAI ने सरकारकडे मागितले विशेष अधिकार; मंजुरी मिळाल्यास होऊ शकते मोठी कारवाई
स्मार्ट ब्लूटूथ बटन देखील वृद्ध व्यक्तींसाठी एक फायदेशीर डिव्हाईस ठरू शकते. याच्या मदतीने लोकं एक बटन दाबून फोनचे कॅमेरा शटर कंट्रोल करू शकतात, गाणी सुरु करू शकतात किंवा बंद करू शकतात. काही मॉडेल्समध्ये इमरजेंसी अलर्ट पाठवण्याची सुविधा देखील दिली जाते.