Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple सिईओ पदावरून Tim Cook आज होणार निवृत्त! 15 वर्षांच्या कारकिर्दीतील ‘ही’ प्रोडक्ट्स ठरली गेमचेंजर, जाणून घ्या

Apple CEO Tim Cook: टिम कूक आज ॲपलच्या सिईओ पदावरून पायउतार होणार आहेत. 1 सप्टेंबरपासून जॉन टर्नस कंपनीच्या सिईओ पदाची धुरा हाती घेणार आहेत. टिम कूक गेल्या 15 वर्षांपासून कंपनीच्या सिईओ पदावर काम करत होते. त्यांच्या या कार्यकाळात कंपनीत अनेक सकारात्मक बदल करण्यात आले

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 31, 2026 | 10:32 AM
Apple सिईओ पदावरून Tim Cook आज होणार निवृत्त! 15 वर्षांच्या कारकिर्दीतील ‘ही’ प्रोडक्ट्स ठरली गेमचेंजर, जाणून घ्या

Apple सिईओ पदावरून Tim Cook आज होणार निवृत्त! 15 वर्षांच्या कारकिर्दीतील ‘ही’ प्रोडक्ट्स ठरली गेमचेंजर, जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • 31 ऑगस्टला टिम कूक ॲपलच्या सिईओ पदावरून पायउतार होणार असून 1 सप्टेंबरपासून जॉन टर्नस ही जबाबदारी स्वीकारणार आहेत.
  • टिम कूक यांच्या कार्यकाळात ॲपल सिलीकॉन चिप्स, एअरटॅग आणि ॲपल वॉच यांसारखी प्रोडक्ट्स कंपनीसाठी महत्त्वाची ठरली.
  • त्यांच्या नेतृत्वाखाली ॲपलने हार्डवेअरसोबतच वियरेबल्स, वायरलेस ऑडिओ, डिजिटल सर्व्हिसेस आणि स्पॅटियल कंप्यूटिंगमध्येही विस्तार केला.
सुमारे गेल्या 15 वर्षांपासून ॲपलच्या सिईओ पदाची धुरा संभाळणारे टिम कूक आज म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी त्यांच्या पदावरून पायउतार होणार आहेत. उद्यापासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून हार्डवेअर इंजिनिअरिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष जॉन टर्नस कंपनीच्या सिईओ पदाची धुरा संभाळणार आहेत. गेल्या 15 वर्षांपासून म्हणजेच सुमारे 2011 मध्ये टिम कूक यांनी ॲपलच्या सिईओ पदाची जबाबदारी स्विकारली आहे. त्यांच्या या 15 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कंपनीत अनेक बदल केले आणि अनेक नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. आता आम्ही तुम्हाला अशा काही प्रोडक्ट्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे टिम कूक यांचा हा प्रवास अविस्मरणीय ठरणार आहे.

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!

नवीन जनरेशन मॅकबुक

2020 मध्ये कंपनीने मॅक कंप्युटरमध्ये Intel प्रोसेसरऐवजी त्यांनी डिझाईन केलेल्या ॲपल सिलीकॉन चिप्सचा वापर करण्यास सुरुवात केली होती. हा बदल टिम कूक यांच्या कार्यकाळातील सर्वात मोठा गेमचेंजर मानला जातो. या चिप्सने यूजर्सना दमदार परफॉर्मंस ऑफर करण्यासोबतच सुधारित ऊर्जा कार्यक्षमता देखील दिली. यूजर्सने देखील हा बदल स्विकारून त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. कालांतराने कंपनीने आयपॅड प्रो आणि आयपॅड एअरमध्ये देखील या चिप्सचा वापर करण्यास सुरुवात केली.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

छोटे ब्लूटूथ ट्रॅकर

बदलत्या तंत्रज्ञानाच्या या जगात अनेकजण स्मार्ट डिव्हाईसचा वापर करतात. हाच मुद्दा लक्षात ठेऊन कंपनीने तयार केलेले एअरटॅग गॅझेट सर्वांसाठी अतिशय फायद्याचे ठरले. याचा आकार छोटा असल्यामुळे हे गॅझेट लोकांना प्रचंड आवडू लागले. खरं तर हे एक ब्लूटूथ बेस्ड ट्रॅकर आहे, ज्याच्या मदतीने यूजर चावी, बॅग, सामान किंवा इतर वस्तू कुठे ठेवल्या आहेत, त्यांचे लोकेशन शोधू शकतात. शिवाय, एअरटॅग ॲपलच्या ‘फाइंड माय’ नेटवर्कशी जोडले जाते, ही बाब त्याला अत्यंत उपयुक्त बनवते.

कंपनीचे स्मार्टवॉच

कंपनीने 2015 मध्ये पहिल्यांदा स्मार्टवॉच बाजारात लाँच केले होते. कंपनीने लाँच केलेल्या या प्रोडक्ट्ला यूजर्सचा मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे हे प्रोडक्ट देखील कंपनीसाठी गेमचेंजर ठरले. कंपनीच्या स्मार्टवॉचमध्ये यूजर्सना अनेक प्रिमियम फीचर्स पाहायला मिळतात, ज्यांचा वापर यूजर त्यांच्या गरजेनुसार करू शकतात.

BSNL Data Plan: डेटा संपण्याची चिंता मिटली! 40 रुपयांहून कमी किंमतीत तब्बल 20GB डेटा; बीएसएनएलचा हा भन्नाट प्लॅन पाहिलात का?

टिम कूक यांच्या कार्यकाळात ॲपल केवळ एक प्रिमिमय हार्डवेअर बनवणारी कंपनी म्हणून मर्यादित राहिली नाही तर कंपनीने वियरेबल्सपासून वायरलेस ऑडियो, कस्टम चिप्स, डिजिटल सर्विसेज आणि स्पॅटियल कंप्यूटिंगपर्यंत कंपनीने त्यांचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Tim cook to step down as apple ceo today these game changing products defined his 15 year journey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 10:32 AM

Topics:  

  • apple
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!
1

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!

BSNL Data Plan: डेटा संपण्याची चिंता मिटली! 40 रुपयांहून कमी किंमतीत तब्बल 20GB डेटा; बीएसएनएलचा हा भन्नाट प्लॅन पाहिलात का?
2

BSNL Data Plan: डेटा संपण्याची चिंता मिटली! 40 रुपयांहून कमी किंमतीत तब्बल 20GB डेटा; बीएसएनएलचा हा भन्नाट प्लॅन पाहिलात का?

Tech Tips: YouTube Shorts पाहून कंटाळलात? एका सेटिंगने बंद करा Shorts Feed, आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स
3

Tech Tips: YouTube Shorts पाहून कंटाळलात? एका सेटिंगने बंद करा Shorts Feed, आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

5G नेटवर्कबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! टॉवरची EMF मर्यादा होणार दुप्पट; आता एकाच टॉवरमधून मिळणार अधिक कव्हरेज
4

5G नेटवर्कबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! टॉवरची EMF मर्यादा होणार दुप्पट; आता एकाच टॉवरमधून मिळणार अधिक कव्हरेज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.