फोटो सौजन्य सोशल मिडिया
Vijay Sales Grand Electronics Sale : सणासुदीचा काळ हा विचारपूर्वक भेटवस्तू देण्याचा, आनंददायी कौटुंबिक भेटीगाठींचा आणि घराच्या कानाकोपऱ्याला नवा, उत्सवी साज देण्याचा काळ असतो. हे क्षण अधिक आनंददायी बनवण्यासाठी भारतातील अग्रगण्य इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन विजय सेल्सने आपल्या बहुप्रतीक्षित ‘ग्रँड इलेक्ट्रॉनिक्स सेल’ची घोषणा केली आहे.
या सेलच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस आणि लाइफस्टाइल तंत्रज्ञानावर ऑनलाइन तसेच देशभरातील १७० हून अधिक स्टोअर्समध्ये आकर्षक बचतीची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. एखाद्या खास व्यक्तीसाठी संस्मरणीय भेटवस्तू निवडायची असो, सणांच्या संध्याकाळसाठी सिनेमॅटिक मनोरंजनाची जागा तयार करायची असो, कौटुंबिक मेजवानीसाठी किचन अद्ययावत करायचे असो किंवा नवीन घरासाठी स्मार्ट सोयीसुविधा जोडायच्या असोत, हा सेल प्रत्येक सणाच्या योजनेसाठी आणि बजेटसाठी योग्य पर्याय उपलब्ध करून देतो. *विजय सेल्सचे डायरेक्टर निलेश गुप्ता यांनी सांगितले की, “सणासुदीच्या काळात कुटुंबे एकत्र येतात, आपल्या घरांचे नूतनीकरण करतात आणि प्रियजनांना काहीतरी खास भेट देतात.
ग्रँड इलेक्ट्रॉनिक्स सेलच्या माध्यमातून प्रत्येक घराला वर्षभरापासून नियोजित केलेल्या वस्तू खरेदी करणे अधिक सोपे व्हावे, असा कंपनीचा प्रयत्न आहे. ग्राहकांना त्यांच्या घराला आणि बजेटला साजेसे तंत्रज्ञान घरी नेऊन सण साजरा करता यावा, यासाठी सर्वोत्तम ब्रँड्स, सणासुदीच्या विशेष किमती, आकर्षक बँक ऑफर्स आणि सुलभ पेमेंट पर्याय ऑनलाइन तसेच स्टोअर्समध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.” या फेस्टिव्ह ऑफरमध्ये विविध श्रेणींवर भरघोस सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.
ऑडिओ उत्पादने आणि स्मार्टवॉचेसची किंमत फक्त ५९९ रुपयांपासून सुरू होते, तर टेलिव्हिजनवर ६५ टक्क्यांपर्यंत, वॉशिंग मशिन्स, एअर कंडिशनर्स आणि मायक्रोवेव्हवर ६० टक्क्यांपर्यंत, लॅपटॉप्सवर ५५ टक्क्यांपर्यंत आणि मोबाईल्स व वॉटर प्युरिफायर्सवर ५० टक्क्यांपर्यंत सूट उपलब्ध आहे. विचारपूर्वक भेटवस्तू देण्यासाठी बॉट पार्टी पल ४५० वायरलेस पार्टी स्पीकरवर ६० टक्के सूट, निन्जा ब्लास्ट पोर्टेबल कॉर्डलेस ब्लेंडर फक्त ३,४९९ रुपयांमध्ये, बॉम्बे शेव्हिंग कंपनीचा बियर्ड ट्रिमर फक्त ५२९ रुपयांमध्ये आणि फिलिप्स वनब्लेड ग्रूमिंग किटवर ३५ टक्के सूट यांसारखे आकर्षक पर्याय समाविष्ट आहेत.
घराला उत्सवाचा सर्वोत्तम साज देण्यासाठी विजय सेल्सच्या व्हाइस ३२-इंच एचडी स्मार्ट क्यूएलईडी टीव्हीवर ६४ टक्क्यांपर्यंत सूट, पॅनासोनिक ७५-इंच ४के क्यूएलईडी स्मार्ट गुगल टीव्हीवर ५६ टक्के सूट, जेबीएल डॉल्बी डिजिटल २.१ साउंड बारवर ४२ टक्के सूट आणि टीसीएल सी६के ५५-इंच क्यूडी-मिनी एलईडी स्मार्ट गुगल टीव्हीवर ४३ टक्के सूट दिली जात आहे.
याशिवाय, २,८०० रुपयांपासून सुरू होणारे एअर फ्रायर्स, ६,६५९ रुपयांपासून सुरू होणारे वॉटर प्युरिफायर्स, तसेच साइड-बाय-साइड रेफ्रिजरेटर्स आणि वॉशिंग मशिन्सवर ५० टक्क्यांपर्यंत सूट उपलब्ध करून देण्यात आली आहे. डिशवॉशर्स, गारमेंट स्टीमर्स, व्हॅक्यूम क्लीनर्स, एअर प्युरिफायर्स, इंडक्शन कुकटॉप्स आणि स्मार्ट फॅन्स यांसारखी उपकरणे पाहुणचार व दैनंदिन जीवन अधिक सुलभ बनवण्यासाठी मदत करतात. सणासुदीच्या खरेदीचे मूल्य अधिक वाढवत ग्राहक माय व्हीएस रिवॉर्ड्स प्रोग्रामद्वारे खरेदी मूल्याच्या ०.७५ टक्के रिवॉर्ड पॉइंट्स मिळवून अतिरिक्त बचत करू शकतात.
यासोबतच एचडीएफसी बँक क्रेडिट व डेबिट कार्डधारकांसाठी १५,००० रुपयांपर्यंत, एचएसबीसी बँक कार्डधारकांसाठी १२,००० रुपयांपर्यंत, आयसीआयसीआय आणि इंडसइंड बँक कार्डधारकांसाठी ७,५०० रुपयांपर्यंत, तसेच स्टँडर्ड चार्टर्ड, बॉबकार्ड, आयडीएफसी फर्स्ट बँक, आरबीएल बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, येस बँक आणि डीबीएस बँकेच्या कार्डधारकांसाठी इन्स्टंट डिस्काउंट्स, प्रॉडक्ट कूपन्स आणि नो-कॉस्ट ईएमआयच्या सुविधा उपलब्ध आहेत. ग्राहक विजय सेल्सच्या सर्व १७० हून अधिक स्टोअर्समध्ये किंवा विजयसेल्स डॉटकॉम या संकेतस्थळावर भेट देऊन या आकर्षक ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.






