परवडणाऱ्या किंमतीत लवकरच लाँच होणार Vivo चा नवीन स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 80W फास्ट चार्जिंगने सुसज्ज (फोटो सौजन्य - vivo)
टेक कंपनी Vivo लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन Vivo V40e लाँच करण्याच्या करण्याच्या तयारीत आहे. येत्या काही दिवसांतच Vivo V40e भारतात लाँच होणार आहे. Vivo V40e अगदी परवडणाऱ्या किंमतीत लाँच होणार असल्याचं सांगतिलं जात आहे. त्यामुळे ग्राहकांना अगदी कमी आणि परवडणाऱ्या किंमतीत अनेक नवीन फीचर्स, पावरफुल बॅटरी आणि उत्तम दर्जाचा कॅमेरा मिळणार आहे. मात्र हा फोन नक्की कधी लाँच होणार आणि त्याची किंमत काय असेल याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लाँचिंग सून या टॅगलाईनसह कंपनीने या स्मार्टफोनचे लँडिंग पेज त्यांच्या वेबसाईटवर जारी केले आहे.
हेदेखील वाचा- AI फीचर्ससह लाँच झाला Infinix Zero 40 5G, वायरलेस चार्जिंग सपोर्ट आणि 50MP अल्ट्रावाइड कॅमेऱ्याने सुसज्ज
Vivo V40e स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. सध्या कंपनीने याच्या लाँच डेटबाबत अधिकृत काहीही सांगितलेले नाही. तथापि, कंपनी सतत आपल्या आगामी स्मार्टफोनचे अपडेट्स शेअर करत आहे. आता कंपनीने या फोनच्या डिझाईन आणि कलर ऑप्शनबद्दल माहिती दिली आहे. याआधी, कंपनीने फोनचा कॅमेरा आणि इतर फीचर्सबाबत तपशील शेअर केला आहे. Vivo चा हा फोन कंपनीच्या V40 सीरीजचा एक परवडणारा फोन आहे, जो Vivo V30e चा उत्तराधिकारी आहे.
कंपनीने Vivo V40e टीझिंग मायक्रोसाइट तयार केली आहे. त्यानुसार हा फोन मिंट ग्रीन आणि रॉयल ब्रॉन्झ कलर ऑप्शनमध्ये लाँच केला जाईल. या फोनच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर हा Vivo V40 Pro आणि Vivo V40 सारखा असेल. फोनच्या मागील कॅमेरा सेटअपमध्ये कॅमेरा लेन्स उभ्या मांडलेल्या आहेत. यासोबतच यात वक्र डिस्प्ले असेल.
हेदेखील वाचा- तुमचा मुलगा युट्युबवर काय बघतोय? कंपनीने मिटवली पालकांची चिंता, लाँच झालं नवीन फीचर
Vivo V40e स्मार्टफोन सप्टेंबरच्या शेवटी भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. फोनबद्दल असे सांगितले जात आहे की हा 8GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 256GB स्टोरेजसह दोन पर्यायांमध्ये रिलीज केला जाईल. या Vivo फोनची किंमत 30 हजार ते 20 हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते.
Vivo V40e स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.77-इंचाचा फुल-एचडी + (2,392 x 1,080 पिक्सेल) 3D वक्र डिस्प्ले दिला जाऊ शकतो. त्याचा रिफ्रेश दर 120Hz असेल आणि स्क्रीन टू बॉडी रेशो 93.3 टक्के असेल. फोनचा डिस्प्ले एसजीएस लो ब्लू लाइट सर्टिफिकेशनसह येईल असे बोलले जात आहे. फोनमध्ये AMOLED डिस्प्ले पॅनल असेल, ज्याची ब्राइटनेस 4,500 nits असेल.
Vivo V40e स्मार्टफोनमध्ये 5,500mAh बॅटरी असेल, जी 80W वायर्ड फास्ट चार्जला सपोर्ट करेल. कॅमेरा स्पेक्सबद्दल बोलायचे झाले तर Vivo V40e स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. या फोनमध्ये 50-MP प्रायमरी कॅमेरा आणि 8-MP लचा दुय्यम कॅमेरा सेंसर असेल. सेल्फी कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर यात 50-MP सेल्फी कॅमेरा असेल.