
Vivo चे ग्राहकांना सरप्राईज! मोठी बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह झाली स्मार्टफोनची एंट्री... जाणून घ्या किंमत
कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 12GB+256GB, 12GB + 512GB आणि 16GB+ 512GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 12GB+256GB या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 3,599 म्हणजेच सुमारे 50,000 रुपये ठेवली आहे. तर 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,999 म्हणजेच सुमारे 56,000 रुपये आणि 16GB+ 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,399 म्हणजेच सुमारे 62,000 रुपये ठेवण्यात आली आहे. Vivo S60 सीरीजमधील हा स्मार्टफोन अर्ली समर ग्रीन, मिडसमर नाइट्स ड्रीम आणि सी ऑफ स्टार्स कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हे नवीन हँडसेट 3 जूनपासून चीनमध्ये विवो ऑनलाइन स्टोअरद्वारे विक्रीसाठी उपलब्ध होतील. (फोटो सौजन्य – X)
डुअल-सिम सपोर्ट असणारा Vivo S60 स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर बेस्ड ओरिजिन ओएस 6 वर चालतो. या हँडसेटमध्ये 6.59-इंच 1.5K (1,260 x 2,750 पिक्सेल्स) अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 459 पीपीआय पिक्सेल डेंसिटी, 1.07 बिलियन कलर्स, HDR सपोर्ट, 100 टक्के डीसीआय-P3 कलर गॅमट आणि 300Hz टच सँपलिंग रेट ऑफर करतो. कंपनीने असा दावा केला आहे की, या डिव्हाईसमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP69 + IP69 ची दमदार रेटिंग दिली आहे.
नव्या डिव्हाईसमध्ये 4nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3 चिपसेट दिला आहे, ज्यामध्ये 2GHz पर क्लॉक करण्यात आलेले तीन एफिशिएंसी कोर्स, 2.8GHz वर क्लॉक करण्यात आलेले चार परफॉर्मेंस कोर्स आणि 3GHz ची पीक क्लॉक स्पीड देणारा एक प्राइम कोर मिळणार आहे. या हँडसेटमध्ये अॅड्रेनो 735 जीपीयू, 16 जीबी पर्यंत रॅम आणि 512 जीबी पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज दिले जाते.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, Vivo S60 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टिम आहे, ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) सह 50-मेगापिक्सेल (f/1.75) चा मुख्य कॅमेरा, 8-मेगापिक्सेल (f/2.2) चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 100x पर्यंत डिजिटल झूम देणारा 50-मेगापिक्सेल (f/2.65) चा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 50-मेगापिक्सेल (f/2.0) चा कॅमेरा दिला आहे. हँडसेट 4K पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी सक्षम आहे.
Vivo S60 स्मार्टफोनमध्ये 90W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,200mAh बॅटरी दिली आहे. डिव्हाईसमध्ये 5G, 4G LTE, वायफाय 6, ब्लूटूथ 5.4, एक यूएसबी टाइप-C पोर्ट, जीपीएस, बेईडू, ग्लोनास, गॅलिलिओ आणि क्यूझेडएसएस हे कनेक्टिविटी पर्याय उपलब्ध आहेत. ऑनबोर्ड सेंसर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये सुरक्षेसाठी 3D अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट सेंसर, ग्रेविटी सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर, एंबियंट लाइट सेंसर, ई-कंपास आणि एक जायरोस्कोप समाविष्ट आहे.