Jio Recharge Plan: अवघ्या 200 रुपयांत मनोरंजनाचा खजिना! नव्या जिओ प्लॅनमध्ये मिळणार युट्यूब प्रिमियम अन् बरंच काही
टेलिकॉम ऑपरेटरने या जिओ ओटीटी पासची किंमत केवळ 200 रुपये ठेवली आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. हा प्लॅन आता भारतात सर्व टेलीकॉम सर्कल्सधील मायजिओ अॅप, Jio.com, रिटेल स्टोर्स आणि थर्ड-पार्टी रिचार्ज प्लॅटफॉर्म्सद्वारे उपलब्ध आहे. हा अॅड-ऑन अॅक्टिव्हेट करण्यासाठी ग्राहकांकडे एक अॅक्टिव्ह जिओ बेस प्लॅन असणं गरजेचं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, बंडलमध्ये मिळणाऱ्या सर्व सर्विसची एकूण किंमत सुमारे 1,500 रुपये प्रति महीना आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जिओ ओटीटी पासमध्ये यूजर्सना 15 ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे सब्सक्रिप्शन ऑफर केले जाणार आहे. यूजर्सना जिओहॉटस्टार मोबाइल + हॉलीवुड आणि प्राईम व्हिडीओ मोबाईल एडिशनचा अॅक्सेस मिळणार आहे. यूजर्स जिओटिव्हीद्वारे 12 आणखी स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवरील कंटेट देखील पाहू शकणार आहेत. यामध्ये सोनी लिव, झी 5, लायंसगेट प्ले, डिस्कवरी प्लस, सन एनएक्सटी, फॅनकोड, कांचा लन्नका, प्लॅनेट मराठी, चौपाल, होइचोई, टाइम्सप्ले आणि तरंग प्लस यांचा समावेश आहे.
या प्लॅनमधील सर्वात खास गोष्ट म्हणजेच यूजर्सना यूट्यूब प्रीमियमचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे. जिओ ओटीटी पाससोबत मिळणाऱ्या या सबस्क्रिप्शनमुळे, सपोर्टेड डिव्हाइसेसवर जाहिरातमुक्त व्हिडिओ पाहणे, बॅकग्राउंड प्लेबॅक आणि ऑफलाइन डाउनलोड यांसारखे फायदे मिळणार आहेत.
ओटीटी सब्सक्रिप्शन व्यतिरिक्त, या पासमध्ये जिओटिव्हीद्वारे 1,000 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्सचा अॅक्सेस देखील मिळणार आहे. यामध्ये जियोस्टार, सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन, सन टीवी नेटवर्क, वार्नर ब्रदर्स डिस्कवरी आणि ईटीवी सारख्या ब्रॉडकास्टर्सचे मनोरंजन, चित्रपट, क्रीडा, प्रादेशिक कार्यक्रम, माहिती व मनोरंजन आणि मुलांसाठीचे कार्यक्रम यांमधील 150 हून अधिक सशुल्क चॅनेलचा समावेश आहे.
कनेक्टिविटीबद्दल बोलायचं झालं तर यूजर्सना 30GB 4G/5G डेटा मिळणार आहे. तर पात्र यूजर्सना अनलिमिटेड 5G डेटाचा फायदा देखील मिळणार आहे. जो ग्राहकाच्या सक्रिय बेस प्लॅनच्या कालावधीसाठी व्हॅलिड असेल आणि त्याची कमाल मर्यादा 28 दिवसांची असेल. तथापि, ग्राहकांनी हे लक्षात घ्यावे की यामध्ये व्हॉइस कॉलिंगच्या लाभांचा समावेश नाही.






