Vivo T4 Pro: दमदार 5G फोनची भारतात धमाकेदार एंट्री, 50MP पेरिस्कोप कॅमेरा आणि 6,500mAh बॅटरीने सुसज्ज
टेक कंपनी Vivo ने पुन्हा एकदा त्यांचा ब्रँड न्यू स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने Vivo T4 Pro या नावाने लाँच केला आहे. या स्मार्टफोनचा कॅमेरा सेटअप याची विशेषत: आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेलचा Sony IMX882 3x पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 6,500mAh ची सिलिकॉन-कार्बन बॅटरी देखील देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक आकर्षक फीचर्स उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनची किंमत 30 हजार रुपयांच्या रेंजमध्ये आहे.
स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर कंपनीने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 27,999 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिअंट ऑफर केला जातो. तसेच या डिव्हाईसच्या 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपये आणि 12GB + 256GB कॉन्फिगरेशन डिव्हाईसची किंमत 31,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे डिव्हाईस दोन रंगाच खरेदीसाठी उपलब्ध आहे, ज्यामध्ये ब्लेज गोल्ड आणि नाइट्रो ब्लू कलर यांचा समावेश आहे. 29 ऑगस्टपासून हा स्मार्टफोन वीवो इंडिया ई-स्टोर, फ्लिपकार्ट आणि निवडक ऑफलाइन रिटेल स्टोर्सवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य – x)
एवढेच नाही तर, कंपनीने फोनच्या लाँचिंगसोबत एक खास बँक ऑफर देखील जाहीर केली आहे जिथे खरेदीदारांना HDFC बँक, एक्सिस बँक आणि SBI यासारख्या निवडक बँक कार्डवर थेट 3,000 रुपयांची त्वरित सूट मिळू शकेल. यासोबतच, कंपनीने 3,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि सहा महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील देत आहे. याशिवाय, जिओ प्रीपेड सबस्क्राइबर्सना नवीन व्हिवो टी4 प्रो हँडसेटसह दोन महिन्यांसाठी 10 ओटीटी अॅप्सचा मोफत प्रीमियम अॅक्सेस देखील मिळेल.
स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल बोलायच झालं तर या डिव्हाईसमध्ये तुम्हाला 6.77 इंचाचा फुल-एचडी+ क्वाड-कर्व्ड AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे. फोनमध्ये स्मूथ स्क्रॉल एक्सपीरियंससाठी 120Hz रिफ्रेश रेट आणि 5,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील ऑफर केली जाणार आहे. डिव्हाईसला पावर देण्यासाठी यामध्ये स्नॅपड्रॅगन 7 जेनरेशन 4 प्रोसेसर आणि 12GB पर्यंत रॅम देखील देण्यात आली आहे. हे नवीन डिव्हाईस अँड्रॉईड 15-बेस्ड फनटच OS 15 ने सुसज्ज आहे.
फोटोग्राफी लवर्ससाठी या डिव्हाईसमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन सपोर्टसह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 3x जूम सपोर्ट वाला 50-मेगापिक्सेलचा Sony IMX882 पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा, 2-मेगापिक्सेलचा बोकेह कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या डिव्हाईसमध्ये 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
याशिवाय हे डिव्हाईस AI कॅप्शन, AI स्मार्ट कॉल असिस्टेंट आणि AI स्पॅम कॉल प्रोटेक्शनसारख्या अनेक खास AI फीचर्स देखील देण्यात आले आहेत. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये AI प्रोफेशनल पोर्ट्रेट, AI इरेज 3.0, AI मॅजिक मूव, AI इमेज एक्सपँडर सारखे अनेक AI इमेजिंग टूल्स देखील देण्यात आले आहेत.