Samsung Galaxy Tab S10 Lite: पावरफुल बॅटरी आणि S Pen सपोर्ट... अनोख्या फीचर्ससह लाँच झाला नवीन Samsung टॅबलेट
Samsung Galaxy Tab S10 Lite हा बहुप्रतिक्षित टॅबलेट आता अखेर अधिकृतपणे लाँच करण्यात आला आहे. हा नवीन टॅबलेट तीन रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. तसेच या टॅबलेटमध्ये पावरफुल बॅटरी देखील देण्यात आली आहे. Samsung Galaxy Tab S10 Lite मध्ये 10.9-इंच डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 600 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. हे टॅबलेट 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजसह लाँच करण्यात आले आहे. यामध्ये 8-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Samsung Galaxy Tab S10 Lite ची किंमत अद्याप जाहिर करण्यात आली नाही. या 5 सप्टेंबरपासून या डिव्हाईसची विक्री सुरु केली जाणार असून हे डिव्हाईस ग्रे आणि सिल्वर कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनीने हे डिव्हाईस 6GB + 128GB आणि 8GB + 256GB रॅम स्टोरेज ऑप्शन्समध्ये लाँच केले आहे. भारतात हे डिव्हाईस कधी लाँच केले जाणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. (फोटो सौजन्य – pinterest)
Samsung Galaxy Tab S10 Lite Android 15 वर चालते आणि यामध्ये 10.9-इंच WUXGA+ (1,320×2,112 पिक्सेल) TFT डिस्प्लेसस आहे, जो 600 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देतो. डिस्प्ले Samsung च्या Vision Booster टेक्नोलॉजीला सपोर्ट करतो. यामध्ये Exynos 1380 चिपसेट देण्यात आला आहे, ज्याला 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडण्यात आलं आहे. स्टोरेजला MicroSD कार्ड स्लॉटद्वारे 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते.
फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर Samsung Galaxy Tab S10 Lite मध्ये 8-मेगापिक्सेलचा सिंगल रियर कॅमेरा यूनिट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या डिव्हाईसमध्ये 5-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. टॅबलेटमध्ये 5G, Bluetooth 5.3 आणि Wi-Fi 6 सपोर्ट हे कनेक्टिविटी ऑप्शन्स उपलब्ध आहेत.
Samsung Galaxy Tab S10 Lite च्या खरेदीसह S Pen देखील मिळतो, जो Samsung Notes आणि Circle to Search सारख्या टूल्सना सपोर्ट करतो. Samsung Notes आता स्मार्ट फंक्शन्ससह येतात, जसे की हँडराइटिंग हेल्प, ज्याद्वारे हँडरिटन नोट्स व्यवस्थित करता येतात आणि गणित सोडवा, ज्याद्वारे गणित समीकरणे सोडवता येतात. हे डिव्हाईस बुक कवर कीबोर्डला देखील सपोर्ट करते ज्यामध्ये Galaxy AI Key देण्यात आले आहे. Samsung Galaxy Tab S10 Lite मध्ये 8,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Galaxy Tab S10 Lite गुडनोट्स, क्लिप स्टुडिओ पेंट, लुमाफ्यूजन, नोटेशन, नोटशेल्फ, आर्कसाईट, स्केचबुक आणि पिक्सार्ट यासह अनेक प्रकारच्या थर्ड-पार्टी क्रिएटिव आणि प्रोडक्टिविटी अॅप्सना समर्थन देते. सॅमसंग या टॅबलेटसह गुडनोट्सचे एक वर्ष मोफत पूर्ण आवृत्ती आणि क्लिप स्टुडिओ पेंटचे सहा महिने मोफत ट्रायल (पहिल्या सबस्क्रिप्शनवर 20 टक्के सूटसह) देखील देत आहे.