Google Pixel 10: iPhone वरून Pixel 10 वर शिफ्ट होणं झालं सोपं, केवळ 30 मिनिटांत ट्रान्सफर होणार डेटा!
स्मार्टफोन युजर्सची सर्वात मोठी समस्या म्हणजे अँड्रॉइडवरून आयफोनवर किंवा आयफोनवरून अँड्रॉइडवर स्विच होणे. ही समस्या सर्वाधिक तेव्हा जाणवते जेव्हा तुम्ही आयफोन सारख्या हाय अँड डिवाइसवरून एखाद्या अँड्रॉइड स्मार्टफोनवर स्विच करता. कॉन्टॅक्ट, फोटोज, व्हाट्सअप चॅट, पासवर्ड आणि इतर महत्त्वाचे ॲप्स नव्या डिवाइसमध्ये सुरक्षित रहातील की नाही, याबाबत अनेक यूजरच्या मनात चिंता असते.मात्र गुगलने युजर्सच्या या समस्येच समाधान शोधलं आहे. अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या गुगल पिक्सेल 10 सिरीज स्मार्टफोनमुळे डेटा ट्रान्सफरची समस्या आता संपली आहे. गुगल पिक्सेल 10 सिरीजमध्ये केवळ 30 मिनिटात आयफोन वरून गुगल पिक्सेलवर त्यांचा डेटा ट्रान्सफर करू शकता.
तसेच जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन गुगल स्टोरवरून ऑर्डर करत असाल तर अशा ग्राहकांना फोनच्या डिलिव्हरी आधी सेटअप गाईड देखील दिले जाणार आहे. या सेटअप गाईडमध्ये सांगितले जाणार आहे की गुगल अकाउंटमध्ये बॅकअप तयार करून कॉन्टॅक्ट, फोटो, पासवर्ड आणि वॉलेट डेटा नवीन गुगल पिक्सेल 10 वर कशा प्रकारे ट्रान्सफर केला जाऊ शकतो आणि तो कशाप्रकारे सुरक्षित राहू शकतो. (फोटो सौजन्य – pinterest)
सर्वात आधी तुम्हाला तुमचा आयफोन एका केबलच्या मदतीने गुगल पिक्सेल 10 ला कनेक्ट करायचा आहे. आता तुमचे फोटो, व्हिडिओ, कॉन्टॅक्ट, कॉल हिस्टरी, मेसेज, आयमेसेज आणि व्हाट्सअप चॅट अगदी सहज गुगल पिक्सेल 10 वर ट्रान्सफर केला जाणार आहे. एवढच नाही तर तुम्ही iCloud Photos देखील Google Photos मध्ये ट्रान्स्फर करू शकतात, ज्यामुळे तुमचे फोटो सुरक्षित राहणार आहेत.
बहुतेक अॅप्स कोणत्याही समस्येशिवाय अगदी सहज ट्रान्स्फर होऊ शकतात. मात्र Spotify किंवा Apple Music सारख्या सब्सक्रिप्शन वाले अॅप्समध्ये तुम्हाला पुन्हा लॉगिन करावं लागणार आहे. तसेच काही पेड अॅप डेवलपर पॉलिसीमुळे पिक्सेलमध्ये ट्रान्स्फर होत नाहीत.
Apple द्वारा RCS मेसेजिंग सपोर्ट केल्यामुळे आता iPhone आणि Pixel यूजर्समधील चॅटिंग अधिक सोपी झाली आहे. यामध्ये रीड रिसीट्स आणि रीएक्शन्स सारख्या सुविधा दिली जात आहे. याशिवाह Google Meet, WhatsApp आणि Messenger सारख्या सर्विसेज तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन ठरू शकतात.
TikTok ची एन्ट्री वाढवणार Instagram चं टेंशन, यूजर्सवर काय होणार परिणाम? कोण ठरणार वरचढ?
Pixel 10 ने केवळ डेटा ट्रान्सफर सोपे बनवले नाही तर तर यामध्ये अनेक असे एक्सक्लूसिव फीचर्स देखील देण्यात आले आहे, जे आयफोन युजर्सना आकर्षित करतात.
Clear Calling फीचर: बॅकग्राउंड नॉइज कमी करते, ज्यामुळे कॉलिंग अधिक क्लिअर बनते.
अॅडवांस फोटो एडिटिंग टूल्स: जुन्या आयफोनच्या मदतीने क्लिक करण्यात आलेलं फोटो देखील AI च्या मदतीने एडिट करू शकता
लोकेशन शेयरिंग: Google Maps च्या मदतीने तुम्ही निवडू शकता की कोण किती वेळ तुमचं लोकेशन पाहू शकत.