Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo चा मास्टरस्ट्रोक! ग्लोबल मार्केटमध्ये झाली नव्या स्मार्टफोनची एंट्री… 7,200mAh बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसरने सुसज्ज

Vivo T5 Launched: टेक कंपनी विवोने एका नव्या स्मार्टफोनसह ग्लोबल मार्केटमध्ये मोठा धमाका केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या डिव्हाईसमध्ये स्नॅपड्रॅगन 6s Gen 2 प्रोसेसर, 50MP ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे. नव्या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 32 हजार रुपये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 30, 2026 | 11:57 AM
Vivo चा मास्टरस्ट्रोक! ग्लोबल मार्केटमध्ये झाली नव्या स्मार्टफोनची एंट्री... 7,200mAh बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसरने सुसज्ज

Vivo चा मास्टरस्ट्रोक! ग्लोबल मार्केटमध्ये झाली नव्या स्मार्टफोनची एंट्री... 7,200mAh बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसरने सुसज्ज

Follow Us
Follow Us:
  • Vivo T5 मध्ये 7,200mAh बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला असून दीर्घकाळ वापराचा दावा करण्यात आला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 6.75-इंच HD+ LCD डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,250 निट्स पीक ब्राइटनेस मिळतो.
  • स्नॅपड्रॅगन 6s Gen 2 प्रोसेसर, 50MP ड्युअल रियर कॅमेरा आणि IP68+IP69 रेटिंगमुळे हा फोन परफॉर्मन्स व टिकाऊपणाचा उत्तम संगम ठरतो.
Vivo Smartphone Launched: स्मार्टफोन कंपनी विवोने निवडक ग्लोबल मार्केटमध्ये Vivo T5 स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा हा स्मार्टफोन मिड-रेंज T5 लाइनअपमधील तिसऱ्या मॉडेलच्या स्वरुपात लाँच केला आहे. लाँच करण्यात आलेला नवीन स्मार्टफोन आधीपासूनच उपलब्ध असलेल्या वीवो टी5 प्रो 5जी आणि वीवो टी5एक्स 5जी सोबत समाविष्ट होणार आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनची किंमत 40 हजार रुपयांहून कमी आहे.

10,000mAh बॅटरीसह हा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल हैराण… सुरुवातीची किंमत केवळ इतकी

विवो टी 5 ची किंमत आणि उपलब्धता

नवा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला असून त्याची किंमत MXN 5,799 म्हणजेच सुमारे 32,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन सध्या विवो मेक्सिकोच्या ऑनलाइन स्टोअरद्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहे. विवो टी 5 काळ्या आणि सोनेरी रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

विवो टी 5 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

नवा विवो टी 5 एक डुअल-सिम स्मार्टफोन आहे, जो अँड्रॉईड 16 वर आधारित ओरिजिनओएस 6 वर चालतो. हा स्मार्टफोन 6.75-इंच HD+ (720×1,570 पिक्सेल्स) एलसीडी टचस्क्रीनने सुसज्ज आहे. जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 83 टक्के एनटीएससी कवरेज आणि 1,250 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करतो. टेक कंपनीने असा दावा केला आहे की, स्मार्टफोनला धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP68 + IP69 रेटिंग दिली आहे.

प्रोसेसर

स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा 6nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 6s जेन 2 चिपसेट दिला आहे. या प्रोसेसरमध्ये 1.9GHz क्लॉक स्पीड असलेले चार एफिशियन्सी कोअर्स आणि 2.9GHz च्या पीक क्लॉक स्पीडसह चार परफॉर्मन्स कोअर्स आहेत. स्मार्टफोनमध्ये 8GB एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB यूएफएस 2.2 इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.

कॅमेरा

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, नव्या विवो स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सिस्टिम दिली आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा f/2.0 अपर्चरवाला 50-मेगापिक्सेलचा आहे. याव्यतिरिक्त, या हँडसेटमध्ये f/2.4 अपर्चर असलेला 2-मेगापिक्सलचा सेकंडरी रियर कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये समोरील बाजूला 32-मेगापिक्सेल (f/2.45) चा कॅमेरा दिला आहे. याच्या बॅक पॅनलवर एक एलईडी फ्लॅश देखील आहे.

eSIM Vs SIM: Android यूजर्समध्ये पुन्हा रंगली चर्चा… कोणता पर्याय ठरतोय सर्वात बेस्ट? निर्णय घेण्यापूर्वी जाणून घ्या

बॅटरी आणि कनेक्टिविटी ऑप्शन्स

नव्या डिव्हाईसमध्ये 44W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,200mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 4G LTE, डुअल-बँड वायफाय, ब्लूटूथ 5.1, एक यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस, बेईडू, ग्लोनास, गॅलिलिओ आणि QZSS चा सपोर्ट दिला आहे. ऑनबोर्ड सेंसर्सबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये एक्सीलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर, ई-कंपास, प्रॉक्सिमिटी सेंसर, IR ब्लास्टर, जायरोस्कोप आणि सिक्योरिटीसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर समाविष्ट आहे.

Web Title: Vivo t5 launched in selected global market starting price is 32000 rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
1

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!
2

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत
3

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी
4

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.