
6500mAh बॅटरी अन् मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी... Vivo च्या नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष; किंमत 20 हजारांहून कमी
विवोने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 19,999 रुपये, 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 21,999 रुपये आणि 6GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन ट्विलाइट शॅडो आणि वेव्ह ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. स्मार्टफोनची विक्री 22 जुलैपासून सुरु होणार आहे. ग्राहक फ्लिपकार्ट, विवो इंडिया ई-स्टोर आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवरून या स्मार्टफोनची खरेदी करू शकतात. लाँच ऑफरअंतर्गत एचडीएफसी, एसबीआय आणि ॲक्सिस बँकेच्या कार्ड्सचा वापर करून खरेदी केल्यास 1,500 रुपयांची त्वरित सवलतही मिळेल. या ऑफरनंतर, फोनची सुरुवातीची प्रभावी किंमत 18,499 रुपये असेल. (फोटो सौजन्य: Vivo)
कंपनीने लाँच केलेल्या नवीन विवो स्मार्टफोनमध्ये 6.74-इंच एलसीडी डिस्प्ले मिळणार आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200 निट्स पीक ब्राइटनेस ऑफर करतो. डिस्प्लेला TÜV Rheinland लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन देखील मिळाले आहे.
परफॉर्मंससाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्यामुळे रोजची कामं, मल्टीटास्किंग, व्हिडीओ स्ट्रीमिंग आणि गेमिंगसाठी अधिक चांगला अनुभव देण्याचा दावा करण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये अँड्रॉईड 16 बेस्ड ओरिजीनओएस 6 दिले आहे.
तसेच, या स्मार्टफोनमध्ये एआय क्रिएशन, एआय ट्रान्सस्क्रिप्ट असिस्ट, एआय कॅप्शन्स, एआय स्क्रीन ट्रांसलेशन, विवो डॉकमास्टर, प्रायव्हेट स्पेस आणि गुगल जेमिनी सारखे एआय टूल्स देखील देण्यात आले आहे, ज्यामुळे प्रोडक्टिविटी आणि कंटेंट क्रिएशन अधिक सोपे होते.
नव्या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 50MP सोनी आयएमएक्स 852 प्रायमरी कॅमेरा दिला आहे. यासोबतच फोनमध्ये एआय UHD, एआय कलर एडजस्टमेंट आणि एआय कटआउट सारखे फीचर्स मिळणार आहेत. कॅमेरा ॲपमध्ये नाईट मोड, पोर्ट्रेट, पॅनोरमा, डॉक्युमेंट्स, स्लो मोशन, टाइम-लॅप्स, प्रोफेशनल आणि लाइव्ह फोटो यांसारखे मोड्स देखील उपलब्ध आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 5MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे, जो नाईट मोड आणि पोट्रेट मोडला देखील सपोट करतो. याशिवाय या डिव्हाईसमध्ये मिलिट्री-ग्रेड ड्युरिबिलीटी, ट्रिपल एंटी-ड्रॉप SGS सर्टिफिकेशन आणि धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP65 रेटिंग दिली आहे.
या स्मार्टफोनमध्ये 6500mAh बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, एकदा चार्ज केल्यावर 15 दिवसांपर्यंतचा स्टँडबाय टाइम, 54 तासांचा कॉलिंग टाइम, 80 तासांचा म्युझिक प्लेबॅक टाइम आणि 48 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक टाइम मिळेल. ही बॅटरी फास्ट चार्जिंगसाठी 44W फ्लॅशचार्जला देखील सपोर्ट करते.