Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo T5X 5G Vs OnePlus Nord CE6 Lite: 25 हजार रुपयांच्या रेंजमध्ये कोण ठरणार वरचढ? खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना

Vivo Vs OnePlus: विवो की वनप्लस? बजेट सेगमेंटमध्ये कोणता स्मार्टफोन खरेदी करावा, असा प्रश्न यूजर्सच्या मनात असतो. दोन्ही स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स वाचून आणि त्यांची तुलना करून तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा योग्य निर्णय घेऊ शकता. सर्वात आधी दोन्ही फोनची तुलना वाचा.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 27, 2026 | 10:37 AM
Vivo T5X 5G Vs OnePlus Nord CE6 Lite: 25 हजार रुपयांच्या रेंजमध्ये कोण ठरणार वरचढ? खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना

Vivo T5X 5G Vs OnePlus Nord CE6 Lite: 25 हजार रुपयांच्या रेंजमध्ये कोण ठरणार वरचढ? खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना

Follow Us
Close
Follow Us:
  • विवो टी 5 एक्स 5G मध्ये मोठी 7,200mAh बॅटरी, तर वनप्लस नॉर्ड सीई 6 लाईटमध्ये 144Hz डिस्प्ले मिळतो.
  • दोन्ही स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 सीरिज प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • क्लीन सॉफ्टवेअरसाठी वनप्लस, तर बॅटरी बॅकअपसाठी विवो हा चांगला पर्याय ठरू शकतो.
भारतातील स्मार्टफोन मार्केटमध्ये बजेट स्मार्टफोन्सची सर्वाधिक चर्चा असते. सध्या बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये चर्चेत असलेले स्मार्टफोन्स आहेत Vivo T5x 5G आणि OnePlus Nord CE 6 Lite. ज्या यूजर्सना कमी किंमतीत दमदार बॅटरी, चांगला कॅमेरा आणि स्मूद परफॉर्मंस पाहिजे आहे, अशा यूजर्सचं लक्ष विवो टी 5 एक्स 5G आणि वनप्लस नॉर्ड सीई 6 लाईटकडे असतं. या स्मार्टफोनच्या किंमती आणि फीचर्समधील फरक जाणून घेऊया.

कमालच! आता कुत्रे-मांजरीही माणसांसोबत मारणार गप्पा? अजब AI डिव्हाईसची जगभरात चर्चा… नेमकं प्रकरण काय?

Vivo T5X 5G Vs OnePlus Nord CE6 Lite: किंमत

वनप्लस स्मार्टफोनच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 23,499 रुपये आहे. तर विवो स्मार्टफोनची किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे. किंमतीच्या बाबतीत विवो स्मार्टफोन ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो. (फोटो सौजन्य – विवो, वनप्लस)

Vivo T5X 5G Vs OnePlus Nord CE6 Lite: डिस्प्ले आणि डिझाईन

दोन्ही स्मार्टफोन मोठ्या एफएचडी+ एलसीडी डिस्प्लेने सुसज्ज आहे. वनप्लस स्मार्टफोनमध्ये 6.72 इंच स्क्रीन देण्यात आली आहे, ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 1,000 निट्स ब्राइटनेस मिळणार आहे. तर विवो स्मार्टफोनमध्ये 6.76 इंचाचा मोठा डिस्प्ले दिला आहे. ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,300 निट्सची पीक ब्राइटनेस आहे. जास्त स्मूद स्क्रोलिंग आणि गेमिंगसाठी स्मार्टफोन शोधत असाल तर OnePlus चा 144Hz रिफ्रेश रेट तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र, प्रखर सूर्यप्रकाशात विवो फोनमध्ये अधिक चांगली दृश्यमानता मिळते. दोन्ही स्मार्टफोन सपाट कडा आणि मॉडर्न लुकसह उपलब्ध आहेत.

Vivo T5X 5G Vs OnePlus Nord CE6 Lite: कॅमेरा सेटअप

फोटोग्राफीमध्ये दोन्ही स्मार्टफोन्स समान पातळीवर आहेत. दोन्ही फोनमध्ये 50MP चा प्राइमरी रियर कॅमेरा आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सोशल मीडिया फोटो, व्हिडीओ कॉलिंग, रील्स आणि डेली फोटोग्राफीसाठी दोन्ही स्मार्टफोन्स चांगला अनुभव ऑफर करण्याचा दावा करतात. स्मार्टफोन कॅमेऱ्यामधील खरं फरक मेगापिक्सलपेक्षा जास्त इमेज प्रोसेसिंग आणि कलर ट्यूनिंगमध्ये पहायला मिळू शकतो. काही युजर्सना विवोचे कॅमेरा कलर्स आवडू शकतात तर काही युजर्सना वनप्लसचे नैसर्गिक प्रोसेसिंग अधिक चांगले वाटू शकते.

Vivo T5X 5G Vs OnePlus Nord CE6 Lite: परफॉर्मेंस आणि सॉफ्टवेअर एक्सपीरियंस

वनप्लस नॉर्ड सीई 6 लाईट मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 एपेक्स प्रोसेसर दिला जातो तर विवो टी 5 एक्स 5G मध्ये डायमेन्सिटी 7400 टर्बो चिप देण्यात आली आहे. दोन्ही प्रोसेसर एकाच प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. त्यामुळे स्मार्टफोनचा रोजचा वापर, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि कॅस्युअल गेमिंगमध्ये जास्त फरक जाणवत नाही. सॉफ्टवेअरबद्दल बोलायचं झालं तर दोन्ही फोन अँड्राईड 16 वर चालतात. वनप्लसमध्ये ऑक्सीजनओएस 16 दिला आहे तर विवो टी 5 एक्स 5G मध्ये ओरिजिनओएस 6 दिला आहे. ज्या युजर्सना क्लीन आणि हलका इंटरफेस आवडतो त्यांच्यासाठी ऑक्सीजनओएस जास्त चांगला ठरू शकतो. तर ओरिजिनओएस अनेक कस्टम फिचर्ससह येतो.

Redmi यूजर्सना मोठा धक्का! कंपनीने वाढवली लोकप्रिय 5G स्मार्टफोन्सची किंमत… खरेदीपूर्वी तपासा नवीन दर

Vivo T5X 5G Vs OnePlus Nord CE6 Lite: बॅटरी

विवो टी 5 एक्स 5G मध्ये 7,200mAh बॅटरी दिली आहे तर वनप्लस नॉर्ड सीई 6 लाईट मध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे. विवो स्मार्टफोन 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात आणि सामान्य वापरात देखील दोन दिवस चालू शकते. जर तुम्ही जास्त प्रवास करत असाल आणि वारंवार चार्जिंग करण्यापासून तुम्हाला सुटका हवी असेल तर तुम्ही विवो टी 5 एक्स 5G ची निवडा करू शकता.

Vivo T5X 5G Vs OnePlus Nord CE6 Lite: कसा घ्याल योग्य निर्णय?

जर तुम्हाला मोठी बॅटरी, जास्त मजबूत बॉडी आणि उत्तम आउट डोअर ब्राईटनेस पाहिजे असेल तर तुमच्यासाठी विवो टी 5 एक्स 5G चा पर्याय योग्य ठरणार आहे. मात्र जर तुम्हाला हलक्या वजनाचा फोन, जास्त स्मूथ डिस्प्ले आणि क्लीन सॉफ्टवेअर एक्सपीरियंस पाहिजे असेल तर तुम्ही वनप्लस नॉर्ड सीई 6 लाईट ची निवड करू शकता.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Vivo आणि OnePlus मध्ये कोणता फोन चांगला आहे?

    Ans: Vivo आणि OnePlus दोन्ही ब्रँड्स चांगले आहेत. कॅमेरा आणि डिझाइनसाठी Vivo तर परफॉर्मन्स आणि क्लीन UI साठी OnePlus प्रसिद्ध आहे.

  • Que: गेमिंगसाठी Vivo की OnePlus कोणता चांगला?

    Ans: गेमिंगसाठी OnePlus स्मार्टफोन अधिक चांगले मानले जातात कारण त्यामध्ये शक्तिशाली प्रोसेसर आणि स्मूथ परफॉर्मन्स मिळतो.

  • Que: कॅमेरासाठी Vivo की OnePlus कोणता चांगला?

    Ans: फोटोग्राफी आणि पोर्ट्रेट मोडसाठी Vivo चे कॅमेरे अधिक लोकप्रिय आहेत.

Web Title: Vivo t5x 5g vs oneplus nord ce6 lite which one is best in budget segment read comparison

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • vivo

संबंधित बातम्या

Redmi यूजर्सना मोठा धक्का! कंपनीने वाढवली लोकप्रिय 5G स्मार्टफोन्सची किंमत… खरेदीपूर्वी तपासा नवीन दर
1

Redmi यूजर्सना मोठा धक्का! कंपनीने वाढवली लोकप्रिय 5G स्मार्टफोन्सची किंमत… खरेदीपूर्वी तपासा नवीन दर

Oppo चा डबल धमाका! तगड्या फीचर्ससह दोन नवे स्मार्टफोन्स लाँच… प्रीमियम लूक आणि फीचर्सची जोरदार चर्चा
2

Oppo चा डबल धमाका! तगड्या फीचर्ससह दोन नवे स्मार्टफोन्स लाँच… प्रीमियम लूक आणि फीचर्सची जोरदार चर्चा

Vivo ने उडवली सर्वांची झोप! 9000mAh बॅटरीसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, किंमत ठरली खास
3

Vivo ने उडवली सर्वांची झोप! 9000mAh बॅटरीसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, किंमत ठरली खास

ठरलं तर मग… भारतात या दिवशी एंट्री करणार नवा Motorola 5G फोन! 50MP कॅमेऱ्यासह मिळणार हे फीचर्स
4

ठरलं तर मग… भारतात या दिवशी एंट्री करणार नवा Motorola 5G फोन! 50MP कॅमेऱ्यासह मिळणार हे फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.