Redmi यूजर्सना मोठा धक्का! कंपनीने वाढवली लोकप्रिय 5G स्मार्टफोन्सची किंमत... खरेदीपूर्वी तपासा नवीन दर
Oppo चा डबल धमाका! तगड्या फीचर्ससह दोन नवे स्मार्टफोन्स लाँच… प्रीमियम लूक आणि फीचर्सची जोरदार चर्चा
टेक कंपनी रेडमीने मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या त्यांच्या दोन 5G फोन्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये Redmi 15 5G आणि Redmi Note 15 5G या दोन स्मार्टफोन्सचा समावेश आहे. जर तुम्ही आता या दोन्हीपैकी कोणताही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहेत. कंपनीने या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत सुमारे 2 हजार रुपयांनी वाढवली आहे. या नव्या किंमती आजपासून लागू झाल्या आहेत. खरं तर, ही दरवाढ शाओमीच्या एका लीक झालेल्या पार्टनर डॉक्युमेंटमधून उघडकीस आली आहे. याबाबत टिपस्टर संजू चौधरीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर शेअर केले आहे. असं सांगितलं जात आहे की, ही एक इंटरनल माहिती आहे, जी Mi होम स्टोर्स आणि ऑफलाइन ट्रेड पार्टनर्सना पाठवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
डिव्हाईसचे 6GB + 128GB व्हेरिअंट 18,499 रुपयांच्या किंमती लाँच करण्यात आले होते. मात्र आता ग्राहकांना हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 20,499 रुपये खर्च करावे लागणार आहे. तर 20,499 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेल्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 22,499 रुपये झाली आहे. स्मार्टफोनचे 8GB + 256GB व्हेरिअंट रुपयांत लाँच करण्यात आले होते. मात्र आता याची किंमत 24,499 रुपये झाली आहे.
या स्मार्टफोनचे 8GB + 128GB व्हेरिअंट 24,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता त्याची किंमत 26,999 रुपये झाली आहे. तर 27,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेल्या 8GB + 256GB व्हेरिअंटसाठी आता ग्राहकांना 29,999 रुपये खर्च करावे लागणार आहे. कंपनीने सर्व व्हेरिअंटची किंमत 2 हजार रुपयांनी वाढवली आहे.
Vivo ने उडवली सर्वांची झोप! 9000mAh बॅटरीसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, किंमत ठरली खास
केवळ रेडमीनेच नाही तर इतर अनेक स्मार्टफोन्स ब्रँड्सनी देखील त्यांच्या डिव्हाईसच्या किंमती वाढवल्या आहेत. भारतात स्मार्टफोनची विक्री करणारा प्रत्येक ब्रँड सध्या डिव्हाईसच्या किंमती वाढवण्यावर भर देत आहे. जागतिक बाजारपेठेत रॅमचा तुटवडा आणि एआय डेटा सेंटर्सकडून वाढती मागणी हे याचे सर्वात मोठे कारण असल्याचे म्हटले जाते, ज्यामुळे मेमरीच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. परिणाम स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये देखील वाढ होत आहे.
Ans: Redmi हा Xiaomi चा स्मार्टफोन ब्रँड आहे आणि ही कंपनी चीनची आहे.
Ans: होय, Redmi स्मार्टफोन कमी किमतीत चांगले फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्स देण्यासाठी ओळखले जातात.
Ans: होय, Redmi कडे बजेटपासून प्रीमियमपर्यंत अनेक 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत.






