Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वारंवार चार्जिंगला लावण्याची कटकट संपणार! Vivo Y32 स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo Y32 Launched: विवोने ग्लोबल मार्केटमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन मोठी बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 10, 2026 | 07:00 AM
वारंवार चार्जिंगला लावण्याची कटकट संपणार! Vivo Y32 स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

वारंवार चार्जिंगला लावण्याची कटकट संपणार! Vivo Y32 स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Follow Us
Follow Us:
  • ग्लोबल मार्केटमध्ये नवा Vivo Y32 लाँच
  • नवा स्मार्टफोन मोठी बॅटरी आणि हाय-रिफ्रेश-रेट वाल्या डिस्प्लेने सुसज्ज
  • विवो वाय 32 ‘ट्वाइलाइट रेड’ आणि ‘सनसेट ऑरेंज’ कलर ऑप्शनमध्ये लाँच
Vivo Smartphone Launched: : टेक कंपनी विवोने अलीकडेच त्यांच्या सर्वात प्रिमियम फोल्डेबल स्मार्टफोन Vivo X Fold 6 सोबत Vivo V80 आणि Vivo S2 FE हे दोन स्मार्टफोन्स देखील भारतात लाँच केले आहेत. या लाँचिंगनंतर आता कंपनीने गुपचूप एक नवीन स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने Vivo Y32 या नावाने लाँच केला आहे. हे नवीन डिव्हाईस Y-सीरीज लाइनअपमध्ये समाविष्ट झाले आहे.

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश

कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी आणि हाय-रिफ्रेश-रेट वाला डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्या यूजर्सना कमी किंमतीत मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोन पाहिजे आहे, अशा यूजर्ससाठी हा स्मार्टफोन एक चांगला पर्याय ठरणार आहे. नव्या स्मार्टफोनचे डिटेल्स जाणून घेऊया.

विवो वाय 32 ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन विवो वाय 32 ‘ट्वाइलाइट रेड’ आणि ‘सनसेट ऑरेंज’ कलर ऑप्शनमध्ये लाँच केला आहे. विवोने बांग्लादेश आणि नेपाळमध्ये त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर हा स्मार्टफोन लिस्ट केला आहे. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत अद्याप जाहिर केली नाही.

विवो वाय 32 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, विवो वाय 32 मध्ये 6.87-इंच एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 1,300 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस मिळणार आहे. फोनमध्ये युनिसॉक टी 7300 चिपसेट मिळणार आहे, ज्यासोबत 4GB किंवा 6GB एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128GB यूएफएस 2.2 स्टोरेज मिळणार आहे. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते.

4G कनेक्टिविटी

विवोने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP68 आणि IP69 रेटिंग मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये अँड्रॉईड 16 मिळणार आहे. तसेच हा स्मार्टफोन 4G कनेक्टिविटीला सपोर्ट करतो. या फोनच्या ‘ट्विलाइट रेड’ वर्जनची जाडी 8.69 मिमी आणि वजन 229 ग्रॅम आहे, तर ‘सनसेट ऑरेंज’ मॉडेलची जाडी 8.79 मिमी आणि वजन 230 ग्रॅमपर्यंत आहे.

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स

कॅमेरा 

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी रियर कॅमेरा मिळणार आहे. फोनमध्ये 2-मेगापिक्सेलचा सेकेंडरी कॅमेरा देखील मिळणार आहे. तर स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 8-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. फोनमध्ये स्टीरियो स्पीकर आणि पावर बटनमध्ये इंटीग्रेटेड साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील मिळणार आहे. फोनमध्ये 44W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh बॅटरी मिळणार आहे.

Web Title: Vivo y32 launched in global market with with 8000mah battery and 44w wired charging support hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश
1

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश

फोल्डेबल स्मार्टफोनच्या दुनियेत खळबळ! Vivo X Fold 6 ने उडवली सर्वांचीच झोप, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
2

फोल्डेबल स्मार्टफोनच्या दुनियेत खळबळ! Vivo X Fold 6 ने उडवली सर्वांचीच झोप, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

नेटवर्क नसतानाही करू शकता कॉल अन् मेसेज! अल्ट्रा लिंक फीचरसह Infinix Smart 20 HDची भारतात एंट्री, जाणून घ्या डिटेल्स
3

नेटवर्क नसतानाही करू शकता कॉल अन् मेसेज! अल्ट्रा लिंक फीचरसह Infinix Smart 20 HDची भारतात एंट्री, जाणून घ्या डिटेल्स

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे
4

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.