Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vodafone Idea 5G: आता यूजर्सना मिळणार सुपरफास्ट इंटरनेट! पश्चिम बंगाल आणि पूर्व भारतातील 10 शहरांमध्ये सुरु झाली 5G सर्विस

Vodafone Idea 5G Service: भारतात 5G नेटवर्कची मागणी आणि टेलिकॉम कंपन्यांमधील स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि यूजर्सना चांगला नेटवर्क अनुभव मिळावा यासाठी Vodafone Idea (Vi) नेही आता मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे लाखो यूजर्सना आता सुपरफास्ट इंटरनेटचा अनुभव मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 24, 2026 | 10:28 AM
Vodafone Idea 5G: आता यूजर्सना मिळणार सुपरफास्ट इंटरनेट! पश्चिम बंगाल आणि पूर्व भारतातील 10 शहरांमध्ये सुरु झाली 5G सर्विस

Vodafone Idea 5G: आता यूजर्सना मिळणार सुपरफास्ट इंटरनेट! पश्चिम बंगाल आणि पूर्व भारतातील 10 शहरांमध्ये सुरु झाली 5G सर्विस

Follow Us
Follow Us:
  • Vodafone Idea ने पश्चिम बंगाल आणि पूर्व भारतातील 10 शहरांमध्ये 5G सेवा विस्ताराची घोषणा केली आहे.
  • मालदा, हल्दिया आणि बहरामपुरमध्ये Vi 5G सेवा लाईव्ह झाली असून उर्वरित शहरांमध्ये जूनपर्यंत सेवा सुरू होणार आहे.
  • Vi यूजर्सना आता सुपरफास्ट इंटरनेट, कमी लेटेंसी, स्मूथ गेमिंग आणि उत्तम व्हिडीओ स्ट्रीमिंगचा अनुभव मिळणार आहे.
भारतातील खाजगी टेलिकॉम कंपनी Vodafone Idea (Vi) वेगाने त्यांच्या 5G सर्विसचा विस्तार करत आहे. कंपनीने भारतातील विविध शहरांमध्ये आधीच 5G सर्विस सुरु केली आहे. तर उर्वरित शहरांंमध्ये 5G सर्विस सुरु करण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरु आहेत. नुकतेच कंपनीने पश्चिम बंगाल आणि पूर्व भारतातील 10 शहरांमध्ये 5G सर्विस सुरु केली असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता इथे असणाऱ्या यूजर्सना देखील सुपरफास्ट इंटरनेटचा अनुभव मिळणार आहे.

OnePlus ग्राहकांना पुन्हा झटका! ‘हे’ 3 डिव्हाईस झाले महाग; खरेदीपूर्वी तपासा नवीन किंमती

Vi 5G सर्विसचा विस्तार

कंपनीने घोषणा केली की, त्यांनी पश्चिम बंगालमध्ये आपल्या व्यापक विस्तार धोरणाचा भाग म्हणून मालदा, हल्दिया आणि बहरामपुरमध्ये 5G सर्विस सुरु केली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, 5G सर्विसचा विस्तार लवकरच दुर्गापुर, आसनसोल, हाबरा-अशोकनगर, बर्धमान, खडगपुर, गंगटोक आणि दार्जिलिंगपर्यंत केला जाणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 5G सर्विस आता 3 शहरांमध्ये सुरु करण्यात आली असून उर्वरित 7 शहरांमध्ये जून महिन्यापर्यंत ही सेवा सुरु केली जाऊ शकते. यामुळे राज्यातील लाखो यूजर्सना हाय-स्पीड इंटरनेट आणि अधिक चांगल्या नेटवर्कचा अनुभव मिळणार आहे. गेल्यावर्षी कंपनीने कोलकाता आणि सिलीगुडीमध्ये त्यांची 5G सर्विस सुरु केली होती. (फोटो सौजन्य – Pinterest) 

5G नेटवर्कची मागणी वाढली

Vi त्यांचे नेटवर्क अधिक मजबूत व्हावे यासाठी सतत प्रयत्न करत आहे. तसेच देशातील छोट्या शहरांपर्यंत पोहोचून तेथील यूजर्सना चांगली नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळावी, यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरु आहेत. भारतात 5G सर्विसची मागणी वेगाने वाढत आहे. स्मार्टफोन यूजर्सना सुपरफास्ट इंटरनेटची आवश्यकता आहे. अशातच Vi वेगाने त्यांच्या 5G सर्विसचा विस्तार करत आहे.

या शहरांमध्ये सुरु झाली Vi 5G सेवा

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Vi ची 5G सेवा सध्या पश्चिम बंगालमधील मालदा, हल्दिया आणि बहरामपुर शहरांमध्ये लाईव्ह झाली आहे. या शहरांमधील Vi यूजर्सना आता वेगवान डाउनलोड स्पीड, अधिक चांगली व्हिडीओ स्ट्रीमिंग आणि कमी लेटेंसीचा फायदा मिळणार आहे. Vi चं असं म्हणण आहे की, या शहरांमधील नेटवर्क इंफ्रास्ट्रक्चर अपग्रेड केले जात आहे, ज्यामुळे यूजर्सना अधिक चांगल्या कनेक्टिविटीचा अनुभव मिळू शकेल.

आकर्षक डिझाईन अन् 6000mAh बॅटरी… HMD Vibe 2 5G ने वाढवली यूजर्सची उत्सुकता, किंमत केवळ 10,999 रुपये

यूजर्सना कसा होणार फायदा?

5G नेटवर्कच्या विस्तारामुळे यूजर्सना वेगवान इंटरनेट स्पीड, अधिक चांगली व्हिडीओ कॉलिंग, हाय-क्वालिटी ऑनलाइन गेमिंग आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय व्हिडीओ स्ट्रीमिंग सारख्या सुविधांचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, डिजिटल सेवा आणि स्मार्ट टेक्नोलॉजीचा वापर करण्यासाठी देखील प्रेरणा मिळणार आहे. Vi च्या विस्तारामुळे हे दिसून येते की 5G आता केवळ मोठ्या महानगरांपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते प्रादेशिक आणि विकसनशील शहरांपर्यंतही पोहोचत आहे. यामुळे भविष्यात डिजिटल कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Vodafone idea expands 5g service in eastern india users will superfast network experience tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 10:28 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • vodafone idea

संबंधित बातम्या

Tech Tips: Google Account सुरक्षित ठेवायचंय? लगेच बदला या 5 महत्त्वाच्या सेटिंग्ज… नाहीतर करावा लागेल पश्चात्ताप
1

Tech Tips: Google Account सुरक्षित ठेवायचंय? लगेच बदला या 5 महत्त्वाच्या सेटिंग्ज… नाहीतर करावा लागेल पश्चात्ताप

Apple ने अचानक का बंद केले लेदर iPhone Cases? काय आहे कारण? वाचून तुम्हीही व्हाल हैराण
2

Apple ने अचानक का बंद केले लेदर iPhone Cases? काय आहे कारण? वाचून तुम्हीही व्हाल हैराण

आता फोनमध्येच सेव्ह होणार तुमची Digital Signature! Google लवकरच घेऊन येतोय नवा ॲप? यूजर्सना कसा होणार फायदा? जाणून घ्या
3

आता फोनमध्येच सेव्ह होणार तुमची Digital Signature! Google लवकरच घेऊन येतोय नवा ॲप? यूजर्सना कसा होणार फायदा? जाणून घ्या

Scam Alert: अरे देवाsss ऑनलाईन पेमेंट केलं, पण सामानाची डिलीव्हरी आलीच नाही! नव्या स्कॅमने उडवली सर्वांचीच झोप; असं राहा सुरक्षित
4

Scam Alert: अरे देवाsss ऑनलाईन पेमेंट केलं, पण सामानाची डिलीव्हरी आलीच नाही! नव्या स्कॅमने उडवली सर्वांचीच झोप; असं राहा सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.