OnePlus ग्राहकांना पुन्हा झटका! 'हे' 3 डिव्हाईस झाले महाग; खरेदीपूर्वी तपासा नवीन किंमती
हा स्मार्टफोन 8GB + 256GB आणि 12GB + 256GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला होता. कंपनीने 8GB + 256GB व्हेरिअंट 38,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत भारतात लाँच केले होते. मात्र आता ग्राहकांना हे स्मार्टफोन व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 41,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर दुसरे 12GB + 256GB व्हेरिअंट भारतात 41,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. आता ग्राहक हे स्मार्टफोन व्हेरिअंट 46,999 रुपयांत खरेदी करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
हा स्मार्टफोन देखील भारतात दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला होता, ज्यामध्ये 8GB + 128GB आणि 8GB+ 256GB यांचा समावेश आहे. स्मार्टफोनचे 8GB + 128GB बेस व्हेरिअंट 29,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता त्याची नवीन किंमत 31,999 रुपये झाली आहे. तर 8GB+ 256GB व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी आता ग्राहकांना 32,999 रुपयांऐवजी 34,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. या स्मार्टफोन व्हेरिअंटच्या किंमतीत सुमारे 2 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
हा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन कंपनीने 3 रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला होता, ज्यामध्ये 6GB+ 128GB, 8GB + 128GB आणि 8GB + 256GB यांचा समावेश आहे. स्मार्टफोनचे 6GB+ 128GB हे बेस व्हेरिअंट 20,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता ग्राहकांना हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 22,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर 8GB + 128GB व्हेरिअंट आता 22,999 रुपयांऐवजी 25,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच, 8GB + 256GB व्हेरिअंटची लाँचिंग किंमत 25,999 रुपये होती. मात्र आता या व्हेरिअंटची किंमत 28,999 रुपये झाली आहे.






