Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Call Merging Scam: अरे देवा, बाजारात पुन्हा आला नवा स्कॅम! कॉल मर्ज करताच सेंड होईल ओटीपी आणि…

स्कॅमर्स आणि हॅकर्स लोकांना कॉल मर्ज करण्यास सांगून त्यांची फसवूणक करत असल्याच्या काही घटना आता समोर आल्या आहेत. कॉल मर्ज होताच तुमचा ओटीपी स्कॅमर्सच्या नंबरवर ट्रांसफर होतो आणि काही क्षणातच तुमचं बँक अकाऊंट रिकामं होतं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 18, 2025 | 11:22 AM
Call Merging Scam: अरे देवा, बाजारात पुन्हा आला नवा स्कॅम! कॉल मर्ज करताच सेंड होईल ओटीपी आणि...

Call Merging Scam: अरे देवा, बाजारात पुन्हा आला नवा स्कॅम! कॉल मर्ज करताच सेंड होईल ओटीपी आणि...

Follow Us
Close
Follow Us:

स्कॅमर्स आणि हॅकर्स यांच्यापासून सुरक्षित राहण्याचा सल्ला आपल्याला नेहमी दिला जातो. कारण आपली एक चूक आपलं संपूर्ण बँक अकाऊंट रिकामं करू शकते. स्कॅमर्स आणि हॅकर्सच्या नवीन स्कॅमबाबत आपल्याला सतत सावध राहण्याचा इशारा दिला जात असतो. आता देखील युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ने एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत सर्वांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. याचं कारण म्हणजे बाजारात सुरु असलेला नवीन स्कॅम.

लवकरच बदलणार UPI पेमेंटची पद्धत! पैसे ट्रान्सफर करण्यासाठी टायपिंगची गरज नाही, तुमच्या आवाजाने होईल सर्व काम

सध्या स्कॅमर्स आणि हॅकर्सनी लोकांची फसवूणक करण्यासाठी नवीन स्कॅम शोधला आहे, आणि हा स्कॅम आहे कॉल मर्जिंग स्कॅम. या घटनांमध्ये युजर्सना कॉल मर्ज करण्यासाठी सांगितलं जाते आणि त्यांच्या नकळत वन-टाइम पासवर्ड (OTP) मिळवला जातो. एकदा स्कॅमर्सना OTP मिळाला की, त्यांना इतर कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसते. (फोटो सौजन्य – Pinterest) 

असे अनेक लोकं आहेत, त्यांना या स्कॅमबद्दल माहिती नाही. त्यामुळे स्कॅमर्स आणि हॅकर्सपासून सावध राहण्यासाठी आणि तुमचं नुकसान होऊ नये, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला कॉल मर्जिंग स्कॅमबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमचे पैसे चोरीला जाऊ नयेत असे वाटत असेल तर तुम्हाला या नवीन स्कॅमबद्दल सर्वकाही माहित असणे आवश्यक आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने विकसित केलेल्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ने त्यांच्या X अकऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये कॉल मर्जिंग स्कॅमबाबत माहिती देण्यात आली आहे.

Scammers are using call merging to trick you into revealing OTPs. Don’t fall for it! Stay alert and protect your money. 🚨💳 Share this post to spread awareness!​#UPI #CyberSecurity #FraudPrevention #StaySafe #OnlineFraudAwareness #SecurePayments pic.twitter.com/kZ3TmbyVag — UPI (@UPI_NPCI) February 14, 2025

UPI ने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, स्कॅमर्स कॉल मर्जिंग वापरून तुमचा ओटीपी चोरत आहेत, ज्यामुळे तुमचे बँक अकाऊंट सहजपणे रिकामे होऊ शकते. या जाळ्यात अडकू नका, जागरूक रहा आणि तुमचे पैसे सुरक्षित ठेवा.

अशा प्रकारे सुरु होतो कॉल मर्जिंग स्कॅम

हा स्कॅम एका अज्ञात कॉलने सुरू होतो. तुम्हाला एका अनोळखी नंबरवरून कॉल येतो. यानंतर, दुसऱ्या बाजूचा व्यक्ती दावा करते की त्याला तुमचा नंबर त्याच्या ओळखीच्या व्यक्तीकडून मिळाला आहे. यानंतर ते तुम्हाला असेही सांगते की ती व्यक्ती वेगळ्या कॉलवर आहे, त्यानंतर लगेच तुमचा कॉल एका दुसऱ्या कॉलसोबत मर्ज केला जातो. कॉल्स मर्ज होताच, तुम्ही नकळत बँकेकडून येणाऱ्या ओटीपी व्हेरिफिकेशन कॉलशी कनेक्ट होता, त्यानंतर तुमच्या फोनवर येणारे ओटीपी स्कॅमर्सच्या फोनवर जाऊ लागतात. आणि यानंतर केवळ काही क्षणातच तुमचं बँक अकाऊंट रिकामं होतं.

iOS 18.4 Update: कधी रिलीज होणार iPhone चं नवीन अपडेट, काय असणार खास? इथे जाणून घ्या सर्वकाही

कॉल मर्जिंग स्कॅमपासून सुरक्षित राहण्यासाठी फॉलो करा या टीप्स

जेव्हा तुम्हाला अज्ञात स्त्रोताकडून येणारे कॉल मर्ज करण्यास सांगितले जाते तेव्हा सावधगिरी बाळगा. जर कोणी तुमच्या बँकेतून किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडून तुम्हाला कॉल करत असल्याचा दावा करत असेल, तर कोणतीही माहिती देण्यापूर्वी कॉलरची पडताळणी करा. जर तुम्हाला तुमच्या नकळत कोणताही OTP मिळाला तर तुम्ही त्याची तक्रार करावी. तुम्ही 1930 वर कॉल करून याबद्दल तक्रार करू शकता, जेणेकरून वेळेवर कारवाई करता येईल.

Web Title: What is call merging scam your otp will be send to scammers in few seconds tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 11:22 AM

Topics:  

  • scam
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.