
Tech Tips: हिवाळ्यात किती असावं तुमच्या फ्रीजचं तापमान? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या सविस्तर
हिवाळ्यात घरातील अनेक वस्तूंमध्ये बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. यातील सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे फ्रीज. हिवाळ्यात फ्रीजची टेंपरेचर सेटिंग बदलणं अत्यंत गरजेचं असतं. कारण हिवाळ्यात बाहेरचे वातावरण अतिशय थंड असते आणि तापमान कमी असते. अशावेळी जर तुम्ही तुमच्या फ्रीजला उन्हाळ्याप्रमाणे हाय सेटिंगवर ठेवलं तर जास्त प्रमाणात विजेचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे हिवाळ्यात फ्रीजची टेंपरेचर सेटिंग बदलणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न फ्रेश राहिल आणि विजेचा वापर देखील कमी केला जाईल. हिवाळ्यात फ्रीजचे योग्य तापमान किती असावे जाणून घेऊया.
बहुतेक फ्रीजमध्ये टेंपरेचर सेटिंग बदसण्यासाठी एक डायल किंवा डिजिटल पॅनल दिलेला असतो, जो 1 ते 7 नंबरपर्यंत असतो. तुम्ही फ्रीजचा नंबर जितका जास्त ठेवाल तेवढे कुलिंग जास्त होणार आहे. उन्हाळ्यात सहसा फ्रीज 4 किंवा 5 नंबरवर सेट केला जातो. मात्र हिवाळ्यात तुम्ही फ्रीज 2 किंवा 3 नंबरवर सेट करू शकता. यामुळे फ्रीजमध्ये योग्य कुलिंग होते आणि जास्त बर्फ देखील साठत नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
हिवाळ्यात जेव्हा खोलीचे तापमान 15°C ते 25°C पर्यंत असते, तेव्हा फ्रीज 3°C ते 4°C दरम्यान सेट करणं योग्य मानले जाते. जर तुमच्या फ्रीमध्ये डिजिटल डिस्प्ले देण्यात आली आहे, तर ही सेटिंग थेट डिग्रीमध्ये सेट केली जाऊ शकते. मात्र जुन्या मॉडेल्समध्ये 2 किंवा 3 नंबर योग्य ठरतो.
हिवाळ्यात बाहेरील तापमान कमी असते. याच कारणामुळे फ्रीजचा कंप्रेसर कमी मेहनत करतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या फ्रीजची सेटिंग 5 ते 6 दरम्यान ठेवली तर फ्रीज गरजेपक्षा जास्त थंड होईल. ज्यामुळे भाज्या गोठू शकतात किंवा फळे खूप लवकर खराब होऊ शकतात.
हिवाळ्यात फ्रीजचा वापर करताना सर्वात आधी त्याचे कूलिंग सेटिंग बदला. यामुळे तुम्हाला विजेचे बिल वाचवण्यासाठी देखील मदत होणार आहे. उन्हाळ्यात फ्रीजचा वापर कोल्डेस्ट मोडवर केला जातो. मात्र हिवाळ्यात त्याची गरज नसते. अशा परिस्थितीत फ्रीजची सेटिंग बदलणं अत्यंत आवश्यक आहे. हिवाळ्यात, तुम्ही तुमचा रेफ्रिजरेटर 2 किंवा 3 नंबरवर सेट करू शकता. यामुळे कंप्रेसर वारंवार बंद होईल, ज्यामुळे रेफ्रिजरेटर थोड्या काळासाठी विश्रांती घेईल, यामुळे वीज वापर कमी होईल आणि फ्रीजचे आयुष्य वाढेल.