VPN नक्की आहे तरी काय? हॅकर्सपासून वाचवतं की जाळ्यात अडकवतं? डाऊनलोड करण्यापूर्वी वाचा सविस्तर
प्रत्येक स्मार्टफोन आणि इंटरनेट युजरने VPN हा शब्द नक्कीच ऐकला असेल. खरं तर हॅकर्सपासून आपला स्मार्टफोन सुरक्षित राहावा यासाठी VPN चा वापर केला जातो. पण VPN नक्की काय आहे आणि ते कशा प्रकारे काम करत, शिवाय VPN खरंच युजर्सचं हॅकर्सपासून संरक्षण करत का, अशा अनेक प्रश्नांची उत्तर युजर्सच्या मनात आहेत. आता आम्ही तुम्हाला तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तर देणार आहोत.
VPN म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. VPN ही एक टेक्नोलॉजी आहे, जी स्मार्टफोन युजर्सचं हॅकर्सपासून रक्षण करते. VPN तुमच्या डिव्हाइस आणि इंटरनेट दरम्यान एक एन्क्रिप्टेड टनल तयार करून ऑनलाइन प्राइवेसी आणि सिक्योरिटी वाढवते. VPN युजर्सचा IP अॅड्रेस लपवते आणि रिमोट सर्व्हरद्वारे ट्रॅफिक रिराउट करते, ज्यामुळे हॅकर्स, आयएसपी (इंटरनेट सर्विस प्रोवाइडर्स) आणि सरकारी एजन्सींना तुमच्या ऑनलाइन अॅक्टिव्हिटीचा मागोवा घेणे कठीण होते. VPN चा वापर सामान्यतः जियो-रेस्ट्रिक्शन्स बायपास करण्यासाठी, ब्लॉक केलेल्या वेबसाइट्समध्ये प्रवेश करण्यासाठी आणि सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कवरील डेटा सुरक्षित करण्यासाठी केला जातो. थोडक्यात हॅकर्सपासून आपल्या डेटाचं संरक्षण व्हावं यासाठी VPN चा वापर केला जातो. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्ही ऑथेंटिक प्रोवाइडर निवडलात तर VPN वापरणे सामान्यतः सुरक्षित असते. पण VPN चे काही धोके देखील आहेत, ज्यामुळे तुमचा डेटा धोक्यात येऊ शकतो. व्हीपीएन (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) इंटरनेट कनेक्शन एन्क्रिप्ट करून आणि आयपी अॅड्रेस मास्क करून ऑनलाइन अॅक्टिव्हिटी सुरक्षित करते. VPN गोपनीयता वाढवतात. भारतात, VPN कायदेशीर आहेत, परंतु प्रदात्यांना पाच वर्षांसाठी वापरकर्त्याचा डेटा लॉग करणे आवश्यक आहे.
मोफत VPN चा वापर – मोफत VPN अनेकदा वापरकर्त्यांचा डेटा लॉग करतात, म्हणजेच ही माहिती जाहिराती किंवा थर्ड पार्टीला विकला जातो.
पूर्णपणे सुरक्षित नाही – VPN तुमची प्रायव्हसी आणि सिक्योरिटी वाढवते यात काही शंकाच नाही. पण ते तुमचं पूर्णपणे रक्षण करू शकत नाही. कारण आता देखील अशा अनेक वेबसाईट्स आहेत ज्या कुकीज आणि फिंगरप्रिंटिंगच्या मदतीने तुम्हाला ट्रॅक करू शकतात.
स्लो इंटरनेट स्पीड – एन्क्रिप्शन आणि रीरूटिंगमुळे, VPN कनेक्शन स्पीड कमी होते.
कायदेशीर परिणाम – कडक इंटरनेट कायदे असलेल्या काही देशांमध्ये, VPN वापरणे नियमांचे उल्लंघन असू शकते.
वाढीव सुरक्षा – हे डेटा एन्क्रिप्ट करते, वापरकर्त्यांना सायबर धोक्यांपासून संरक्षण देते.
प्राइवेसी आणि सिक्योरिटी– हे ट्रॅकर्स आणि सरकारी देखरेखीपासून आयपी अॅड्रेस लपवते.
जियो-रेस्ट्रिक्शन्स बायपास करते – रीजन-लॉक्ड कंटेंट जसं की नेटफ्लिक्स, यूट्यूब किंवा ब्लॉक केलेल्या वेबसाइट्स VPN च्या मदतीने वापरल्या जाऊ शकतात.
सार्वजनिक वाय-फायचा सुरक्षित वापर – हॅकर्सना खुल्या नेटवर्कवरील संवेदनशील डेटामध्ये व्यत्यय आणण्यापासून प्रतिबंधित करते.
ISP थ्रॉटलिंग प्रतिबंधित करते – हे ISP बँडविड्थ निर्बंधांमुळे होणारी इंटरनेट स्लोडाऊन प्रतिबंधित करते.
iOS 18.4 Update: कधी रिलीज होणार iPhone चं नवीन अपडेट, काय असणार खास? इथे जाणून घ्या सर्वकाही
कमी इंटरनेट स्पीड – एन्क्रिप्शनमुळे अतिरिक्त प्रक्रिया होते, ज्यामुळे कनेक्शनची गती कमी होऊ शकते.
प्रीमियम VPN ची किंमत – विश्वसनीय व्हीपीएनसाठी सहसा सशुल्क सदस्यता आवश्यक असते.
संभाव्य VPN ब्लॉक्स – काही वेबसाइट्स आणि सेवा सक्रियपणे VPN ट्रॅफिक ब्लॉक करतात.
कायदेशीर समस्या – VPN नियम देशानुसार बदलतात, काही नियम त्यांच्या वापरावर मर्यादा घालतात.