Price Dropped! नवीन स्मार्टफोन लाँच होताच स्वस्त झाला हा Vivo फोन, आता कमी किंमतीत मिळणार दमदार फीचर्सची मजा
17 फेब्रुवारी रोजी भारतात Vivo चा नवीन स्मार्टफोन Vivo V50 लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 30 हजारांहून अधिक आहे. Vivo चा नवीन स्मार्टफोन लाँच होताच आता जुन्या स्मार्टफोनची किंमत कमी झाली आहे. नव्या स्मार्टफोनच्या लाँचिंगनंतर जुन्या स्माार्टफोनची किंमत तब्बल 9000 रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही कमी किमतीत उत्तम फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Vivo V40e 5G तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो.
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर ही उत्तम ऑफर सुरु करण्यात आली आहे. Vivo V40e 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 9000 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. त्यामुळे या स्मार्टफोनच्या खरेदीवर तुम्हाला उत्तम डील मिळणार आहे. तसेच स्मार्टफोनच्या खरेदीवर तुमची मोठी बचत देखील होणार आहे. या Vivo फोनमध्ये तुम्हाला 50MP सेल्फी कॅमेरासह 5500mAh बॅटरी मिळेल. चला तर मग फ्लिपकार्टवर सुरु असणाऱ्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Vivo V40e 5G च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Flipkart वर 33,999 रुपयांना सूचीबद्ध आहे, परंतु Oh My Gadgets सेलमध्ये तुम्हाला त्यावर मोठी सूट मिळत आहे. Flipkart च्या Oh My Gadgets सेलमध्ये तुम्हाला Vivo V40e 5G स्मार्टफोन 7000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. डिस्काऊंट आणि ऑफरनंतर या स्मार्टफोनची किंमत 26,999 रुपये होते. याशिवाय, तुम्हाला बँक कार्डसह 2000 रुपयांची सूट देखील मिळेल, ज्यामुळे हा स्मार्टफोन तुम्ही 24,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता.
Vivo V40e 5G फोनमध्ये कंपनीने 6.77 इंचाचा AMOLED डिस्प्ले आणि 5500mAh ची शक्तिशाली बॅटरी देखील दिली आहे. याशिवाय, या फोनची डिझाइन देखील खूप स्टायलिश आहे. हा डिस्प्ले 120 हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला देखील सपोर्ट करतो. याशिवाय, हा स्मार्टफोन 2.5 GHz पर्यंतच्या ऑक्टा कोर MediaTek Dimensity 7300 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ग्राफिक्ससाठी, फोनमध्ये Mali-G615 MC2 GPU आहे. याशिवाय, Vivo V40e 5G मध्ये 8GB LPDDR4X रॅम आणि 128GB आणि 256GB असे दोन स्टोरेज पर्याय आहेत.
फोटोग्राफीसाठी, स्मार्टफोनमध्ये सोनी आयएमएक्स 882 सह 50 एमपीचा रियर कॅमेरा आहे. याशिवाय, यात 8 एमपीचा अल्ट्रा वाइड कॅमेरा देखील आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, स्मार्टफोनमध्ये 50 एमपी आय-एएफ ग्रुप फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी, स्मार्टफोनमध्ये 5500mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे. ही बॅटरी 80 वॅट फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते. हा फोन अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.