काय आहे वायरलेस चार्जिंग टेक्नोलॉजी? फोनच्या बॅटरीसाठी किती फायदेशीर? जाणून घ्या सर्वकाही
स्मार्टफोन, हेडफोन आणि इतर स्मार्ट डिव्हाईसेसला चार्जिंगची गरज असते. कारण चार्जिंगशिवाय स्मार्ट डिव्हाईस काम करत नाहीत. डिव्हाईस चार्ज करण्यासाठी वीजेची गरज असते. प्रत्येक डिव्हाईसचा चार्जर वेगळा असतो. स्मार्टफोन आणि हेडफोनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे चार्जर टाईप तुम्ही पाहिले असतील. कधी बी टाईप चार्जर तर कधी सी टाईप चार्जर, चार्जरचे हे सामान्य प्रकार तुम्हाला माहिती असतील. या सर्वांसोबतच आणखी एक चार्जरचा प्रकार देखील खूप प्रसिद्ध होत आहे, हा प्रकार म्हणजे वायरलेस चार्जर.
तुम्ही स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेताना वायरलेस चार्जिंगबद्दल नक्कीच वाचलं असेल. या टेक्नोलॉजीबद्दल लोकांमध्ये अजूनही प्रचंड कुतूहल आहे. वायरलेस चार्जिंग नक्की काय असतं? त्याचा फायदा कसा होतो? याबद्दल आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
वायरलेस चार्जिंगला इंडक्टिव चार्जिंग देखील म्हटलं जातं. वायरलेस चार्जिंग ही एक अशी टेक्नोलॉजी आहे जी इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा वापर करून डिव्हाईस चार्ज करते, ज्यामुळे वस्तूंमध्ये ऊर्जा स्थानांतरित करणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव तयार होतात. पारंपारिक कॉर्डने चार्जिंग करण्यापेक्षा सर्वात मोठा फरक म्हणजे वायरलेस चार्जिंगसाठी डिव्हाइसला प्रत्यक्ष किंवा थेट चार्जिंग स्रोताशी कनेक्ट करण्याची आवश्यकता नसते. पारंपारिक कॉर्डने चार्ज करण्यासाठी स्मार्टफोन त्याला कनेक्ट करावा लागतो. मात्र वायरलेस चार्जिंगमध्ये डिव्हाईस कॉर्डने कनेक्ट करण्याची गरज नाही.
आधुनिक स्मार्टफोन वायरलेस पद्धतीने चार्ज करताना चार्जरमधून स्मार्टफोनमध्ये इलेक्ट्रिक एनर्जी ट्रांसफर करण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा वापर करतात. या टेक्नोलॉजीचा वापर करण्यासाठी तुम्हाला वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करणारा स्मार्टफोन आणि कॉम्पेटबल वायरलेस चार्जरची आवश्यकता असेल. जेव्हा तुम्ही वायरलेस चार्जिंगचा वापर करण्यासाठी कॉम्पेटबल स्मार्टफोनला वायरलेस चार्जरवर ठेवता तेव्हा वेगाने बदलणारे मॅग्नेटिक फील्ड स्मार्टफोनमधील कॉपरच्या कॉइलशी इंटरॅक्ट करते.
त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड एका बंद चक्रात इलेक्ट्रिक एनर्जी रिलीज करते जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वापरून त्या चुंबकीय क्षेत्राशी संवाद साधते. जेव्हा इलेक्ट्रिक करंट रिलीज केला जातो तेव्हा तुमचा स्मार्टफोन चार्ज होतो.
वायरलेस चार्जिंग हे क्विक चार्जिंग, फास्ट चार्जिंग किंवा लाइटनिंग चार्जिंग सारख्या विद्यमान चार्जिंग सिस्टीमपेक्षा हळू असू शकते. वायरलेस चार्जिंग अधिक हीट रिलीज करते. ज्यामुळे डिव्हाईसचे आयुष्य कमी होऊ शकते. याशिवाय बॅटरीचा स्फोट होण्याची देखील शक्यता असते. वायरलेस चार्जिंगसाठी चार्ज होणारे डिव्हाइस एका विशिष्ट ठिकाणी (पॉवरमॅट किंवा डॉक) ठेवावे लागते, अन्यथा फोन चार्ज होणार नाही.