Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone यूजर्सची प्रतीक्षा संपणार? WhatsApp वर येणार मेसेज शेड्यूल फीचर, जाणून घ्या सविस्तर

WhatsApp Feature For iPhone Users: व्हॉट्सअ‍ॅप आयफोन यूजर्ससाठी एक उपयुक्त फीचर आणण्याच्या तयारीत आहे. या फीचरमुळे यूजर्सना मेसेज आधीच शेड्यूल करून ठराविक वेळेला आपोआप पाठवता येणार असून वैयक्तिक आणि ग्रुप चॅट्समध्ये संवाद अधिक सोपा होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 14, 2026 | 02:39 PM
iPhone यूजर्सची प्रतीक्षा संपणार? WhatsApp वर येणार मेसेज शेड्यूल फीचर, जाणून घ्या सविस्तर

iPhone यूजर्सची प्रतीक्षा संपणार? WhatsApp वर येणार मेसेज शेड्यूल फीचर, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • व्हॉट्सअ‍ॅप आयफोनसाठी मेसेज शेड्यूल फीचर विकसित करत असून यूजर्सना ठराविक तारीख आणि वेळेला मेसेज पाठवता येणार आहे.
  • हे फीचर पर्सनल आणि ग्रुप चॅट्स दोन्हीमध्ये काम करणार असून डिलिव्हरीपूर्वी शेड्यूल केलेले मेसेज डिलीट करण्याची सुविधाही मिळणार आहे.
  • रिपोर्टनुसार, मेसेज किमान 10 मिनिटांपासून ते जास्तीत जास्त दोन आठवड्यांपर्यंत शेड्यूल करता येऊ शकतात.
WhatsApp Message Scheduling Feature: आयफोन यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप आयफोन यूजर्ससाठी मेसेज शेड्यूल फीचर डेव्हलप करत आहे. हे फीचर यूजर्सना त्वरित मेसेज पाठवण्याऐवजी त्यांच्या सोयीनुसार एखाद्या तारखेला आणि वेळेला मेसेज पाठवण्याची सुविधा देणार आहे. हे आगामी फीचर पर्सनल आणि ग्रुप अशा दोन्ही चॅट्समध्ये काम करणार आहे. रिपोर्टनुसार, यूजर्स मेसेज लिहून त्याची तो डिलीव्हर होण्याचा वेळ सेट करू शकतात आणि हा मेसेज डिलीव्हर होण्यापूर्वी डिलीट देखील करू शकतात. हे फीचर सध्या चाचणी टप्प्यात आहे आणि अद्याप बीटा यूजर्ससाठी देखील उपलब्ध नाही.

WhatsApp वर येणार पेड सब्सक्रिप्शन! Meta One Plus आणि Premium प्लॅन्सची चर्चा सुरु; इतकी असू शकते किंमत

मेसेज शेड्यूलिंग टूल

फीचर ट्रॅकर WABetaInfo ने शेअर केलेल्या एका पोस्टनुसार, यूजर्स चॅटमध्ये सेंड बटन दाबून नवीन मेसेज शेड्यूलिंग टूल अ‍ॅक्सेस करू शकणार आहेत. मेसेज डिलीव्हरीची वेळ निवडल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप तुमचा मेसेज रांगेत ठेवेल आणि ठरलेल्या वेळी तो मेसेज आपोआप सेंड केला जाईल. हे फीचर सध्या आता सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि अद्याप टेस्टलाईट बीटा रिलीजपर्यंत देखील पोहोचले नाही. व्हॉट्सअ‍ॅपने अद्याप या फीचरच्या लाँचिंग टाईमबाबत कोणतीही माहिती शेअर केली नाही. मात्र रिपोर्टनवरून असे संकेत मिळाले आहेत की, हे फीचर सर्व यूजर्ससाठी रिलीज केले जाण्यापूर्वी सर्वात आधी बीटा टेस्टर्ससाठी आणले जाईल.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

शेड्यूल्ड मेसेज मॅनेज करण्यासाठी काही टूल्स

रिपोर्टमध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की, व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना हे शेड्यूल्ड मेसेज मॅनेज करण्यासाठी काही टूल्स देखील दिले जाणार आहेत. यासाठी अ‍ॅपमध्ये एक वेगळे सेक्शन मिळण्याची शक्यता आहे. या ठिकाणी डिलिव्हर होण्यापूर्वी सर्व पेडिंग मेसेज दिसणार आहेत. तसेच, ज्या चॅट्समध्ये मेसेज शेड्यूल केले जाणार आहेत तिथे एक इंडिकेटर देखील पाहायला मिळेल. यूजर्स डिलव्हर होण्यापूर्वी हे शेड्यूल मेसेज डिलीट देखील करू शकतात आणि समोरील व्यक्तीला याबाबत समजणार देखील नाही.

ग्रुप चॅट आणि वन-टू-वन चॅट सपोर्ट

हे फीचर ग्रुप चॅट आणि वन-टू-वन चॅट दोन्हीला सपोर्ट करणार आहे. शेड्यूल्ड मेसेजेस केवळ त्याच मेंबर्सना डिलीव्हर होणार आहेत जे मेसेज शेड्यूल केले जाण्यापूर्वीपासूनच ग्रुपचा भाग आहेत. जे लोकं मेसेज शेड्यूल केल्यानंतर ग्रुपमध्ये सहभागी झाले आहेत, त्यांना हे मेसेज डिलीव्हर केले जाणार नाहीत. मेसेज किती वेळासाठी शेड्यूल केले जाऊ शकतात, याची चाचणी कंपनी सध्या करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यूजर्स मेसेज टाईप केल्यानंतर कमीत कमी 10 मिनिटांपासून जास्तीत जास्त दोन आठवड्यांपर्यंत मेसेज शेड्यूल करण्यासाठी वेळ निवडू शकतात.

Jio Rs 200 vs Jio Rs 195: 5 रुपयांची बचत की मोठा फायदा? डेटा आणि व्हॅलिडीटीसह कोणता रिचार्ज प्लॅन ठरणार पैसा वसूल?

रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, कंपनी सुरुवातीला हे फीचर केवळ पर्सनल चॅट्ससाठी रिलीज करण्याची योजना आखत होती. मात्र नुकत्याच समोर आलेल्या काही अपडेट्समधून अशी माहिती मिळाली आहे की, हे फीचर आता ग्रुप चॅट्ससाठी देखील रिलीज केले जाणार आहे. हे फीचर यूजर्सना रिमाइंडर्स, बर्थडे विश, अनाउंसमेंट्स आणि ईव्हेंटंसंबिधत महत्त्वाचे मेसेज प्लॅन करण्यासाठी मदत करणार आहे.

Web Title: Whatsapp is planning to release message scheduling feature for iphone users

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
1

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
2

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
3

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
4

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.