Jio Rs 200 vs Jio Rs 195: 5 रुपयांची बचत की मोठा फायदा? डेटा आणि व्हॅलिडीटीसह कोणता रिचार्ज प्लॅन ठरणार पैसा वसूल?
जिओच्या पोर्टफोलिओमध्ये उपलब्ध असलेल्या या 200 रुपयांच्या डेटा पॅकला ओटीटी पास देखील म्हटलं जातं. कंपनी देखील या प्लॅनला याच नावाने प्रमोट करत आहे. कारण या प्लॅनमध्ये 4G डेटासोबतच भरपूर ओटीटी फायदे देखील मिळतात. 200 रुपयांच्या या डेटा पॅकची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 30GB डेटा मिळणार आहे. तसेच हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना ओटीटी फायदे देखील ऑफर केले जातात. यूजर्सना यूट्यूब प्रीमियम, अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ, जिओहॉटस्टार, सोनीलिव्ह, झी 5, लायंसगेट प्ले, डिस्कवरी+, सनएनएक्सटी, कांचा लन्नका, प्लॅनेट मराठी, चौपाल, होइचोई, फॅनकोड, टाइम्स प्ले, तरंग प्लस आणि जियोटिव्ही यांचा अॅक्सेस मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
लक्षात ठेवा की, डेटा पॅक्समधील हे बेनिफिट्स तेव्हाच काम करणार आहेत, जेव्हा यूजरकडे आधीपासूनच सर्विस व्हॅलिडीटी असलेला एक अॅक्टिव्ह प्रीपेड रिचार्ज प्लॅन उपलब्ध असेल. 200 रुपयांच्या या डेटा पॅकमध्ये कोणतेही एसएमएस किंवा व्हॉईस कॉलिंग फायदे ऑफर केले जाणार नाहीत. याव्यतिरिक्त, तुम्हाला IPTV द्वारे 1000 हून अधिक टीव्ही चॅनेल्सचा ॲक्सेस मिळतो आणि ती सर्व लाईव्ह टीव्ही चॅनेल्स आहेत.
New Google Doodle: 2026 FIFA वर्ल्ड कपची रंगत वाढली! गुगलने सादर केलं खास डूडल, तुम्ही पाहिलं का?
रिलाअंस जिओकडे असलेल्या दुसऱ्या डेटा पॅकची किंमत 195 रुपये आहे. या डेटा पॅकची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 15GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये 90 दिवसांचे जिओहॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शन मिळणार आहे. यामध्ये 15GB डेटा एक 4G डेटा आहे आणि हा प्लॅन तेव्हाच काम करणार आहे, जेव्हा यूजरकडे आधीपासूनच अॅक्टिव्ह प्रीपेड रिचार्ज प्लॅन उपलब्ध असेल. या प्लॅनमध्ये यूजर्सना कोणतेही एसएमएस किंवा व्हॉईल कॉलिंग फायदे मिळणार नाहीत. डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 Kbps होणार आहे. इंटरनेट डेटा आणि प्लॅनमध्ये मिळणाऱ्या ओटीटी फायद्यांचा विचार केला तर 200 रुपयांचा डेटा प्लॅन अधिक फायदेशीर ठरू शकतो.






