भारतातील या शहरात सुरु होणार नवं Apple स्टोअर! कधी होणार ओपनिंग? जाणून घ्या सविस्तर
मिळालेल्या माहितीनुसार, अॅपल भारतात त्यांचे सहावे स्टोअर सुरु करण्याचा विचार करत आहे. हे नवीन स्टोअर हैद्राबाद शहरात सुरु होण्याची शक्यता आहे. याशिवाय कंपनी गुरुग्राममध्ये देखील त्यांचे नवीन स्टोअर सुरु करण्याची शक्यता आहे. हे दिल्ली – एनसीआरचे तिसरे रिटेल स्टोअर असू शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)
अॅपलच्या वेबसाईटवर जॉब लिस्टिंगबाबत माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार, कंपनी त्यांच्या पुढील फिजिकल स्टोअरसाठी हायरिंग करत आहे. लिस्टिंगमध्ये हैद्राबादच्या नवीन स्टोअरसाठी ओपनिंग दिली आहे. ज्यामुळे अशी माहिती मिळू शकते की, कंपनी यावर्षी भारतात आणखी एक नवीन स्टोअर सुरु करण्याचे प्लॅनिंग करत आहे. जॉब लिस्टिंगमध्ये गुरुग्रामचे नाव देखील समाविष्ट आहे. अशा परिस्थितीत, गुरुग्राममध्येही अॅपलचे रिटेल स्टोअर उघडले जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.
अॅपलच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, हैद्राबादच्या स्टोअरमध्ये मॅनेजर, सीनियर मॅनेजर आणि स्टोर लीडरसह अनेक टेक्निकल रोल्ससाठी ओपनिंग आहे. याशिवाय, अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी अलीकडेच कंफर्म केले आहे की, मुंबईमध्ये आणखी एक रिटेल स्टोअर ओपन केले जाणार आहे. तथापी, या नवीन अॅपल स्टोअरची ओपनिंग कधी होणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. अॅपल हे स्टोअर वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उघडू शकते.
भारतात टेक जायंट कंपनी अॅपलचा बाजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा बाजार आणखी वाढवण्यासाठी कंपनी भारतात नवीन – नवीन रिटेल स्टोअर सुरु करण्यासाठी प्लॅनिंग करत आहे. कंपनीने पहिले रिटेल स्टोअर एप्रिल 2023 मध्ये ओपन केले होते. मुंबईनंतर कंपनीने दिल्लीमध्ये दुसरे रिटेल स्टोअर ओपन केले होते. गेल्यावर्षी कंपनीने तीन रिटेल स्टोअर ओपन केले आहेत, ज्यामध्ये बंगळुरू, पुणे आणि नोएडा या शहरांचा समावेश आहे. भारतात अॅपलच्या आयफोनची मागणी झपाट्याने वाढली आहे. गेल्या वर्षी कंपनीने भारतीय स्मार्टफोन बाजारात लक्षणीय झेप घेतली, चिनी ब्रँडना मागे टाकले. अॅपल टॉप-5 ब्रँडच्या यादीत सामील झाले आहे.






