Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp युजर्सची मज्जाच मजा! लवकरच येणार नवीन फीचर्स, बदलणार अ‍ॅप वापरण्याचा अनुभव

WhatsApp आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन फीचर्स आणत असते. WABetaInfo ने अहवालात म्हटले आहे की, WhatsApp चे आगामी फीचर सध्या चाचणीच्या टप्प्यात आहे. सध्या, येत्या काही दिवसांत ते बीटा युजर्ससाठी रोलआऊट केले जातील.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 25, 2025 | 12:03 PM
WhatsApp युजर्सची मज्जाच मजा! लवकरच येणार नवीन फीचर्स, बदलणार अ‍ॅप वापरण्याचा अनुभव

WhatsApp युजर्सची मज्जाच मजा! लवकरच येणार नवीन फीचर्स, बदलणार अ‍ॅप वापरण्याचा अनुभव

Follow Us
Close
Follow Us:

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp वापरणाऱ्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता लवकरच WhatsApp वर फीचर्सची रांग लागणार आहे. कंपनी त्यांच्या आगामी फीचर्सवर काम करत आहे. हे फीचर्स लवकरच त्यांच्या युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. WhatsApp मध्ये दोन नव्या फीचर्सचा समावेश केला जाणार आहे. यातील पहिलं फीचर म्हणजे मोशन फोटो संबंधित असणार आहे आणि दुसरं फीचर स्पॉटीफाय संबंधित असणार आहे.

लवकरच येणार स्वदेशी वेब ब्राउझर! भारतीय युजर्सचा डेटा राहणार अधिक सुरक्षित, डिजिटल सेफ्टी आणि प्रायव्हसीही होणार मजबूत

कसं असेल मोशन फोटो फीचर

WhatsApp सध्या त्यांच्या अशा एका फीचरवर काम करत आहे, ज्याद्वारे युजर्स चॅट आणि चॅनेलमध्ये मोशन फोटो शेअर करू शकतील. फीचर ट्रॅकरने शेअर केलेल्या तपशीलांनुसार, मेटाच्या मालकीचे हे मेसेजिंग अ‍ॅप लवकरच एक असे फीचर सादर करू शकते जे युजर्सना त्यांच्या स्मार्टफोनमधून घेतलेल्या फोटोसह एक लहान ऑडिओ-व्हिडिओ क्लिप शेअर करण्याची परवानगी देईल. हे वैशिष्ट्य सध्या अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीनतम बीटा आवृत्तीमध्ये दिसेल, तर iOS युजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅपवर लाइव्ह फोटो हे फीचर रोल आऊट केलं जाऊ शकतं. (फोटो सौजन्य – Pinterest) 

WABetaInfo नुसार, WhatsApp वैयक्तिक चॅट, ग्रुप चॅट आणि चॅनेलमध्ये मोशन फोटो शेअर करण्यासाठी एका फीचरवर काम करत आहे. हे पहिल्यांदा अँड्रॉइडसाठी व्हॉट्सअ‍ॅप बीटा 2.25.8.12 अपडेटमध्ये दिसले, जे प्ले स्टोअरद्वारे बीटा टेस्टर्ससाठी रोल आउट होत आहे. सध्या हे फीचर विकासाच्या टप्प्यात आहे.

असं असेल WhatsApp चं दुसरं फीचर

रिपोर्ट्सनुसार, WhatsApp सध्या iOS युजर्ससाठी स्टेटस अपडेटसाठी एक नवीन फीचर घेऊन येणार आहे. आता युजर्स त्यांच्या WhatsApp स्टेटसवर स्पॉटीफाय वरून संगीत शेअर करू शकतील. सध्या, कंपनी या वैशिष्ट्याची चाचणी घेत आहे आणि ते WhatsApp बीटा अ‍ॅपच्या iOS आवृत्ती 25.8.10.72 मध्ये दिसणार आहे. एकदा हे फीचर WhatsApp वर लाईव्ह झाले की, युजर्सना त्यांच्या स्टेटसमध्ये संगीत शेअर करणे सोपे होईल. यासोबतच, स्टेटसमध्ये संगीत जोडण्यासाठी कॉपी आणि पेस्ट सारख्या स्टेप्स देखील फॉलो कराव्या लागणार नाहीत.

WhatsApp च्या AI राइटिंग टूल्ससह आणखी मजेदार होणार चॅटींग, स्टेटसचा अनुभवही सुधारणार; लवकरच येणार हे खास फीचर्स

WhatsApp आणि स्पॉटीफाय यांच्यातील भागीदारी

वेबसाइट WABetaInfo नुसार, WhatsApp ची मूळ कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्सने स्पॉटिफायसोबत एक विशेष भागीदारी केली आहे. सध्या, कंपनी WhatsApp च्या iOS युजर्ससाठी Spotify इंटिग्रेशनची तयारी करत आहे. एकदा हे वैशिष्ट्य रोल आऊट झाल्यानंतर, युजर्सना स्पॉटीफायच्या शेअर शीटमध्ये एक नवीन ‘स्टेटस’ पर्याय पाहता येईल. याद्वारे, युजर्स गाणे थेट WhatsApp स्टेटसवर शेअर करू शकतील. जेव्हा जेव्हा WhatsApp युजर्स Spotify वरून गाणे शेअर करतील तेव्हा त्यांना त्यांच्या WhatsApp स्टेटसवर गाण्याचे प्रिव्ह्यू दिसेल. या प्रिव्ह्यूमध्ये गाण्याचे शीर्षक, गायकाचे नाव आणि अल्बम कव्हर असेल. त्यात प्ले ऑन स्पॉटीफायची लिंक देखील असेल, ज्यामुळे युजर्स थेट स्पॉटीफायवर गाणे प्ले करू शकतील.

Web Title: Whatsapp is planning to roll out two new features soon wabetainfo give information about it tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 12:03 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • WhatsApp

संबंधित बातम्या

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम
1

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश
2

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश

दसरा-विजयादशमीच्या रंगात Google Gemini; सोशल मीडियावर AI फोटो Viral, वापरा Free Prompt
3

दसरा-विजयादशमीच्या रंगात Google Gemini; सोशल मीडियावर AI फोटो Viral, वापरा Free Prompt

Windows 10 वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! तुमचा कंप्यूटर होणार बंद, 14 ऑक्टोबर 2025 नंतर काय घडणार?
4

Windows 10 वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! तुमचा कंप्यूटर होणार बंद, 14 ऑक्टोबर 2025 नंतर काय घडणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.