
Whatsapp New Scam: WhatsApp वरून येतोय धोका! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
सध्या WhatsApp आपल्या आयुष्याचा एक भाग तयार झाला आहे. फोटो पाठवणं, व्हिडिओ, ऑफिसची कागदपत्रं, सगळं काही WhatsApp वरच चालतं. पण आता याच WhatsApp चा वापर करून लोकांना फसवण्याचा नवा प्रकार सुरू झाला आहे. प्रसिद्ध सायबर सेक्युरिटी कंपनी Quick Heal ने याबद्दल मोठा इशारा दिला आहे. हॅकर्स आता WhatsApp वरून तुमच्या फोनमध्ये विषाणू असलेल्या फाईल्स पाठवत आहेत आणि लोकांना कळत पण नाहीये. Whatsapp New Scam:
हॅकर्सची पद्धत खूपच हुशार आहे. हे आधी कोणाचं तरी WhatsApp अकाउंट हॅक करतात. मग त्या नंबरच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जे नंबर आहेत, त्या सगळ्यांना ते एक फाईल पाठवतात. आता विचार करा, तुम्हाला तुमच्या ऑफिसच्या बॉसकडून किंवा तुमच्या मित्राकडून एखादी फाईल आली तर तुम्ही काय कराल? लगेच उघडाल ना? कारण नंबर ओळखीचा आहे. नेमका याच विश्वासाचा फायदा हे हॅकर्स घेतात.
तुम्हाला वाटतं की, ही फाईल माझ्या ओळखीच्या माणसाने पाठवली आहे, पण खरं तर ती हॅकरने पाठवलेली असते. ती फाईल दिसायला अगदी खरी वाटते. जसं काही बिझनेसचा रिपोर्ट, बिल, किंवा ऑफिसचं डॉक्युमेंट असल्यासारखे वाटते.त्या फाईलला नाव सुद्धा देतात. जेणेकडून तुम्हाला खरी वाटेल. तुम्ही एकदा ती फाईल उघडली की झाला, तुमच्या फोनमधला सगळा डेटा त्यांच्याकडे जाऊ शकतो.
5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
Quick Heal ने सांगितलं आहे की हे लोक रॅन्डम लोकांना टार्गेट करत नाहीत. हे लोक मुद्दाम मोठ्या लोकांना टार्गेट करतात. म्हणजे कंपनीच्या फायनान्स टीममधले लोक, मोठे अधिकारी, CA, बिझनेस करणारे लोक आहेत, कारण यांच्या फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये पैशाचे व्यवहार, कंपनीची गुप्त माहिती असते. ती माहिती मिळाली की हॅकर्सला मोठा फायदा होतो. आणि हे लोक सारखे सारखे त्यांची पद्धत बदलत असतात, त्यामुळे त्यांना पकडणं पण कठीण जातं.
मग वाचायचं कसं? या गोष्टी लक्षात ठेवा, घाबरून जाण्याची गरज नाही, पण थोडं हुशार राहावं लागेल.