
WhatsApp Update: चॅट न उघडताच दिसणार ऑनलाइन स्टेटस? लवकरच येणार Instagram सारखे ग्रीन डॉट फीचर...
Telegram बॅन होताच वेगाने वाढली VPN ची डाउनलोड संख्या! कसं करत काम अॅप? जाणून घ्या सविस्तर
एका रिपोर्टनुसार, मेटाच्या मालकीचे हे प्लॅटफॉर्म आता कोणतेही कॉन्टॅक्ट ऑनलाईन असल्यास त्याच्या प्रोफाईलवर एक ग्रीन डॉट दाखवण्यास सुरुवात करणार आहे. यामुळे चॅट न उघडताच यूजर्सना कळणार आहे की, त्यांच्या कॉन्टॅक्टमधील कोणते यूजर्स ऑनलाईन आहेत आणि आता अॅपचा वापर करत आहे. याशिवाय, असं देखील सांगितलं जात आहे की, मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप अँड्रॉईड अॅपवर चॅट बॅकअप मॅनेज करण्यासाठी देखील एका नवीन फीचरची चाचणी करत आहे. हे फीचर यूजर्सना स्टोरेज कंट्रोल करण्यासाठी मदत करणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
फीचर ट्रॅकर WABetaInfo ने मेसेजिंग प्लॅटफॉर्म एका नवीन ग्रीन डॉट फीचरची चाचणी करताना आढळले आहे. यामुळे कोण ऑनलाईन आहे आणि व्हॉट्सअॅपचा वापर करत आहे, याची माहिती मिळवणं अत्यंत सोपं होतं. हे फीचर कथितपणे अँड्रॉईडसाठी व्हॉट्सअॅप बीटा वर्जन 2.26.24.5 मध्ये आढळले आहे. तुमच्या संपर्कातील यूजर्स ऑनलाईन असल्यास स्क्रीनवर त्यांच्या प्रोफाईल फोटोवर एक ग्रीन डॉट दिसणार आहे.
फीचर ट्रॅकरने दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन स्टेटस दाखवणारा हा ग्रीन डॉट प्रायव्हसी सेटिंगमधून लपवला देखील जाऊ शकतो. या आगामी फीचरचा एक स्क्रीनशॉट देखील शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये हे फीचर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि स्लॅकसारख्या दुसऱ्या अॅपमध्ये मिळणाऱ्या ग्रीन डॉट सारखे दिसत आहे. हे आगामी फीचर रिअल टाईममध्ये चॅट करण्यासाठी कोण उपलब्ध आहे, हे पाहण्यासाठी यूजर्सना मदत करणार आहे. नवीन ग्रीन डॉट सध्या व्हॉट्सअॅपमध्ये उपलब्ध असलेल्या ऑनलाईन टेक्स्ट लेबलला रिप्लेस करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Father’s Day 2026: वडिलांसाठी Google ची खास भेट, फादर्स डे निमित्त शेअर केलं अनोखं Doodle
याशिवाय, व्हॉट्सअॅप एका दुसऱ्या फीचरवर देखील काम करत आहे. यामध्ये एक डेडिकेटेड इन-अॅप बॅकअप मॅनेजमेंट सेक्शनची चाचणी केली जात आहे. हे यूजर्सना स्टोरेज स्पेस रिकामं करण्यासाठी मागील बॅकअप पाहण्याची, डिलीट करण्याची आणि डुप्लिकेट करण्याची सुविधा देणार आहे. हे फीचर सध्या चाचणी टप्प्यात आहे.