Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: टू-स्टेप वेरिफिकेशनमध्ये होऊ शकतो मोठा बदल! PIN ऐवजी मिळू शकतो ‘हा’ पर्याय, यूजर्सवर होणार परिणाम?

WhatsApp Two Step Verification: तुम्ही देखील व्हॉट्सॲपच्या टू-स्टेप वेरिफिकेशन फीचरचा वापर करता का? तर आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कंपनी हे फीचर अपग्रेड करणार असल्याचं सांगितलं जात आहे. कंपनीच्या या निर्णयाचा यूजर्सवर कसा परिणाम होणार, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 24, 2026 | 10:44 AM
WhatsApp Update: टू-स्टेप वेरिफिकेशनमध्ये होऊ शकतो मोठा बदल! PIN ऐवजी मिळू शकतो 'हा' पर्याय, यूजर्सवर होणार परिणाम?

WhatsApp Update: टू-स्टेप वेरिफिकेशनमध्ये होऊ शकतो मोठा बदल! PIN ऐवजी मिळू शकतो 'हा' पर्याय, यूजर्सवर होणार परिणाम?

Follow Us
Follow Us:
  • व्हॉट्सॲप टू-स्टेप वेरिफिकेशनमधील 6 अंकी पिनऐवजी अकाऊंट पासवर्ड आणण्याची चाचणी करत आहे.
  • नवीन पासवर्डमध्ये अक्षरे आणि अंक असतील, त्यामुळे अकाऊंटची सुरक्षा अधिक मजबूत होऊ शकते.
  • हे फीचर सध्या चाचणी टप्प्यात असून टू-स्टेप वेरिफिकेशन वापरणाऱ्या यूजर्ससाठीच पर्यायी स्वरूपात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
WhatsApp Security Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप अकाऊंटची सुरक्षा वाढावी, यासाठी आधीपासूनच टू-स्टेप वेरिफिकेशन फीचर ऑफर करते. यामध्ये यूजर्सच्या अकाऊंटला सुरक्षेचा आणखी एक स्तर जोडला जातो. मात्र आता कंपनी हे फीचर अपग्रेड करणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. कंपनी लवकर न्यूमेरिक पिनच्या ठिकाणी एक डेडिकेटेड अकाउंट पासवर्ड सुरु करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे व्हॉट्सॲप अकाऊंट अधिक सुरक्षित होऊ शकते, असं सांगितलं जात आहे. सध्याच्या टू-स्टेप वेरिफिकेशन सेटिंग्सप्रमाणेच कंपनीचे नवीन फीचर देखील पर्यायी असण्याची शक्यता आहे.

धक्कादायक! मानवाशिवाय AI ने अब्ज डॉलरच्या कंपनी सिस्टीमवर केला सायबर हल्ला; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा

टू-स्टेप वेरिफिकेशन होऊ शकते अपग्रेड

WABetaInfo ने शेअर केलेल्या एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲप एका नवीन सुरक्षा फीचरवर काम करत आहे, जे यूजर्सना सध्याच्या टू-स्टेप वेरिफिकेशन पिनच्या पासवर्डला रिप्लेस करण्याची सुविधा देणार आहे. सध्या व्हॉट्सॲपच्या टू-स्टेप वेरिफिकेशनसाठी 6 अंकी न्यूमेरिक पिन सेट करावा लागतो. असं सांगितलं जात आहे की, जर हे फीचर अपग्रेड झाले तर यूजर्सना असा पासवर्ड सेट करावा लागणार आहे, ज्यामध्ये अक्षरं आणि अंक समाविष्ट असणार आहेत. यामुळे सुरक्षा आणखी मजबूत होऊ शकते. जे यूजर्स व्हॉट्सॲपवर व्यवहार करतात किंवा संवेदनशील माहिती शेअर करतात, अशा यूजर्ससाठी हे फीचर फायद्याचं ठरणार आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

‘या’ यूजर्सवर काहीही परिणाम होणार नाही

खरं तर, व्हॉट्सॲप यूजर्ससाठी टू-स्टेप वेरिफिकेशन एक ऑप्शनल फीचर आहे. यामुळे जे यूजर्स व्हॉट्सॲपच्या टू-स्टेप वेरिफिकेशन फीचरचा वापर करत नाहीत, त्यांच्यावर या बदलाचा काहीही परिणाम होणार नाही. असं सांगितलं जात आहे की, हे आगामी फीचर सध्या चाचणी टप्प्यात आहे आणि अद्याप बीटा यूजर्ससाठी देखील उपलब्ध केले नाही. लाँचिंगपूर्वी कंपनी या फीचरबाबत मोठा निर्णय घेत यामध्ये काही बदल देखील करू शकते.

Free Fire MAX: ‘समर रिंग’ इव्हेंट लाईव्ह! प्लेअर्सना मिळणार मिळणार सरप्राइझ रिवॉर्ड्स, क्लेम करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स

असे मॅनेज करा टू-स्टेप वेरिफिकेशन फीचर

यूजर्स त्यांच्या व्हॉट्सॲप अकाऊंटमध्ये टू-स्टेप वेरिफिकेशन सेटिंग्स मॅनेज करू शकतात. ॲपमध्ये तुम्हाला हे फीचर चालू करण्याचा, बंद करण्याचा आणि पिन बदलण्याचा पर्याय देखील मिळतो.

  • व्हॉट्सॲप सेटिंगमध्ये जा किंवा प्रोफाईल फोटोवर टॅप करा.
  • आता अकाऊंट पर्याय निवडा.
  • आता टू-स्टेप वेरिफिकेशन ऑप्शनवर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला ऑन आणि ऑफ असे दोन्ही पर्याय दिसतील. तुम्ही तुमच्या सोयीनुसार पर्याय निवडू शकता.
  • तसेच यूजर्स टू-स्टेप वेरिफिकेशनला जोडलेला ईमेल ॲड्रेस देखील अपडेट करू शकणार आहेत.

Web Title: Whatsapp may update their two step verification feature now user will get this option instead of numeric pin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

धक्कादायक! मानवाशिवाय AI ने अब्ज डॉलरच्या कंपनी सिस्टीमवर केला सायबर हल्ला; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा
1

धक्कादायक! मानवाशिवाय AI ने अब्ज डॉलरच्या कंपनी सिस्टीमवर केला सायबर हल्ला; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा

Free Fire MAX: ‘समर रिंग’ इव्हेंट लाईव्ह! प्लेअर्सना मिळणार मिळणार सरप्राइझ रिवॉर्ड्स, क्लेम करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स
2

Free Fire MAX: ‘समर रिंग’ इव्हेंट लाईव्ह! प्लेअर्सना मिळणार मिळणार सरप्राइझ रिवॉर्ड्स, क्लेम करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स

Samsung Foldables: भारतीय बाजारात सॅमसंगचा धमाका; नव्या पिढीसाठी Galaxy Z Fold8 Ultra, Fold8 आणि Flip8 ची एंट्री
3

Samsung Foldables: भारतीय बाजारात सॅमसंगचा धमाका; नव्या पिढीसाठी Galaxy Z Fold8 Ultra, Fold8 आणि Flip8 ची एंट्री

Aadhaar Card हरवलंय किंवा डाऊनलोड होत नाहीये? मग चिंता करु नका, काही मिनिटांत अशाप्रकारे समस्येला करा दूर
4

Aadhaar Card हरवलंय किंवा डाऊनलोड होत नाहीये? मग चिंता करु नका, काही मिनिटांत अशाप्रकारे समस्येला करा दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.