Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये लवकरच येणार नवा इंटरफेस आणि ‘चॅट बबल्स’ फीचर… यूजर्सचा अनुभव बदलणार

मेसेजिंग अ‍ॅपमध्ये पुन्हा मोठे बदल होण्याची शक्यता असून यूजर्सचा अनुभव अधिक सोपा आणि वेगवान करण्यावर भर दिला जात आहे. नव्या अपडेटमध्ये इंटरफेससोबतच मल्टीटास्किंगसाठी उपयुक्त फीचर्स येण्याची अपेक्षा आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 26, 2026 | 11:26 AM
WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये लवकरच येणार नवा इंटरफेस आणि ‘चॅट बबल्स’ फीचर... यूजर्सचा अनुभव बदलणार

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये लवकरच येणार नवा इंटरफेस आणि ‘चॅट बबल्स’ फीचर... यूजर्सचा अनुभव बदलणार

Follow Us
Follow Us:
  • व्हॉट्सॲपमध्ये नवीन इंटरफेस आणि टॉप नेविगेशन बारमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
  • नोटिफिकेशन बबल्स फीचरमुळे इतर अ‍ॅप वापरताना देखील चॅट्स ओपन करून रिप्लाय करता येणार आहे.
  • हे फीचर्स सध्या बीटा टेस्टिंगमध्ये असून लवकरच सर्व यूजर्ससाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
सबस्क्रिप्शन प्लॅन, डिसअपियरिंग मेसेज फीचर, बिझनेस चॅट्स या तगड्या फीचर्सनंतर आता मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा एकदा एका नव्या अपडेटची तयारी करत आहे. कंपनी सध्या एका नवीन आणि फ्रेश इंटरफेसवर काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. या नव्या अपडेटमळे अ‍ॅपच्या टॉप नेविगेशन बारसह यूजर्सच्या इंटरॅक्शनची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. WaBetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, मेटाच्या मालकीचा इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेक्स्ट-बेस्ड अ‍ॅप नावाऐवजी ऑफिशियल लोगो लावू शकतो. अशी आशा व्यक्त केली जात आहे की, या अपडेटमुळे नवीन वैशिष्ट्ये येण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये टॉप सेक्शनमधून स्टेटस अपडेट्सपर्यंत अधिक सहज पोहोचण्याचा समावेश आहे.

३६,००० किलोमीटर उंचीवरून रशियाच्या इलेक्ट्रो-एलने टिपली पृथ्वी! अंतराळातून दिसतोय भारत हिरवागार

नव्या टूल्सवर काम सुरु

विजुअल चेंजेससह मेसेजिंग प्लॅटफॉर्म अशा नव्या टूल्सवर देखील काम करत आहे, ज्याचा उद्देश चॅट्स आणखी वेगवान आणि इंटरॅक्शन अधिक सोपं करणं असं आहे. WaBetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य एडिशन्समध्ये फेसबुक मेसेंजरप्रमाणे नोटिफिकेशन बबल्स सपोर्ट देखील समाविष्ट आहे. हे फीचर अँड्रॉईड सिस्टिमसंबंधित आहे, जे चॅट्सना स्क्रीनवर फ्लोटिंग आयकॉन्सप्रमाणे दाखवण्याची परवानगी देते. (फोटो सौजन्य – Pinterest) 

हे बबल्स यूजर्सना दुसरा अ‍ॅप बंद न करता मेसेज उघडण्याची आणि रिप्लाय करण्याची सुविधा देतात. जेव्हा यूजर्स बबलवर टॅप करतात, त्यावेळी एक छोटी चॅट विंडो ओपन होते, ज्यामुळे मल्टीटास्किंगदरम्यान अगदी सहज रिप्लाय केला जाऊ शकतो. हे फीचर संभाषणे नेहमी उपलब्ध ठेवण्यासाठी तयार केले आहे, विशेषतः जेव्हा यूजर्स व्हिडिओ पाहणे किंवा ॲप्स ब्राउझ करणे यांसारख्या इतर कामांमध्ये व्यस्त असतात. अशावेळी नवं अपडेट यूजर्ससाठी फायद्याचं ठरणार आहे.

Infinix GT 50 Pro ची धमाकेदार एंट्री! गेमर्ससाठी ठरणार खास; दमदार परफॉर्मन्स, GT ट्रिगर्स आणि प्रीमियम फीचर्सने सुसज्ज

रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, नोटिफिकेशन बबल्स अँड्रॉईड 11 आणि त्यावरील वर्जनवर चालणाऱ्या डिव्हाईसला सपोर्ट करणार आहे. इथे फीचर अधिक स्थिर आणि सिस्टिममध्ये चांगल्या प्रकारे एकीकृत झालेले वाटते. याची उपलब्धता डिव्हाईस सेटिंग्स आणि सिस्टम कम्पॅटिबिलिटीवर अवलंबून असते. कारण सर्व अँड्रॉईड वर्जन्स बबल्स एकाच प्रकारे हँडल करू शकणार नाही. रिडिझाईन करण्यात आलेला टॉप बार आणि नोटिफिकेशन बबल फीचर दोन्ही सध्या चाचणी टप्प्यात आहेत. हे फीचर्स व्यापक प्रकाशनापूर्वी बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. येत्या काही महिन्यांत हे सर्वांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Web Title: Whatsapp new update redesigned interface and chat bubbles feature coming soon users will get better experience tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… HMD Vibe 2 5G चा नवा व्हेरिअंट लाँच; किंमत 15 हजारांहून कमी
1

6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… HMD Vibe 2 5G चा नवा व्हेरिअंट लाँच; किंमत 15 हजारांहून कमी

काय सांगता! आता YouTube व्हिडीओ शेअर करण्यासाठी WhatsApp ची गरज नाही… नवं फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर
2

काय सांगता! आता YouTube व्हिडीओ शेअर करण्यासाठी WhatsApp ची गरज नाही… नवं फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर

SIM Swap Scam: फोनमधून अचानक गायब झालं नेटवर्क! सॉफ्टवेअरमधील त्रुटी की सिम हॅकिंगचा संकेत? असं राहा सुरक्षित
3

SIM Swap Scam: फोनमधून अचानक गायब झालं नेटवर्क! सॉफ्टवेअरमधील त्रुटी की सिम हॅकिंगचा संकेत? असं राहा सुरक्षित

ना दिवसा, ना रात्री! आता तुमच्या स्मार्टफोनमध्ये नाही वाजणार Emergency Alarm… सरकारने का घेतला हा मोठा निर्णय?
4

ना दिवसा, ना रात्री! आता तुमच्या स्मार्टफोनमध्ये नाही वाजणार Emergency Alarm… सरकारने का घेतला हा मोठा निर्णय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.