Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: व्हॉट्सॲप वापरण्याचा अनुभव बदलणार! iPhone यूजर्सना मिळणार नवं अपडेट, आता iMessage सारखा असणार चॅटचा लूक

आयफोन वापरणाऱ्या WhatsApp यूजर्ससाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे. व्हॉट्सॲप आपल्या आयओएस ॲपमध्ये चॅटिंगचा अनुभव अधिक आकर्षक बनवण्यासाठी आयमेसेजसारखा नवीन इंटरफेस आणि रिफ्रेश्ड मेसेज बबल डिझाइन आणण्याच्या तयारीत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 26, 2026 | 09:50 AM
WhatsApp Update: व्हॉट्सॲप वापरण्याचा अनुभव बदलणार! iPhone यूजर्सना मिळणार नवं अपडेट, आता iMessage सारखा असणार चॅटचा लूक

WhatsApp Update: व्हॉट्सॲप वापरण्याचा अनुभव बदलणार! iPhone यूजर्सना मिळणार नवं अपडेट, आता iMessage सारखा असणार चॅटचा लूक

Follow Us
Follow Us:
  • WhatsApp लवकरच आयफोन यूजर्ससाठी आयमेसेज-प्रेरित नव्या चॅट बबल डिझाइनचे अपडेट आणू शकते.
  • नवीन अपडेटमध्ये अधिक गोलाकार मेसेज बबल्स आणि फोटो, व्हिडिओ, जीआयएफसाठी बॉर्डरलेस डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे.
  • हे फीचर सध्या आयओएस बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध असून लवकरच अधिक यूजर्सपर्यंत पोहोचू शकते.
व्हॉट्सॲप वापरणाऱ्या आयफोन यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आयफोन यूजर्सना लवकरच एक नवीन अपडेट मिळण्याची शक्यता आहे. मेटाच्या मालकिचे इंस्टंट मेसेजिंग ॲप आयओएससाठी एक रिफ्रेश्ड मेसेज बबल डिझाईन सादर करण्याचे प्लॅनिंग करत आहे. नवीन अपडेटमुळे मेसेज बबल्स पूर्वीपेक्षा जास्त गोलाकार दिसणार आहेत आणि यासोबत शेअर करण्यात आलेला मीडिया ट्रेडिशनल बबल बॉर्डर्सशिवाय डिस्प्लेवर दिसणार आहे. हे नवीन डिझाइन लिक्विड ग्लास इंटरफेसशी जुळणारे आहे. हे नवीन मेसेज बबल डिझाइन सार्वजनिकरित्या कधी रोलआउट केले जाईल याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही.

Jio VS Airtel: जिओचा 999 रुपयांचा प्लॅन की एअरटेलचा 899 रुपयांचा प्लॅन? डेटा आणि आणि ओटीटी फायद्यांमध्ये कोण आहे भारी?

व्हॉट्सॲप मेसेज बबल

Wabetainfo.com च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲप आयओएससाठी एक रीडिजाइन करण्यात आलेल्या मेसेज बबलची चाचणी करत आहे. नवीन इंटरफेस सध्या लेटेस्ट टेस्टफ्लाईट बिल्ड चालवणाऱ्या निवडक बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, स्टेबल ॲप स्टोअरवाल्या काही यूजर्सना देखील हा बदल पाहायला मिळू शकतो. रिडिझाईन करण्यात आलेले चॅट बबल्स iOS वर्जन 26.29.10.70 साठी व्हॉट्सॲप बीटामध्ये आढळून आले आहेत.  (फोटो सौजन्य: Pinterest)

नवीन अपडेटचा स्क्रीनशॉट शेअर

रिपोर्टमध्ये एक स्क्रीनशॉट देखील शेअर करण्यात आला आहे. जो जुन्या आणि नव्या मेसेज बबल डिझाईनमधील अंतर हायलाईट करतो. सध्याच्या मेसेज बबल्समध्ये हलके राउंडेड कॉर्नर्स आहेत, तर नवीन डिझाईनमध्ये अधिक गोलाकार आणि सौम्य आकार आहे. हे लेटेस्ट स्टाईलमध्ये ॲपलच्या आयमेसेजच्या चॅट बबल्स सारखा दिसतो. हा नवीन बदल ॲपलच्या लिक्विड ग्लास डिझाइन लँग्वेजला देखील पूरक आहेत.

बॉर्डरशिवाय दिसणार फोटोज, व्हिडीओ

हे रिडिझाईन चॅट्समध्ये मीडिया कंटेट पाहण्याची पद्धत देखील बदलणार आहे. रिपोर्टमध्ये असं सांगितलं आहे की, फोटोज, व्हिडीओ आणि GIFs आता व्हॉट्सॲपमध्ये ट्रेडिशनल बॉर्डरवाल्या मेसेज बबल्समध्ये दिसणार नाहीत. तर आता हा कंटेट बॉर्डरशिवाय दिसणार आहे. येत्या काही आठवड्यांत हे अपडेट जास्तीत जास्त यूजर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बजेट सेगमेंटमध्ये iQOO चा धमाका! पावरफुल फीचर्स आणि स्टायलिश लूकसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत केवळ इतकी

व्हॉट्सॲप नवीन फीचर्स

व्हॉट्सॲप येत्या काही आठवड्यांत अनेक नवीन फीचर्स लाँच करण्याची देखील तयारी करत आहे. अलीकडेच, व्हॉट्सॲप एका नवीन सुरक्षा फीचरची चाचणी करताना आढळले होते, ज्यामुळे यूजर्सना त्यांचा सध्याचा टू-स्टेप व्हेरिफिकेशन पिन बदलून पासवर्ड वापरता येईल. तसेच, कंपनीने आपल्या अँड्रॉइड आणि आयओएस ॲप्सच्या स्टेबल आणि बीटा या दोन्ही वर्जन्समध्ये युझरनेम सपोर्ट जोडल्याचेही वृत्त आहे.

Web Title: Whatsapp update iphone users to get imessage like chat bubbles new ios design

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

AI बदलत राहील, पण तुमची मेमरी नाही! Kemoryची भारतात दमदार एंट्री; आता एकाच ठिकाणी जतन होणार तुमचं ज्ञान
1

AI बदलत राहील, पण तुमची मेमरी नाही! Kemoryची भारतात दमदार एंट्री; आता एकाच ठिकाणी जतन होणार तुमचं ज्ञान

Tech News: ऑफर ऑफर ऑफर! Samsung चा ‘हा’ टॅब्लेट घेताय? मग डिस्काउंटचे पर्याय वाचाच…
2

Tech News: ऑफर ऑफर ऑफर! Samsung चा ‘हा’ टॅब्लेट घेताय? मग डिस्काउंटचे पर्याय वाचाच…

Itel चा भन्नाट ‘टफ’ फोन बाजारात दाखल! 2 मीटर ड्रॉप प्रोटेक्शनपासून सुपर साऊंडबॉक्सपर्यंत… असे आहेत डिव्हाईसचे खास फीचर्स
3

Itel चा भन्नाट ‘टफ’ फोन बाजारात दाखल! 2 मीटर ड्रॉप प्रोटेक्शनपासून सुपर साऊंडबॉक्सपर्यंत… असे आहेत डिव्हाईसचे खास फीचर्स

Samsung ग्राहकांना मोठा धक्का! दोन मिड-बजेट स्मार्टफोन पुन्हा महागले, किंमतीत थेट 6 हजारांपर्यंत वाढ
4

Samsung ग्राहकांना मोठा धक्का! दोन मिड-बजेट स्मार्टफोन पुन्हा महागले, किंमतीत थेट 6 हजारांपर्यंत वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.