व्हॉट्सॲपवर सध्या फसवणुकीची एक नवीन घटना समोर येत आहे. डिजिटल वेडिंग इन्व्हिटेशनच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात आहे. हिमाचल प्रदेश पोलिसांनी यासंदर्भात लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आजकाल सायबर गुन्हेगार लोकांना लुटण्यासाठी रोज नवनवीन मार्ग शोधत आहेत आणि त्याचा अवलंब करत आहेत. व्हॉट्सॲप हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग ॲप आहे. हे पाहता सायबर गुन्हेगार व्हॉट्सॲप युजर्सना आपला शिकार बनवत आहेत.
बनावट डिजिटल लग्नपत्रिका पाठवत आहेत
रिपोर्टनुसार, सायबर गुन्हेगार लोकांना व्हॉट्सॲप मेसेजमध्ये डिजिटल लग्नपत्रिका पाठवत आहेत. युजर्सने ते कार्ड उघडण्यासाठी क्लिक करताच, त्यांच्या डिव्हाइसचा प्रवेश स्कॅमरपर्यंत पोहोचतो आणि त्यांची फसवणूक होते. घोटाळेबाज लोकांना व्हॉट्सॲपवर लग्नाच्या आमंत्रणाचे मेसेज पाठवतात आणि त्यासोबत एक फाईल देखील पाठवतात, जी त्यांना डाउनलोड करण्यास सांगितले जाते.
टेक संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
सध्या भारतात लग्नाचा हंगाम सुरु आहे. अशा परिस्थितीत लोक या जाळ्यात सहज अडकतात. हॅकर्सनी पाठवलेल्या बनावट आमंत्रणांमध्ये APK फाइलचा समावेश आहे. युजर्सने ही फाईल उघडताच त्यांच्या फोनमध्ये व्हायरस किंवा मालवेअर असलेले ॲप इन्स्टॉल होते. हे ॲप तुमच्या फोनमधील पर्सनल डेटा चोरून स्कॅमरना पाठवते. यानंतर घोटाळेबाज त्यांचा गेम सुरू करतात आणि तुमच्या बँक तपशीलांचा वापर करून फसवणूक करतात.
पोलिसांची वॉर्निंग
हिमाचल प्रदेश पोलिसांनी आपल्या इशाऱ्यात लोकांना सांगितले आहे की, जर तुम्हाला अनोळखी नंबरवरून लग्नाचे आमंत्रण येत असेल तर त्यावर क्लिक करू नका. कार्ड पाठवणाऱ्याला ओळखल्याशिवाय डिजिटल लग्नाचे आमंत्रण उघडू नका. असे केल्याने, एक धोकादायक व्हायरस तुमच्या फोनमध्ये प्रवेश करेल आणि तुमचे बँक अकाउंट रिकामे होईल. मात्र, सायबर गुन्हेगारांनी लोकांना लुटण्याची नवी पद्धत अवलंबलेली ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही हॅकर्सनी डिजिटल अटक, कुरिअर, ई-कॉमर्स डिलिव्हरी आदींच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली आहे.
टेक संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
फ्रॉडपासून स्वतःचा बचाव कसा करावा?