MWC 2025: कधी आणि कुठे होणार Mobile World Congress ईव्हेंट? कोणते गॅझेट्स होणार लाँच? जाणून घ्या सर्वकाही
तुम्ही देखील तंत्रज्ञान प्रेमी असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. प्रत्येक तंत्रज्ञान प्रेमी वर्षातील सर्वात मोठा तंत्रज्ञान ईव्हेंट मोबाइल वर्ल्ड काँग्रेसची वाट पाहत असतो. आता 2025 च्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेस ईव्हेंटसाठी अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. या ईव्हेंटदरम्यान जगभरातील कंपन्या AI, फोन, संकल्पना आणि इतर इलेक्ट्रॉनिक्ससह त्यांचे नवोपक्रम सादर करतात आणि त्यांचे अनावरण करतात. त्यामुळे मोबाइल वर्ल्ड काँग्रेस ईव्हेंट प्रत्येक तंत्रज्ञान प्रेमीसाठी एक वेगळा आनंद घेऊन येतो.
मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2025 देखाील आता आयोजित केला जाणार आहे. या वर्षीच्या MWC 2025 मध्ये 1 लाखाहून अधिक लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या वर्षीच्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेस ईव्हेंटची थीम कन्व्हर्ज- कनेक्ट- क्रिएट आहे. या ईव्हेंटच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. MWC किंवा मोबाईल वर्ल्ड काँग्रेसची वाट पाहत असाल, तर तारखा, ठिकाणाची माहिती आणि या ईव्हेटंमध्ये कसे सहभागी व्हावे याची सविस्तर माहिती आता आम्ही तुम्हाला देणार आहोत. (फोटो सौजन्य – X)
मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2025 हा ईव्हेंट 3 मार्च ते 6 मार्च या काळात आयोजित केला जाणार आहे. हा ईव्हेंट स्पेनमधील बार्सिलोना येथील L’Hospitalet de Llobregat च्या Fira Gran Via येथे आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटबाबत मोबाईल वर्ल्ड काँग्रेसच्या एक्स अकाऊंटवर काही पोस्ट देखील शेअर करण्यात आल्या आहेत.
Are you event ready for #MWC25? 📝
With just 3 days to go, make sure you’re fully prepared with this essential checklist ✅
📲 Download the official MWC app to access your pass & plan your schedule – https://t.co/jTx9hp0rJy
🚇 Pick up your FREE transport pass –… pic.twitter.com/hz6xU3mgOz
— MWC (@MWCHub) February 28, 2025
जर तुम्हाला MWC 2025 मध्ये सहभागी व्हायचे असेल, तर तुम्हाला प्रथम MWC बार्सिलोनाच्या वेबसाइटवर अकाऊंट तयार करावे लागेल आणि नंतर तुम्हाला हवा असलेला पास निवडावा लागेल. पुढे, तुम्हाला वैयक्तिक माहिती द्यावी लागेल, ओळखीसाठी फोटो अपलोड करावा लागेल आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. बार्सिलोना कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेशासाठी तुमचा डिजिटल पास मिळवण्यासाठी, तुम्हाला प्रथम MWC अॅप डाउनलोड करावे लागेल.
तिकिटे उद्योग व्यावसायिक, पत्रकार आणि प्रदर्शकांसाठी उपलब्ध आहेत. हा ईव्हेंट म्हणजे उद्योगातील नेत्यांसोबत नेटवर्क तयार करण्यासाठी, इंटरॅक्टिव प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि माहितीपूर्ण तंत्रज्ञान सत्रांना उपस्थित राहण्याची ही एक उत्तम संधी असू शकते.
Google चा मोठा निर्णय! Gmail चा पासवर्ड रिसेट करताना आता नाही येणार SMS, ‘ही’ असेल नवीन कोड सिस्टम
बार्सिलोना येथे आयोजित करण्यात येणाऱ्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2025 मध्ये अनेक नवीन गॅझेट्स लाँच होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये Xiaomi 15 सीरीज, Nothing Phone 3a सीरीज, Tecno Camon 40 सीरीज आणि MegaBook S14 सह अनेक स्मार्टफोन्सचा समावेश असू शकतो. याशिवाय या ईव्हेंटमध्ये Google, Samsung, Honor आणि इतर टेक कंपन्यांकडून काही मोठ्या AI घोषणांची अपेक्षा करू शकतो. याशिवाय, लेनोवो सोलर पावर्ड लॅपटॉप लाँच करण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. या ईव्हेंटमध्ये OLED पॅनेलसह फोल्डेबल लॅपटॉप, विविध प्रकारचे रोबोट आणि बरेच इतर गॅझेट्स लाँच केले जाऊ शकतात. दुसरीकडे, क्वालकॉम कार्यक्षमता आणि युजर्स अनुभव वाढवण्याच्या योजनांसह त्यांचे 6G व्हिजन जाहीर करू शकते.