Price Dropped! तब्बल 10 हजार रुपयांनी कमी झाली Redmi Note 13 Pro 5G ची किंमत, असा घ्या सुवर्णसंधीचा फायदा
तुम्ही तुमच्यासाठी किंवा तुमच्या प्रियजनांसाठी बजेट फ्रेंडली स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता आम्ही तुम्हाला अशा एका जबरदस्त स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत तब्बल 10 हजार रुपयांनी कमी झाली आहे. म्हणजेच आता तुम्हाला हा स्मार्टफोन 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर घेऊन आला आहे. फ्लिपकार्टवर तुम्हाला Redmi Note 13 Pro 5G स्मार्टफोन 10 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Redmi Note 13 सिरीज लाँच झाल्यानंतर, Xiaomi ने त्यांच्या Redmi Note 13 Pro 5G च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट मंथ एंड मोबाईल फेस्टिव्हलदरम्यान मोठ्या डिस्काऊंट आणि ऑफर्ससह उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Redmi)
जर तुम्ही नवीन आणि शक्तिशाली स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक उत्तम संधी असू शकते. या फोनमध्ये 200MP कॅमेरा, 12GB पर्यंत रॅम आणि Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनवर उपलब्ध असणाऱ्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊया.
8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या या फोनचे मॉडेल 30,999 रुपयांना लाँच करण्यात आले होते. सध्या, हे डिव्हाइस फ्लिपकार्टवर 20,300 रुपयांच्या किमतीत सूचीबद्ध करण्यात आले आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डसह या फोनवर 5% अनलिमिटेड कॅशबॅक उपलब्ध आहे.
याशिवाय, या डिव्हाइसवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे, ज्या अंतर्गत तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात 21,100 रुपयांची सूट मिळवू शकता. त्यामुळे या सर्व ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर या स्मार्टफोनची किंमत 19,579 रुपये आहे. त्यामुळे तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे. या फोनमध्ये 200MP कॅमेरा, 12GB पर्यंत रॅम आणि Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
Redmi Note 13 Pro 5G मध्ये 6.67-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामध्ये 1.5K रेजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 चा प्रोसेसर आहे. स्मार्टफोन 8GB/128GB, 8GB/256GB आणि 12GB/512GB या तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Redmi Note 13 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 200MP (Samsung ISOCELL HP3) + 8MP (Ultra-Wide) + 2MP (Macro) कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.