ChatGPT गद्दार आहेस तू... Ghibli स्टाईल फोटो न मिळाल्याने युजर नाराज! Instagram रिल्स व्हायरल
सध्या प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Ghibli स्टाईल फोटोंचा ट्रेंड सुरु झाला आहे. प्रत्येक जण त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर Ghibli स्टाईल ईमेज अपलोड करून हा ट्रेंड फॉलो करत आहे. असं सांगितलं जात आहे की, बहुतेक लोकांनी त्यांचा Ghibli स्टाईल ईमेज तयार करण्यासाठी चॅटजीपीटीचा वापर केला आहे. पण लोकांनी या ईमेज तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चॅटजीपीटीचा वापर केल्याने सिस्टमवर भार आला आणि युजर्सना त्यांच्या Ghibli स्टाईल ईमेज तयार करण्यात अडचणी येत आहेत.
केवळ 6 हजार रुपयांच्या किंमतीत लाँच झाला Redmi A5; 5200mAh बॅटरीसह मिळणार हे स्पेशल फीचर्स
सिस्टमवर भार आल्याने युजर्सना Ghibli स्टाईल ईमेज तयार करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे अशावेळी जेव्हा युजर्स त्यांचा Ghibli स्टाईल ईमेज तयार करण्यासाठी फोटो अपलोड करत होते, तेव्हा चॅटजीपीटीकडून त्यांना एक रिप्लाय दिला जात होता, की सध्या त्यांचा फोटो Ghibli स्टाईल ईमेजमध्ये कन्वर्ट केला जाऊ शकत नाही. अनेकदा चॅटजीपीटीच्या या रिप्लायवर युजर्स देखील मजेदार रिप्लाय देत होते. अशाच रिप्लायची रिल सध्या सोशल मोठ्या मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest & Instagram)
एका रिलमध्ये चॅटजीपीटीने Ghibli स्टाईल ईमेज तयार केली नाही, म्हणून युजर त्याला गद्दार म्हणाली आहे. तर दुसऱ्या एका रिलमध्ये युजर Ghibli स्टाईल ईमेज तयार करण्यासाठी चॅटजीपीटीसोबत वाद घालत आहे. चॅटजीपीटीने Ghibli स्टाईल फोटो जनरेट करण्यास नकार दिल्यानंतर आता नेटिझन्स चॅटबॉटशी मजेदार विनोद करत आहेत. अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, नेटिझन्सनी चॅटजीपीटीसोबत बोलताना अपशब्द देखील वापरले आहेत, तर एका विशिष्ट व्हिडिओला दोन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. युजर्सने चॅटजीपीटीला “गद्दार” म्हटले आणि त्यावर “फसवणूक” केल्याचा आरोप केला.
जेव्हा चॅटजीपीटीने Ghibli स्टाईल फोटो तयार करण्यास नकार दिला तेव्हा युजरने त्याला शपथ दिली आणि “नही मेरा तू ही करके देगा,” असं युजरने चॅटजीपीटीला म्हटलं आहे. चॅटबॉटने स्टुडिओ Ghibli स्टाईल प्रतिमा बनवण्यास नकार दिल्यानंतर, महिलेने चॅटजीपीटीवर “फसवणूक करणारा” आणि “गद्दार” असल्याचा आरोप केला.
iOS 19 Update: तुमच्या आरोग्याची काळजी घेणार Apple चा AI डॉक्टर, Health App मध्ये मिळणार नवीन फीचर्स
तर दुसऱ्या एका युजरने Ghibli स्टाईल फोटो तयार करण्यासाठी चॅटजीपीटीला प्रचंड विनंत्या केल्या आहेत. त्याने म्हटलं आहे की, सर्वजण Ghibli फोटो सोशल मीडियावर अपलोड करत आहेत आणि त्याला देखील त्याचा फोटो अपलोड करायचा आहे. यानंतर युजर आणि चॅटजीपीटीचा वाद देखील झाला. आणि या सर्वानंतर चॅटजीपीटीने अखेर त्या युजरला Ghibli स्टाईल फोटो तयार करून दिला आहे. आणखी एका रिलमध्ये Ghibli स्टाईल फोटो तयार करण्यासाठी नकार दिल्याने युजरने चॅटजीपीटीसोबत बोलताना अपशब्द वापरले आहेत. या सर्व रिल्सवर मजेदार कमेंट्स देखील आल्या आहेत.