iOS 19 Update: तुमच्या आरोग्याची काळजी घेणार Apple चा AI डॉक्टर, Health App मध्ये मिळणार नवीन फीचर्स
टेक जायंट कंपनी त्यांच्या आगामी ईव्हेंटमध्ये iOS 19 अपडेट सादर करणार आहे. या अपडेटमध्ये युजर्ससाठी अनेक नवीन फीचर्स सादर केले जाणार आहेत. ज्यामुळे युजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. या अपडेटमध्ये युजर्ससाठी अनेक नवीन AI फीचर्स देखील आणले जाणार आहे. इतर अॅप्सप्रमाणेच कंपनी AI फीचर्स त्यांच्या अॅपल हेल्थ अॅपसाठी देखील आणणार आहे. आगामी फीचर अॅपल हेल्थ अॅपसाठी एक मोठं अपडेट असणार आहे. रिपोर्टनुसार, कंपनी हेल्थ अॅपसाठी AI डॉक्टर फीचर सादर करणार आहे.
iOS 19 अपडेट युजर्ससाठी घेऊन येणार सरप्राईज, बदलणार iPhone चा लूक! काय असणार खास, जाणून घ्या
कंपनीच्या इतर फीचर्सप्रमाणेच हे फीचर्स देखील लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. सध्या, कंपनी अॅपल इकोसिस्टममध्ये AI वैशिष्ट्ये जोडण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. या फीचर्सच्या मदतीन युजर्सना अधिक चांगला अनुभव मिळावा, असा कंपनीचा प्रयत्न आहे. यासाठी आता नवीन अपडेट आणलं जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
अॅपल त्यांच्या हेल्थ अॅपला AI सह मोठे अपग्रेड देण्याची तयारी करत आहे. या अॅपमध्ये हार्ट रेट मॉनिटर, ऑक्सिजन मॉनिटर (SPo2) आणि ECG सारख्या अनेक आरोग्य केंद्रित वैशिष्ट्यांचा समावेश आहे. ब्लूमबर्गच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की अॅपल त्यांच्या हेल्थ अॅपमध्ये AI इंटिग्रेटेड हेल्थ कोच आणण्याची तयारी करत आहे. त्याला AI डॉक्टर असेही म्हटले जात आहे. अॅपलच्या हेल्थ अॅपमध्ये उपलब्ध असलेले हे फीचर युजर्ससाठी खूप उपयुक्त ठरू शकते. यासंदर्भात सध्या प्रशिक्षण सुरू आहे. रिपोर्ट्सनुसार, अॅपल वैद्यकीय व्यावसायिकांमार्फत या AI मॉडेलला प्रशिक्षण देत आहे. अॅपलने अॅपल वॉच आणि एअरपॉड्समध्ये ईसीजी मॉनिटरिंग आणि फॉल डिटेक्शन ही हेल्थ ट्रॅकिंग वैशिष्ट्ये देखील समाविष्ट केली आहेत.
अॅपल हेल्थ अॅपमधील AI फीचर्स आगामी iOS 19 अपडेटसह सादर केले जातील. अॅपमधील AI हेल्थ कोच फीचर आयफोन, वॉच आणि इतर अॅपल डिव्हाईसमधील आरोग्य डेटाचे विश्लेषण करण्यास तसेच युजर्सना आरोग्य सल्ला देण्यास सक्षम असेल. जर अहवालांवर विश्वास ठेवायचा असेल तर ते व्हर्च्युअल मेडिकल असिस्टंटसारखे काम करेल.
जूनमध्ये होणाऱ्या WWDC 2025 च्या वार्षिक डेव्हलपर कार्यक्रमात Apple iOS 19 ची घोषणा करू शकते . रिपोर्ट्सनुसार, कंपनी सॉफ्टवेअर अपडेटमध्ये आयकॉन, मेनू, अॅप्स, विंडोज आणि सिस्टम बटणांचे डिझाइन पूर्णपणे बदलण्याची योजना आखत आहे. नवीन अपडेटनंतर आयफोन, आयपॅड, वॉच आणि मॅकचा इंटरफेस सारखाच असेल. कंपनीच्या मागील ट्रेंडवरून असे दिसून येते की ती गेल्या काही वर्षांपासून WWDC मध्ये आयफोन, आयपॅड आणि मॅकसाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टम लाँच करत आहे. या वर्षी हा कार्यक्रम 9 जून रोजी होणार आहे. कदाचित या आगामी कार्यक्रमात iOS 19 ची वैशिष्ट्ये उघड केली जाऊ शकतात.