Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s Day 2025: Google ने केला स्त्रीशक्तीचा गौरव, खास अंदाजात दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा! स्पेशल डूडल केलं शेअर

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, गुगलने नेहमीप्रमाणे त्यांच्या होमपेजवर एक रंगीत डूडल तयार केले आहे. आणि अशाप्रकारे जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनने जगभरातील महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 08, 2025 | 11:28 AM
Women’s Day 2025: Google ने केला स्त्रीशक्तीचा गौरव, खास अंदाजात दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा! स्पेशल डूडल केलं शेअर

Women’s Day 2025: Google ने केला स्त्रीशक्तीचा गौरव, खास अंदाजात दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा! स्पेशल डूडल केलं शेअर

Follow Us
Close
Follow Us:

गुगल डूडलने आज 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला. स्त्रीशक्तीचा गौरव करण्यासाठी गुगलने एक खास डूडल शेअर केला आहे. ज्याद्वारे त्याने सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुगल डूडल ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, “या डूडलद्वारे, आम्ही विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) क्षेत्रात क्रांतिकारी योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करतो.”

भारतात YouTube ने हटवले 29 लाख व्हिडिओ, बंद केले 48 लाख चॅनेल्स; या कारणांमुळे घेतला निर्णय

गुगलने सांगितलं आहे की, डूडलच्या माध्यमातून सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. प्रथम 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी जगभरातील महिलांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेत आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी अधिकृतपणे मान्यता दिली होती.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

महिला दिनाची थीम

आंतरराष्ट्रीय महिला दिन आपल्याला इतिहासात महिलांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची आणि आधुनिक काळातील प्रगती आणि नवोपक्रमाचा आधार म्हणून त्यांचे योगदान कसे आहे याची आठवण करून देतो. या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम “अ‍ॅक्सिलरेट अ‍ॅक्शन” आहे, ज्याचा उद्देश महिलांच्या प्रगतीसाठी अधिक प्रभावीपणे धोरणे, संसाधने आणि सकारात्मक कृती ओळखणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे आहे.

गुगलने शेअर केलं विशेष डूडल

गुगलने शेअर केलेल्या डूडलमध्ये अंतराळ संशोधन, पुरातत्वशास्त्र आणि प्रयोगशाळेतील संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिलांना अधोरेखित केले आहे. या महिलांच्या कामगिरीमुळे विज्ञानाच्या जगाला एक नवीन दिशा मिळाली आहे. महिलांचा सहभाग असूनही, STEM क्षेत्रात अजूनही लिंगभेद कायम आहे हे देखील या डूडलने अधोरेखित केले आहे. आजपर्यंत, जगभरातील STEM कर्मचाऱ्यांपैकी फक्त 29% महिला आहेत, परंतु ही संख्या दरवर्षी वाढत आहे. हाच बदल सर्वापर्यंत पोहोचावा, या उद्दशाने गुगलने एक खास डूडल शेअर केलं आहे.

गुगलने डूडलमध्ये काय सांगितलं?

गुगलने आपल्या खास डूडलद्वारे विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात क्रांतिकारी योगदान देणाऱ्या महिलांच्या कामगिरीचा सन्मान केला आहे. हे डूडल अशा महिलांच्या कामगिरीवर प्रकाश टाकते ज्यांनी अंतराळ संशोधनाला नवीन उंचीवर नेले, प्राचीन शोध सर्वांपर्यंत पोहोचवले आणि प्रयोगशाळेतील संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या योगदानामुळे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या क्षेत्रात नवीन समज निर्माण झाली आणि विज्ञानाच्या जगात मोठा बदल घडून आला.

गुगल डूडल काय आहे?

गुगल डूडल हे एक प्रकारचे कलात्मक सादरीकरण आहे जे गुगल त्यांच्या होमपेजवर विविध महत्त्वाचे प्रसंग, उत्सव, ऐतिहासिक घटना आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी प्रदर्शित करते. हे डूडल केवळ माहितीच देत नाहीत तर युजर्सना परस्परसंवादी अनुभव देखील देतात.

MWC 2025: ग्लोबल मोबाइल अवॉर्ड्समध्ये हा ठरला सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन! नाव वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

महिला दिनाचा इतिहास

जगभरातील महिलांनी विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 1975 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून, या वार्षिक कार्यक्रमाने जगभरातील महिलांच्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक कामगिरीची ओळख पटवून दिली आहे. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश लिंगभेद आणि असमानता दूर करणे आणि समानतेच्या दिशेने प्रयत्नांना प्रोत्साहन देणे आहे.

Web Title: Womens day 2025 google shared special doodle on the occasion of womens day tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 11:28 AM

Topics:  

  • google
  • international women's day
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
1

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव
2

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
3

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या
4

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.