Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oppo Smartphone launch: जगातील सर्वात पातळ फोल्डेबल फोन लाँच, किंमत वाचून तुमचेही डोळे पाणावतील

Oppo चा दावा आहे की Find N5 हा 'जगातील सर्वात पातळ फोल्डेबल' फोन आहे, जो फोल्ड केल्यावर 8.93mm मेजरमेंट आणि याचे वजन 229g आहे. Oppo चा बुक-स्टाईल Oppo Find N5 स्मार्टफोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटवर चालतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 22, 2025 | 09:17 AM
Oppo Smartphone launch: जगातील सर्वात पातळ फोल्डेबल फोन लाँच, किंमत वाचून तुमचेही डोळे पाणावतील

Oppo Smartphone launch: जगातील सर्वात पातळ फोल्डेबल फोन लाँच, किंमत वाचून तुमचेही डोळे पाणावतील

Follow Us
Close
Follow Us:

चिनी स्मार्टफोन कंपनी Oppo ने त्यांचा नवीन आणि बहुचर्चित फोल्डेबल स्मार्टफोन अखेर बाजारात लाँच केला आहे. Oppo Find N5 या नावाने हा नवीन स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीने दावा केला आहे की, Oppo Find N5 हा जगातील सर्वात पातळ फोल्डेबल स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची किंमत लाखोंच्या घरात आहे.

Apple iPhone: नवीन iPhone लाँच होताच Apple ने बंद केले ‘हे’ तीन मॉडेल्स, काय आहे कारण? वाचा सविस्तर

नवीन फोल्डेबल स्मार्टफोन 2023 मध्ये लाँच करण्यात आलेल्या Find N3 चा उत्तराधिकारी म्हणून लाँच केला आहे. कंपनीचा नवीन स्मार्टफोन क्वालकॉमच्या फ्लॅगशिप Snapdragon 8 Elite चिपसेटने सुसज्ज आहे. यामुळे स्मार्टफोनला ऑन-डिवाइस आणि क्लाउड-बेस्ड आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) कॅपेबिलिटीज मिळतात. (फोटो सौजन्य – X) 

स्मार्टफोनच्या फ्लेक्सियन हिंज डिजाइनबद्दल सांगितलं जात की, कंपनीने विंगच्या प्लेट बिल्डसाठी ग्रेड 5 टाइटेनियम एलॉयचा वापर केला आहे, ज्यामुळे त्याच्या फ्लेक्सन हिंज डिझाइनमध्ये मागील मॉडेलपेक्षा 36 टक्के जास्त कडकपणा असल्याचे म्हटले जाते.

Oppo Find N5 ची किंमत

Oppo Find N5 च्या 16GB + 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत SGD 2499 म्हणजेच सुमारे 1,61,894 रुपये आहे. हा हँडसेट मिस्टी व्हाइट आणि कॉस्मिक ब्लॅक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. स्मार्टफोन 28 फेब्रुवारीपासून सिंगापूरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल.

Oppo Find N5 चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

डुअल सिम (नॅनो) सपोर्ट असलेला Oppo Find N5 अँड्रॉइड 15-बेस्ड ColorOS 15 आधारित आहे. यामध्ये 412ppi पिक्सेल डेंसिटी आणि 120Hz डायनामिक रिफ्रेश रेटसह एक मोठी 8.12-इंच 2K (2,480 x 2,248 पिक्सल) LTPO AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे. इनर स्क्रीनमध्ये 240Hz पर्यंत टच रिस्पांस रेट आहे आणि डेव्हिस 2,100 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, स्मार्टफोनने TÜV Rheinland चे मिनिमाइज्ड क्रीज सर्टिफिकेशन देखील मिळवले आहे. डिस्प्लेमध्ये अल्ट्रा-थिन ग्लास (UTG) संरक्षण आहे. फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये 6.62-इंच 2K (2,616 x 1,140 पिक्सेल) AMOLED स्क्रीनसह एक कवर स्क्रीन आहे ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 431ppi पिक्सेल डेंसिटी आहे.

प्रोसेसर

यामध्ये 16GB LPDDR5X रॅम आणि 512GB UFS 4.0 ऑनबोर्ड स्टोरेज आहे. दुसऱ्या पिढीतील 3nm आर्किटेक्चर आणि एक हेक्सागोन NPU सह, चिपचा AI परफॉर्मेंसमध्ये 45 टक्के सुधारणा प्रदान करते असा दावा केला जातो. यामध्ये Adreno 830 GPU आहे.

AI फीचर्स

हा हँडसेट अनेक AI वैशिष्ट्यांना समर्थन देतो जसे की AI सर्च, जे युजर्सना होम स्क्रीनवर खाली स्वाइप करून क्वेरी शोधण्याची परवानगी देते. त्याच वेळी, AI कॉल समरी फीचर कॉलच्या ट्रान्सक्रिप्टवर आधारित ट्रान्सक्राइब करते, सारांश जनरेट करते आणि अ‍ॅक्शन पॉइंट्स तयार करते. Find N5 मध्ये ड्युअल-स्क्रीन ट्रान्सलेशन आणि इंटरप्रिटिंग फीचर्स असल्याचा दावाही केला जातो. यात Oppo AI टूलबॉक्स देखील आहे ज्यामध्ये AI समरी, AI स्पीक आणि AI रायटर समाविष्ट आहेत. ही सर्व भाषा साधने आहेत जी AI चा वापर करून वाचन आणि लेखन अनुभव सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवतात. ColorOS 15 वर चालणाऱ्या या फोनमध्ये AI क्लैरिटी एन्हांस, AI इरेज, AI अनब्लरसह फोटो-एडिटिंग फीचर्स देखील आहेत.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी, Oppo Find N5 मध्ये Hasselblad-ब्रँडेड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (OIS) आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलायझेशन (EIS) सह 50-मेगापिक्सेल f/1.8 प्रायमरी सेन्सर, 3x ऑप्टिकल झूम आणि OIS सह 50-मेगापिक्सल f/2.7 पेरिस्कोप टेलीफोटो सेंसर, आणि 116-डिग्री फील्ड ऑफ व्यू (FoV) आणि OIS सह 50-मेगापिक्सल अल्ट्रा वाइड-एंगल लेंस आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी, फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये आतील आणि बाहेरील दोन्ही डिस्प्लेवर 8-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे.

iPhone 16e vs iPhone 16: महागड्या iPhone 16 पेक्षा स्वस्त iPhone 16e किती वेगळा? तुमच्या कोणता ठरणार बेस्ट, जाणून घ्या

कनेक्टिव्हिटी फीचर्स

नवीन Oppo Find N5 मधील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.3, GPS/ A-GPS, NFC, Beidou, GPS, GLONASS, Galileo, QZSS आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. यात स्टीरिओ स्पीकर्स आणि साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. फोनमध्ये 5,600mAh ची डुअल-सेल बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W SUPERVOOC (वायर्ड) आणि 50W AIRVOOC (वायरलेस) चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Worlds thinnest foldable smartphone oppo find n5 launched know about features and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2025 | 09:17 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
1

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Samsung Galaxy Z TriFold: कधी लाँच होणार सॅमसंगचा ट्रिपल स्क्रीनवाला फोन? लाँच डेट आली समोर, असे असतील फीचर्स
2

Samsung Galaxy Z TriFold: कधी लाँच होणार सॅमसंगचा ट्रिपल स्क्रीनवाला फोन? लाँच डेट आली समोर, असे असतील फीचर्स

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी
3

Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी

Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज
4

Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.