फोटो सौजन्य - सोशल मिडीया
सरकारने आधार कार्ड PAN कार्डसोबत लिंक करणं अनिवार्य केलं आहे. पण जर तुमचं आधार कार्ड चुकीच्या PAN कार्डसोबत लिंक झालं असेल तर ते वेळीच डीलिंक करणं गरजेचं आहे. कारण तुमच्या आधार कार्ड सोबत जर चुकीचा PAN कार्ड नंबर लिंक असेल तर आयटीआर (इनकम टॅक्स रिटर्न) फाईल करताना अडचण येऊ शकते. डुप्लीकेट PAN कार्ड, एकापेक्षा जास्त PAN कार्ड, चुकीचं लिंकिंग, बनावट PAN कार्ड, या कारणांमुळे PAN कार्ड-आधार कार्डशी डीलिंक करावं लागू शकतं. त्यामुळे जर तुमच्या आधार कार्ड चुकीच्या PAN कार्डसोबत लिंक झालं असेल तर आत्ताच डिलींक करा. यासाठी पुढील पध्दत फॉलो करा.






