कसं चेक कराल Aadhaar-PAN लिंक स्टेटस? SMS आणि Online दोन्ही पद्धतीने तपासा अपडेट, जाणून घ्या सविस्तर
भारत सरकारने टॅक्स व्यवस्था अधिक पारदर्शक व्हावी यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणं आता बंधनकारक केलं आहे. टॅक्स चोरी आणि खोटी ओळख यांसारख्या घटना थांबवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही देखील अद्याप तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलं नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. कारण यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंत वेळ दिला आहे.
UPI मध्ये AI ची एंट्री! PhonePe आणि OpenAI च्या हातमिळवणीने पेमेंट होणार आणखी ‘स्मार्ट’
जर तुम्ही हे लिंकिंग केले नाही, तर तुमचे पॅन कार्ड 1 जानेवारी 2026 पासून निष्क्रिय होईल, म्हणजेच तुम्ही कर परतावा भरू शकणार नाही, बँक किंवा म्युच्युअल फंड व्यवहारांमध्ये समस्या येतील आणि केवायसीशी संबंधित प्रक्रिया देखील थांबू शकतात. तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक आहे की नाही हे तुम्ही अगदी सोप्या प्रोसेसने तपासू शकणार आहात. (फोटो सौजन्य – Pinterest)
अनेक युजर्सना शंका आहे की त्यांचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहे की नाही. Aadhaar-PAN लिंक स्टेटस तपासण्याची अगदी सोपी प्रक्रिया आहे.
आता स्क्रिनवर एक मेसेज दिसेल. जसे ‘तुमचा पॅन आधीच दिलेल्या आधारशी लिंक केलेला आहे’, ‘तुमचा आधार-पॅन लिंकिंग विनंती UIDAI कडे पडताळणीसाठी पाठवण्यात आली आहे’ आणि ‘पॅन आधारशी लिंक नाही.’
तुम्ही एक सिंपल SMS पाठवून देखील आधार पॅन लिंक स्टेटस तपासू शकणार आहात. यासाठी IDPAN ला 567678 किंवा 56161 वर पाठवा. तुम्हाला एक उत्तर संदेश मिळेल ज्यामध्ये “आधार आधीच पॅनशी संलग्न आहे…” (लिंक केलेले असल्यास) आणि “आधार पॅनशी संलग्न नाही…” (लिंक केलेले नसल्यास) असे संदेश असतील.
जर तुम्ही 1 ऑक्टोबर 2024 च्या आधी आधार एनरोलमेंट आयडीद्वारे पॅन घेतले असले तर तुम्ही तुम्ही ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत मोफत लिंक करू शकता. इतर सर्व यूजर्सना 1 हजार रुपये शुल्क भरावे लागेल.






