
टेकप्रेमींसाठी डबल ट्रीट! एकाच वेळी Xiaomi चे दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच... 7,000mAh बॅटरी अन् Leica कॅमेऱ्याने सुसज्ज
शाओमी 17T ची किंमत यूरोपमध्ये 749 यूरो म्हणजेच सुमारे 83,400 रुपये आणि शाओमी 17T Pro ची किंमत 899 यूरो म्हणजेच सुमारे 1,00,000 रुपये ठेवण्यात आली आहे. शाओमी 17T स्मार्टफोन ब्लॅक, वॉयलेट, ब्लू आणि ओपल व्हाइट या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तर शाओमी 17 प्रो ब्लॅक, डीप ब्लू आणि डीप वॉयलेट कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Xiaomi)
शाओमी 17 टी चा कॅमेरा डिव्हाईसचे आकर्षण ठरत आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP चा लाईट फ्यूजन 800 मुख्य कॅमेरा, 12MP चा अल्ट्रा-वाइड लेंस आणि 5x ऑप्टिकल झूमवाला 50MP चा पेरिस्कोप टेलीफोटो लेंस समाविष्ट आहे. महागड्या शाओमी 17 आणि 17 अल्ट्राच्या तुलनेत शाओमी 17 टी चा टेलीफोटो लेंस झूम जास्त आहे. याद्वारे यूजर्स जास्त शार्प लाँग-रेंज शॉट्स, चांगली पोर्ट्रेट फोटोग्राफी आणि वेगवेगळ्या लाईटिंग परिस्थितीमध्ये फ्लेक्सिबल फ्रेमिंग ऑप्शन्सची अपेक्षा करू शकतात.
याशिवाय हा कॅमेरा सेटअप सेटअप ‘लायका कंप्लिट कॅमेरा सिस्टिम’ ला सपोर्ट करतो आणि त्याच्या 0.6x ते 5x ऑप्टिकल झूमसह 15mm ते 115mm पर्यंत फोकल रेंज ऑफर करतो. स्मार्टफोन फोटोग्राफर्सना आकर्षित करण्यासाठी कंपनीने या फोनमध्ये सिलुएट, फ्लेम आणि फायरवर्क्ससारखे क्रिएटिव्ह शूटिंग मोड्ससुद्धा दिले आहेत. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा सेंसर दिला आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी, शाओमी 17T ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 4K 60fps एचडीआर 10 रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.
कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 8500 अल्ट्रा चिपसेट देण्यात आला आहे, जो शाओमीच्या Surge T1 Plus आणि T1S चिप्ससह जोडण्यात आला आहे. कंपनीने या डिव्हाईसमध्ये 3D आइस लूप कूलिंग सिस्टिम देखील दिले आहे, जे दिर्घकाळापर्यंत गेमिंग करण्यासाठी, 4K व्हिडीओ रिकॉर्ड करण्यासाठी किंवा मल्टीटास्किंग दरम्यान स्टेबल परफॉर्मेंस ठेवण्यासाठी मदत करतो. याशिवाय कंपनीने असा दावा केला आहे की, हे हँडसेट एस्ट्रो कम्युनिकेशनला सपोर्ट करते. ज्यामुळे काही निवडक क्षेत्रांमध्ये 1.3 किलोमीटरच्या अंतरापर्यंत ऑफलाइन कनेक्टिविटी मिळते.
या हँडसेटमध्ये 6.59-इंच अमोलेड डिस्प्ले आहे, जो 1.5K रेजोल्यूशन, एचडीआर 10+ सपोर्ट, डॉल्बी विजन, 100 टक्के डीसीआई -P3 कलर गॅमट, 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,500 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या डिव्हाईसमध्ये 6,500mAh ची सिलिकॉन-कार्बन बॅटरी दिली आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सॉफ्टवेयरबद्दल बोलायचं झालं तर, हा स्मार्टफोन आउट-ऑफ-द-बॉक्स अँड्रॉईड 16 वर बेस्ड हायपरओएस 3 वर चालतो, जो इकोसिस्टमवर केंद्रित अनेक वैशिष्ट्ये देतो. यामध्ये आयफोन इंटिग्रेशन, एअरपॉड्स सपोर्ट आणि Xiaomi चे सुधारित हायपर आयलँड फीचर यांचा समावेश आहे.
शाओमी 17 टी प्रो मॉडेलमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 9500 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.83-इंचाचा अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामुळे मोबाईल गेमर्ससाठी हे डिव्हाईस एक आकर्षक पर्याय ठरते. डिव्हाईसमध्ये 100W फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे.
शाओमी 17 टी प्रोचा कॅमेरा सेटअप हा सामान्य Xiaomi 17 टी सारखाच आहे, ज्यामध्ये 50MP चा प्रायमरी सेंसर, 12MP चा अल्ट्रा-वाइड लेंस आणि 50MP चा 5x टेलीफोटो लेंस दिले आहे. मात्र, शाओमीने प्रो मॉडेलमधील प्रायमरी सेन्सर बदलून फ्लॅगशिप लाईट फ्युजन 950 वापरला आहे, जो शाओमी 17 मध्ये वापरलेल्या सेन्सरसारखाच आहे. स्मार्टफोनचे इतर फीचर्स काही प्रमाणात शाओमी 17 टी सारखेच आहेत. ज्यामध्ये IP68/IP69 रेटिंग असलेले पाणी आणि धूळ प्रतिरोधक डिझाइन, चौकोनी आकाराची कॅमेरा रचना आणि फ्लॅट कडा यांचा समावेश आहे.