Airtel Rs 355 vs Airtel Rs 379: किंमतीत केवळ 24 रुपयांचा फरक... कॉलिंग आणि डेटामध्ये कोणता प्लॅन ठरतो बेस्ट?
379 रुपयांच्या प्लॅनमध्ये 5G डेटा ऑफर केला जातो तर 355 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकदाच 4G डेटा वापरता येतो. जर तुम्हाला जास्त डेटाची गरज असेल तर तुम्ही 379 रुपयांचा प्लॅन खरेदी करू शकता. एयरटेलचे 4G आणि 5G नेटवर्क आता सर्वच ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे जर तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल जिथे 5G नेटवर्क उपलब्ध आहे, तर 379 रुपयांचा प्लॅन खरेदी करू शकता. मात्र जर तुम्ही 4G नेटवर्कचा वापर करत असाल आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणात डेटा वापरायचा असेल, तर तुम्ही 355 रुपयांचा प्लॅन खरेदी करू शकता. चला, खाली या प्लॅन्सच्या फायद्यांवर अधिक बारकाईने नजर टाकूया. (फोटो सौजन्य – Pinterest)
भारती एअरटेलच्या 355 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 25GB 4G डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 300 एसएमएस देखील ऑफर केले जातात. या प्रीपेड प्लॅनची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे. यासोबतच यूजर्सना 5 रुपयांचा टॉकटाइम देखील मिळणार आहे. हा प्लॅन खरेदी करण्यासाठी यूजर्सना दररोज 11.83 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर कंपनीच्या पोर्टफोलिओमधील दुसरा प्लॅन 379 रुपयांचा आहे. दोन्ही प्लॅन्सच्या किंमतीत फार फरक नाही. मात्र दुसऱ्या प्लॅनमध्ये मिळणारे फायदे थोडे वेगळे आहे.
भारती एयरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये उपलब्ध असलेल्या 379 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना कोणते फायदे ऑफर केले जातात, याबाबत जाणून घेऊया. कंपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस मिळतात. तसेच हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना डेली 2GB डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनची व्हॅलिडीटी 1 महिन्याची आहे. हा प्लॅन खरेदी करण्यासाठी यूजर्सना रोज सुमारे 12.63 रुपये खर्च करावे लागणार आहेत.
प्लॅनसोबत यूजर्सना एका महिन्यासाठी 30GB चे गुगल वन क्लाउड स्टोरेज देखील मोफत मिळणार आहे. याशिवाय या प्लॅनसोबत यूजर्सना 6 महिन्यांपर्यंत अॅपल म्युझिक सब्सक्रिप्शन मिळणार आहे. यूजर्सना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटाचा फायदा देखील मिळणार आहे. जर तुम्ही 299 रुपये किंवा 319 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनवर अडकला असाल आणि तुम्हाला अपग्रेड करण्यासाठी बेस्ट प्लॅन पाहिजे असेल तर 355 रुपये आणि 379 रुपयांच्या प्लॅनचा तुम्ही विचार करू शकता. लक्षात ठेवा की तुम्ही 5G की 4G कोणत्या नेटवर्कचा वापर करत आहात, त्यानुसार प्लॅनची खरेदी करा.
Ans: Bharti Airtel ही भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे.
Ans: होय, Airtel चे 5G नेटवर्क भारतातील अनेक शहरांमध्ये उपलब्ध आहे.
Ans: Airtel कडे कमी किंमतीपासून अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि SMS सुविधा असलेले अनेक प्रीपेड प्लॅन्स उपलब्ध आहेत.






