Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिप टंचाईचा फटका! Xiaomi ने भारतात वाढवल्या या दोन टॅब्लेट्सची किंमती… ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे

Xiaomi Tablets Price Hike: शाओमीने भारतातील यूजर्सना एक मोठा धक्का दिला आहे. कंपनीने भारतात त्यांच्या दोन लोकप्रिय टॅब्लेट्सच्या किंमतीत वाढ केली आहे. चिपच्या कमतरतेमुळे कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितलं जात आहे. डिव्हाईसच्या नवीन किंमती जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 06, 2026 | 12:08 PM
चिप टंचाईचा फटका! Xiaomi ने भारतात वाढवल्या या दोन टॅब्लेट्सची किंमती... ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे

चिप टंचाईचा फटका! Xiaomi ने भारतात वाढवल्या या दोन टॅब्लेट्सची किंमती... ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे

Follow Us
Follow Us:
  • शाओमी पॅड 8 आणि नॅनो टेक्स्चर डिस्प्ले व्हेरिअंटच्या किंमतीत भारतात 2,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
  • शाओमी पॅड 8 च्या 8GB+128GB व्हेरिअंटची किंमत आता 35,999 रुपये, तर 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 38,999 रुपये झाली आहे.
  • वाढत्या उत्पादन खर्च आणि जागतिक चिप तुटवड्यामुळे कंपनीने हा दरवाढीचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
टेक कंपनी शाओमीने भारतातील ग्राहकांना एक मोठा झटका दिला आहे. कंपनीने भारतात त्यांच्या दोन लोकप्रिय टॅब्लेट्सच्या किंमती वाढवल्या आहेत. यामध्ये Xiaomi Pad 8 आणि Xiaomi Pad 8 चे ‘Nano Texture’ डिस्प्ले व्हेरिअंट समाविष्ट आहे. हे टॅब्लेट यावर्षी मार्च महिन्यात लाँच करण्यात आले होते. आता कंपनीने या टॅब्लेट व्हेरिअंटच्या किंमती 2,000 रुपयांनी वाढवल्या आहेत. चिपच्या कमतरतेमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे, असं सांगितलं जात आहे. टॅब्लेट्सच्या नव्या किंमती जाणून घेऊया.

पर्सनल ग्रूमिंग सेगमेंट boAt ची एंट्री! अनोख्या फीचर्ससह भारतात Slazer सीरीज लाँच… सुरुवातीची किंमत केवळ 799 रुपये

शाओमी पॅड 8 आणि शाओमी पॅड 8 चे ‘नॅनो टेक्स्चर’ डिस्प्ले व्हेरिअंटच्या नवीन किंमती

शाओमी पॅड 8 चे 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंट भारतात 33,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. आता या डिव्हाईसची किंमत 35,999 रुपये झाली आहे. म्हणजेच कंपनीने या टॅब्लेटची किंमत सुमारे 2 हजार रुपयांनी वाढवली आहे. तर या डिव्हाईसच्या 12GB + 256GB या टॉप एंड व्हेरिअंटची किंमत आता 38,999 रुपये झाली आहे. डिव्हाईसचे हे व्हेरिअंट 36,999 रुपयांत लाँच करण्यात आले होते. जर तुम्ही हे व्हेरिअंट ‘शाओमी फोकस पेन प्रो’ स्टाइलससह बंडलमध्ये खरेदी करत असाल तर आता त्याची किंमत 41,999 रुपयांऐवजी 43,999 रुपये झाली आहे.  (फोटो सौजन्य – Xiaomi)

एंटी-ग्लेयर फीचर्स वाले शाओमी पॅड 8 चे ‘नॅनो टेक्स्चर’ डिस्प्ले मॉडेलचे 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिअंट 38,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. आता त्याची किंमत 40,999 रुपये झाली आहे. नॅनो टेक्सचर मॉडेल ‘शाओमी फोकस पेन प्रो’ बंडलसह खरेदी करणार असाल तर त्याची किंमत 43,999 रुपयांऐवजी 45,999 रुपये झाली आहे. डिव्हाईसच्या नवीन किंमत आता शाओमी इंडियाच्या वेबसाईटवर देखील अपडेट झाल्या आहेत. असे मानले जाते की, हा दरबदल वाढत्या घटकांच्या किमती आणि जागतिक स्तरावर चिप्सच्या तुटवड्यामुळे झाला आहे. गेल्या महिन्यात, वनप्लस, पोको आणि लावा यांसारख्या कंपन्यांनीही भारतात त्यांच्या मध्यम-श्रेणीतील स्मार्टफोन्सच्या किमती वाढवल्या होत्या. त्यानंतर आता शाओमीने टॅब्लेटच्या किंमती वाढवल्या आहेत.

शाओमी पॅड 8 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

शाओमी पॅड 8 कंपनीच्या नवीन ‘शाओमी हायपर ओएस 3’ वर चालतो. या डिव्हाईसमध्ये 800 निट्सची पीक ब्राइटनेस आणि 144Hz रिफ्रेश रेटसह 11.2-इंच 3.2K डिस्प्ले देण्यात आला आहे. याच्या स्टँडर्ड मॉडलमध्ये नॉर्मल ग्लॉसी स्क्रीन मिळणार आहे. तर या डिव्हाईसच्या नॅनो टेक्स्चर वर्जनमध्ये अँटी-ग्लेयर आणि अँटी-रिफ्लेक्टिव फीचर्स मिळणार आहे.

YouTube वर आता चालणार तुमची मर्जी! अल्गोरिदम नाही यूजर्स सेट करू शकणार त्यांची आवड; कसं? जाणून घ्या

परफॉर्मंससाठी शाओमी पॅड 8 मध्ये स्नॅपड्रॅगन 8s जेन 4 चिपसेटसह एड्रेनो 825 जीपीयू देण्यात आला आहे. यामध्ये 12GB पर्यंत एलपीडीडीआर5टी रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज मिळणार आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 13-मेगापिक्सेलचा बॅक कॅमेरा आणि सेल्फीसाठी यामध्ये 8-मेगापिक्सेलचा फ्रंट शूटर देण्यात आला आहे. ऑडिओसाठी यामध्ये डॉल्बी एटमॉस आणि Hi-Res सपोर्टसह क्वाड स्पीकर सेटअप मिळणार आहे. शाओमी पॅड 8 मध्ये 9,200mAh बॅटरी दिली आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा टॅब्लेट शाओमी फोकस पेन प्रो स्टाइलस इनपुटला सपोर्ट करतो आणि लॅपटॉपसारखा अनुभव मिळवण्यासाठी याला कीबोर्ड ॲक्सेसरीजसोबतही जोडता येते. या स्टाइलसमध्ये 16,000 पेक्षा जास्त प्रेशर सेन्सिटिव्हिटी लेव्हल्स आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Xiaomi ची स्थापना कधी झाली?

    Ans: Xiaomi ची स्थापना 2010 मध्ये Lei Jun यांनी केली.

  • Que: Xiaomi चे स्मार्टफोन चांगले असतात का?

    Ans: होय, Xiaomi स्मार्टफोन दमदार परफॉर्मन्स, चांगला कॅमेरा आणि किफायतशीर किंमतीसाठी ओळखले जातात.

  • Que: Xiaomi चे 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत का?

    Ans: होय, Xiaomi कडे बजेटपासून प्रीमियम सेगमेंटपर्यंत अनेक 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत.

Web Title: Xiaomi hikes prices of pad 8 and nano texture variant in india because of chip shortage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • xiaomi update

संबंधित बातम्या

पर्सनल ग्रूमिंग सेगमेंट boAt ची एंट्री! अनोख्या फीचर्ससह भारतात Slazer सीरीज लाँच… सुरुवातीची किंमत केवळ 799 रुपये
1

पर्सनल ग्रूमिंग सेगमेंट boAt ची एंट्री! अनोख्या फीचर्ससह भारतात Slazer सीरीज लाँच… सुरुवातीची किंमत केवळ 799 रुपये

Tech Tips: Airplane मोड की DND? कोण वाचवतं स्मार्टफोनची सर्वाधिक बॅटरी? जाणून घ्या सविस्तर
2

Tech Tips: Airplane मोड की DND? कोण वाचवतं स्मार्टफोनची सर्वाधिक बॅटरी? जाणून घ्या सविस्तर

YouTube वर आता चालणार तुमची मर्जी! अल्गोरिदम नाही यूजर्स सेट करू शकणार त्यांची आवड; कसं? जाणून घ्या
3

YouTube वर आता चालणार तुमची मर्जी! अल्गोरिदम नाही यूजर्स सेट करू शकणार त्यांची आवड; कसं? जाणून घ्या

AI मुळे वाढणार ऊर्जा संकट? 2030 पर्यंत वीजेची मागणी दुप्पट होण्याची शक्यता; संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून धक्कादायक खुलासा
4

AI मुळे वाढणार ऊर्जा संकट? 2030 पर्यंत वीजेची मागणी दुप्पट होण्याची शक्यता; संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून धक्कादायक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.