YouTube वर आता चालणार तुमची मर्जी! एल्गोरिदम नाही यूजर्स सेट करू शकणार त्यांची आवड; कसं? जाणून घ्या
अनेकदा असं घडतं की, तुमच्या फीडमध्ये असंख्य व्हिडीओ असतात पण यामधील कोणताच कंटेट तुम्हाला आवडत नाही. मात्र आता असं होणार नाही. युट्यूबवरील नवीन फीचरमुळे हे संपूर्ण चित्र पालटणार आहे. नवीन फीचर यूजर्सना त्यांच्या आवडीचे फीड तयार करण्याचा पर्याय देणार आहे. यूजर्स जेव्हा त्यांच्या मर्जीने फीड तयार करतील तेव्हा एल्गोरिदमची गरज भासणार नाही. तसेच यूजर्सना त्यांनी तयार केलेल्या फीडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा कंटेट पाहण्याची देखील संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
युट्यूबने दिलेल्या माहितीनुसार, आता होम ऑप्शनजवळ यूजर्सना कस्टम फीड चिप पाहायला मिळणार आहे. या पर्यायावर टॅप केल्यानंतर स्क्रीनवर एक टेक्स्ट बॉक्स ओपन होईल. यामध्ये यूजर्सना सांगावे लागेल की त्यांना कोणत्या प्रकारचा कंटेट पाहायला आवडतो. यामध्ये तुम्ही एखादा ठरावीक विषय किंवा एक व्यापक कल्पना नमूद करू शकता.
गूगल देखील यामध्ये सूचना देऊन तुम्हाला मदत करणार आहे. यानंतर तुम्ही दिलेल्या प्रॉम्प्टच्या आधारवर यूट्यूबचे एआय सिस्टिम तुमच्यासाठी कस्टम फीड तयार करणार आहे. यूजर्स हा प्रॉम्प्ट कधीही एडीट करू शकतात. तसेच यामध्ये त्यांच्या आवडीचे विषय देखील जोडू शकणार आहेत.
कस्टम फीडवर यूट्यूबने काही मर्यादा देखील ठेवल्या आहेत. कंपनीचं असं म्हणणं आहे की, एक अकाऊंट एकावेळी एकच कस्टम फीड अॅक्टिव्ह ठेऊ शकणार आहेत. म्हणजेच यूजर्सना त्यांच्या मूडच्या हिशोबाने वेगवेगळे फीड तयार करण्याचा आणि त्यामध्ये स्विच करण्याचा पर्याय देण्यात आला नाही. यासाठी वेळेची मर्यादा देखील ठेवण्यात आली आहे.
कस्टम फीड 30 दिवसांपर्यंत इनअॅक्टिव्ह राहिल्यास एक्सपायर होणार आहे. यासोबतच, कस्टम फीड तयार करण्याचा पर्याय केवळ अशाच यूजर्सना मिळणार आहे. ज्यांच्या अकाऊंटची सर्च हिस्ट्री आणि वॉच हिस्ट्री ऑन आहे. उपलब्धतेशी संबंधित आणखी एक मर्यादा आहे. सध्या हे नवं फीचर केवळ अमेरिकेतील यूजर्ससाठी रोलआऊट करण्यात आलं आहे. ज्यांनी खात्यात साइन इन आहेत आणि ज्यांनी इंग्रजी भाषा निवडली आहे.
जेव्हा यूट्यूब त्यांच्या होम पेजवर कोणताही बदल करते, तेव्हा त्याचा परिणाम क्रिएटर्सवर होणं निश्चित असतं. आता, हे नवीन फीचर दीर्घ व्हिडिओ बनवणाऱ्या क्रिएटर्सना मोठी चालना देऊ शकते. आता, यूजर त्यांच्या आवडीचे विषय निवडतील तेव्हा, दीर्घ व्हिडिओ बनवणारी अकाउंट्स पुन्हा फीडमध्ये दिसू लागतील.
Ans: Google ने 2006 मध्ये युट्यूब विकत घेतले होते आणि ते आता Alphabet Inc. समूहाचा भाग आहे.
Ans: नाही, युट्यूब मोफत वापरता येते. मात्र अतिरिक्त फीचर्ससाठी युट्यूब प्रिमियम उपलब्ध आहे.
Ans: युट्यूब प्रिमियमद्वारे जाहिरातमुक्त व्हिडिओ, बॅकग्राउंड प्लेबॅक आणि ऑफलाइन डाउनलोडची सुविधा मिळते.






