Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Xiaomi, Redmi स्मार्टफोनच्या किंमती वाढण्याची शक्यता; यूजर्सवर होणार थेट परिणाम, मोजावे लागणार जास्तीचे पैसे

नवीन Xiaomi किंवा Redmi स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एका नवीन रिपोर्टनुसार कंपनी त्यांच्या काही मिड-रेंज आणि फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किंमती वाढवू शकते, त्यामुळे ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 27, 2026 | 07:45 PM
Xiaomi, Redmi स्मार्टफोनच्या किंमती वाढण्याची शक्यता; यूजर्सवर होणार थेट परिणाम, मोजावे लागणार जास्तीचे पैसे

Xiaomi, Redmi स्मार्टफोनच्या किंमती वाढण्याची शक्यता; यूजर्सवर होणार थेट परिणाम, मोजावे लागणार जास्तीचे पैसे

Follow Us
Follow Us:
  • रिपोर्टनुसार शाओमी आणि रेडमीच्या अनेक स्मार्टफोनच्या किंमती ₹1,000 ते ₹5,000 पर्यंत वाढू शकतात.
  • शाओमी 17T, रेडमी नोट 15, रेडमी 15, रेडमी 15A आणि रेडमी 15C या मॉडेल्सच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
  • किंमतवाढीबाबत टिप्स्टर अभिषेक यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दावा केला असून कंपनीकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
नवीन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टेक कंपनी शाओमाी त्यांच्या मिड रेंज आणि फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किंमती वाढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, कंपनी स्मार्टफोनच्या किंमती 5 हजार रुपयांपर्यंत वाढवू शकते.

Tech Tips: तुम्हीही झोपण्यापूर्वी Wi-Fi बंद करता? विजेची बचत होते की राऊटरचे आयुष्य कमी होतं? जाणून घ्या सविस्तर

यापूर्वी देखील कंपनीने त्यांच्या काही बजेट फ्रेंडली स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा कंपनीने हा निर्णय घेतल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. याबाबत टिप्स्टर अभिषेक यादवने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, शाओमी 17T, रेडमी नोट 15, रेडमी 15A आणि रेडमी 15C च्या किंमतीत 5 हजार रुपयांपर्यंत वाढ केली जाऊ शकते.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

शाओमी 17 टी

कंपनीने हा फ्लॅगशिप स्मार्टफोन 12GB+ 256GB आणि 12GB + 512GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला होता. 12GB+ 256GB व्हेरिअंटची लाँच किंमत 59,999 रुपये होती. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 64,999 रुपये खर्च करावे लागण्याची शक्यता आहे. तसेच 12GB + 512GB हे टॉप व्हेरिअंट 64,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 69,999 रुपये मोजावे लागू शकतात. म्हणजेच कंपनी या स्मार्टफोन व्हेरिअंटच्या किंमतीत 5 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याची शक्यता आहे.

रेडमी नोट 15

या मिड रेंज स्मार्टफोनचे 8GB + 128GB व्हेरिअंट 26,999 रुपयांत लाँच करण्यात आले होते. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 28,999 रुपये मोजावे लागू शकतात. तर 8GB + 256GB ची लाँच किंमत 29,999 रुपये होती. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 31,999 रुपये खर्च करावे लागू शकतात. म्हणजेच कंपनी या स्मार्टफोनच्या किंमतीत 2 हजार रुपयांपर्यंत वाढ करू शकते.

रेडमी 15 सिरीज

रेडमी 15 सिरीजच्या किंमतीत देखील कंपनी वाढ करू शकते. ही स्मार्टफोन सिरीज 14,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आली होती. मात्र कंपनीच्या निर्णयानंतर ही स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 15,999 रुपये मोजावे लागू शकतात. म्हणजेच कंपनी या सिरीजच्या किंमतीत 1 हजार ते 1500 रुपयांपर्यंत वाढ करू शकते.

Xiaomi is increasing smartphone prices in India from tomorrow. If you’re planning to buy any of these phones, today is the last day to get them at the current price on online platforms before the revised pricing takes effect. Price hike:
Redmi 15A 5G: up to ₹1,500
Redmi 15C… pic.twitter.com/b6I4t2BCp9
— Abhishek Yadav (@yabhishekhd) July 26, 2026

रेडमी 15

6GB + 128GB व्हेरिअंट 20,499 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 21,499 रुपये खर्च करावे लागू शकतात. 8GB + 128GB व्हेरिअंट 22,499 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 23,499 रुपये मोजावे लागू शकतात. 8GB + 256GB व्हेरिअंट 24,499 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 25,499 रुपये खर्च करावे लागू शकतात.

iPhone Tips: सायलेंट मोड बंद करायचा विसरता? हे हिडन फीचर सोडवेल तुमची मोठी समस्या, जाणून घ्या सविस्तर

रेडमी 15C

4GB + 128GB व्हेरिअंट 16,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 18,499 रुपये खर्च करावे लागू शकतात. 6GB + 128GB व्हेरिअंट 18,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 20,499 रुपये खर्च करावे लागू शकतात. 8GB + 128GB व्हेरिअंट 20,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 22,499 रुपये खर्च करावे लागू शकतात.

रेडमी 15A

4GB + 64GB व्हेरिअंट 14,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 15,999 रुपये मोजावे लागू शकतात. 4GB + 128GB व्हेरिअंट 15,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 17,499 रुपये मोजावे लागू शकतात. 6GB + 128GB व्हेरिअंट 17,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 19,499 रुपये मोजावे लागू शकतात.

Web Title: Xiaomi redmi smartphone price hike report xiaomi 17t redmi note 15 redmi 15 series may get costlier

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • Redmi
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: तुम्हीही झोपण्यापूर्वी Wi-Fi बंद करता? विजेची बचत होते की राऊटरचे आयुष्य कमी होतं? जाणून घ्या सविस्तर
1

Tech Tips: तुम्हीही झोपण्यापूर्वी Wi-Fi बंद करता? विजेची बचत होते की राऊटरचे आयुष्य कमी होतं? जाणून घ्या सविस्तर

Jio Freedom Offer: जिओची धमाकेदार ऑफर! 15 महिने इंटरनेटसह मिळणार ओटीटीचा आनंद, इतकी आहे किंमत
2

Jio Freedom Offer: जिओची धमाकेदार ऑफर! 15 महिने इंटरनेटसह मिळणार ओटीटीचा आनंद, इतकी आहे किंमत

आता Airtel eSIM ॲक्टिव्हेट करण्यासाठी स्टोअरमध्ये जाण्याची गरज नाही! घरबसल्या होईल तुमचं काम, फॉलो करा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस
3

आता Airtel eSIM ॲक्टिव्हेट करण्यासाठी स्टोअरमध्ये जाण्याची गरज नाही! घरबसल्या होईल तुमचं काम, फॉलो करा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

पासवर्ड विसरलात? सेल्फी व्हिडिओनेही लॉग-इन करता येणार Google Account, नवीन फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर
4

पासवर्ड विसरलात? सेल्फी व्हिडिओनेही लॉग-इन करता येणार Google Account, नवीन फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.