iPhone Tips: सायलेंट मोड बंद करायचा विसरता? हे हिडन फीचर सोडवेल तुमची मोठी समस्या, जाणून घ्या सविस्तर
ॲपल त्यांच्या आयफोनमध्ये काही शॉर्टकर्ट ॲप्स ऑफर करते. या शॉर्टकर्ट ॲप्समध्ये ऑटोमेशन फीचर सेट करण्याची सुविधा मिळते, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा आयफोन अशा पद्धतीने सेट करू शकता, की तुमचा फोन एखाद्या ठरावीक वेळी किंवा एखाद्या लोकेशनवर आल्यानंतर आपोआप सायलेंट मोड ऑन किंवा ऑफ करेल. एकदा तुम्ही ही सेटिंग केली की, यानंतर तुम्हाला वारंवार मॅन्युअल सेटिंग बदलण्याची आवश्यकता नाही. ऑटोमेशन फीचर सेट करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)






