Tech Tips: तुम्हीही झोपण्यापूर्वी Wi-Fi बंद करता? विजेची बचत होते की राऊटरचे आयुष्य कमी होतं? जाणून घ्या सविस्तर
Jio Freedom Offer: जिओची धमाकेदार ऑफर! 15 महिने इंटरनेटसह मिळणार ओटीटीचा आनंद, इतकी आहे किंमत
हल्ली कंपन्या वायफाय राऊटर अशा ॲडव्हांस पद्धतीने डिझाईन करतात की दिर्घकाळापर्यंत त्याचा वापर केला जाऊ शकतो. खरं तर दिवसरात्र वायफाय राऊटर चालू राहणं एक अत्यंत सामान्य गोष्ट आहे. तसेच यामुळे वायफायच्या आयुष्यावर देखील कोणताही परिणाम होत नाही. मात्र जर तुम्ही दिवसातून अनेकदा वायफाय राऊटर चालू – बंद करत असाल, तर पावर सर्किट आणि इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्सवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण वारंवार वायफाय राऊटर विजेला कनेक्ट आणि डिस्कनेक्ट होत असेल तर त्यावर लोड येऊ शकतो.
वायफाय राऊटर खूप जास्त विजेचा वापर करत नाही. एक नॉर्मल राऊटर सुमारे 5 ते 15 वॉटपर्यंत विजेचा वापर करतो. जर तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी 7 ते 8 तासांसाठी वायफाय राऊटर बंद ठेवला तर विजेची थोडी बचत होऊ शकते. मात्र ही बचत इतकी मोठी नसते की, तुमच्या विजेच्या बिलात तुम्हाला फार मोठे अंतर दिसू शकते. एका महिन्यांत काही रुपयांपर्यंत तुम्ही बचत करू शकता. त्यामुळे केवळ विज वाचवण्यासाठी सतत राऊटर बंद करणं शहाणपणाचं ठरणार नाही.
बंपर ऑफर! Samsung Galaxy M17 5G वर मोठी सूट, 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा दमदार 5G फोन
जर तुम्ही राऊटर अशा ठिकाणी ठेवला असेल जिथे खूप जास्त उष्णता असेल तर तुम्ही काही वेळासाठी राऊटर बंद करून ठेऊ शकता, ज्यामुळे राऊटर गरम होणार नाही. यामुळे ओव्हरहिटींगची समस्या कमी होऊ शकते. याशिवाय, जर तुम्ही अनेक दिवसांसाठी बाहेरगावी जाणार असाल तर अशावेळी राऊटर बंद ठेवणं फायद्याचं ठरू शकतं. यामुळे विजेची बचत होणार आहे आणि डिव्हाईस देखील सुरक्षित राहू शकते.






