
Raksha Bandhan 2026: यंदाच्या रक्षाबंधनाला चॉकलेट्स नाही... लाडक्या बहिणीला गिफ्ट द्या हे गॅझेट्स, पाहताच होईल खुश!
जर तुमच्या बहिणीला गाणी ऐकण्याची किंवा चित्रपट पाहण्याची आवड असेल किंवा तुमची बहिण ऑनलाईन क्लास किंवा मिटींग अटेंड करत असेल तर तुम्ही तिला वायरलेस ईयरबड्स गिफ्ट देऊ शकता. वायरलेस ईयरबड्स अगदी सहज कुठेही घेऊन जाऊ शकता. तसेच, यामध्ये नॉइज कँसलेशन, दिर्घकाळ बॅटरी आणि चांगली ऑडिओ क्वालिटी यासारखे फीचर्स ऑफर केले जातात. त्यामुळे वायरलेस ईयरबड्स वापरण्याचा अनुभव अधिक चांगला होतो आणि कामात व्यत्यय देखील येत नाही. (फोटो सौजन्य: Pinterest)
जर तुमची बहिण नेहमीच चावी, बॅग किंवा इतर वस्तू विसरत असेल तर स्मार्ट ट्रॅकर तिच्यासाठी चांगले गिफ्ट ठरणार आहे. चावी, बॅग किंवा इतर वस्तूंवर स्मार्ट ट्रॅक लावल्यास फोनच्या मदतीने त्या वस्तूंचे लोकेशन शोधणं अधिक सोपं होते. स्मार्ट ट्रॅकरचा आकार छोटा असल्यामुळे तुम्ही हे अगदी सहज कुठेही घेऊन जाऊ शकता. तसेच यामुळे वस्तू हरवण्याची चिंता देखील दूर होणार आहे.
जर तुमची बहिण फिटनेसवर लक्ष देत असेल स्मार्टवॉच तिच्यासाठी एक चांगले गिफ्ट ठरणार आहे. हल्ली बाजारात अनेक ॲडव्हांस फीचर्ससह विविध स्मार्टवॉच उपलब्ध आहेत. स्मार्टवॉचमध्ये स्टेप काउंट, हार्ट रेट मॉनिटरिंग, स्लीप ट्रॅकिंग आणि वर्कआउट ट्रॅकिंगसारखे अनेक फीचर्स ऑफर केले जातात. याशिवाय, कॉलिंग, मेसेज आणि ॲपचे नोटिफिकेशन या सर्व गोष्टी स्मार्टवॉचच्या मदतीने केल्या जाऊ शकतात. स्टायलिश डिझाईन असलेले स्मार्टवॉच तुमच्या रोजच्या वापरासोबत आऊटफीटला देखील एक क्लासी लूक देते.
स्मार्ट स्पीकरमुळे घरातील अनेक काम अगदी सहज शक्य होतात. व्हॉईस कमांडद्वारे म्युझिक सुरु करणं, हवामानाची माहिती घेणं, अलार्म किंवा रिमाइंडर सेट करण्यासारखी कामं अगदी सहज पूर्ण केली जाऊ शकतात. जर तुमची बहिण स्मार्ट होम डिव्हाईसचा वापर करत असेल तर स्मार्ट स्पीकर तिच्यासाठी एक चांगले गॅझेट असू शकते.
जर तुमच्या बहिणीला अभ्यास, ऑनलाईन कोर्स किंवा कंटेट पाहण्यासाठी मोठी स्क्रीन आवडत असेल तर तुम्ही तिला टॅब्लेट गिफ्ट करू शकता. स्मार्टफोनच्या तुलनेत याची स्क्रीन मोठी असते.